साबुदाणा फ्रुट पार्फे (Sabudana Fruit Parfe recipe in marathi)

Shital Siddhesh Raut
Shital Siddhesh Raut @brunch4appetite
वसई / महाराष्ट्र

#उपवास_रेसिपी
कूकपॅड 'उपवास स्पेशल' Live session मध्ये सादर केलेली रेसिपी...!!
इंटरेस्टिंग आणि पौष्टिक...👌👌

साबुदाणा फ्रुट पार्फे (Sabudana Fruit Parfe recipe in marathi)

#उपवास_रेसिपी
कूकपॅड 'उपवास स्पेशल' Live session मध्ये सादर केलेली रेसिपी...!!
इंटरेस्टिंग आणि पौष्टिक...👌👌

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40-50 मिनीटे
5 सर्व्हिंग्ज
  1. साबुदाणा पोर्हेज बनवण्यासाठी
  2. 1 कपभिजवलेला साबुदाणा
  3. 500मि.लि दूध
  4. 200 ग्रामकंडेन्स मिल्क
  5. 1 टेबलस्पूनबदाम, वेलची, केसर पावडर
  6. बदामाचे काप
  7. फ्रुट कोंपोट करण्यासाठी
  8. 200 ग्रामबारीक चिरलेली प्लम (आलूबुखार)
  9. 150 ग्रामसाखर
  10. वेलची आवडत असल्यास

कुकिंग सूचना

40-50 मिनीटे
  1. 1

    सर्वात आधी एका पॅन मध्ये दूध तापवून घ्या, त्या मध्ये कंडेन्स मिल्क घालुन घ्या आणि एक उकळी येऊ द्या त्या नंतर त्यात बदामाची पूड घालून घ्या

  2. 2

    नंतर त्यात आवडीचे ड्रायफ्रूट घालून घ्या, आणि एक उकळी आली की भिजवलेले साबुदाणे घालून घ्या आणि साबुदाणे शिजेपर्यंत पोर्हेज आटवून घ्या, आणि सेट व्हायला ठेवून द्या

  3. 3

    आता फ्रुट कोंपोट बनवूया, त्या साठी एक पॅन घेऊन त्यात प्लम आणि साखर मिक्स करून घ्या, आणि व्यवस्थित शिजूद्या, आणि दाटसर होऊ द्या(कमीत कमी 30-35 मिनटं लागतील)

  4. 4

    आवडत असल्यास वेलची घालू शकता,दाटसर झाले की मिश्रण थंड होऊ द्या

  5. 5

    आणि नंतर एका सरविंग ग्लास मध्ये आधी पोर्हेज त्या वर तयार कोंपोट घालून घ्या वरून पिस्त्याचे काप आणि तुळशीचे पान घालून फ्रीझ मध्ये सेट करून थंड गार सर्व्ह करा.
    "साबुदाणा फ्रुट पार्फे"

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shital Siddhesh Raut
Shital Siddhesh Raut @brunch4appetite
रोजी
वसई / महाराष्ट्र
Hello friends, I'm shital raut ,I'm a nursing professional but extremely passionate about food and cooking ,i love to celebrate each and every day with life And good lifestyle...!!i love to faces multiple tasks...!!So here imSo let's get started...😊follow me for recipe videos on Instagram@brunch4appetite#Amother#youtuber#homechef #instagrammer
पुढे वाचा

टिप्पण्या (10)

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
ही रेसिपी आजच्या मुंबई टाइम्स मधे आलेली बघून मला खूप आनंद झाला. अभिनंदन 👍💐

Similar Recipes