राजमा मसाला (rajma masala recipe in marathi)

Pallavi Gogte
Pallavi Gogte @Pallavi08

राजमा अतिशय पौष्टिक असतो. हिवाळ्यात जसा ओला हिरवा वाटाणा मिळतो तसाच ओला राजमा पण मिळतो. मी राजमा वाटाण्यासारखा फ्रीझरमध्ये स्टोर करते. छान टिकतो आणि मुख्य म्हणजे आयत्यावेळेला पण करता येतो.
#wdr

राजमा मसाला (rajma masala recipe in marathi)

राजमा अतिशय पौष्टिक असतो. हिवाळ्यात जसा ओला हिरवा वाटाणा मिळतो तसाच ओला राजमा पण मिळतो. मी राजमा वाटाण्यासारखा फ्रीझरमध्ये स्टोर करते. छान टिकतो आणि मुख्य म्हणजे आयत्यावेळेला पण करता येतो.
#wdr

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३०-४० मिनिटे
  1. 2 वाटीराजमा
  2. 2-3 चमचेMDH किंवा एव्हरेस्ट राजमा मसाला
  3. 1कांदा
  4. 2टोमॅटो
  5. 1हिरवी मिरची
  6. 1/2 इंचआले
  7. 5-6लसूण पाकळ्या
  8. 1/2 चमचाजीरे
  9. हिंग
  10. थोडा चुरलेला ओवा
  11. चवीप्रमाणे तिखट
  12. चवीप्रमाणे मीठ
  13. कसुरी मेथी गार्निशसाठी

कुकिंग सूचना

३०-४० मिनिटे
  1. 1

    २ वाटी राजमा कूकरमध्ये शिजवून घ्यावा, २ शिट्ट्या झाल्यावर मग १० मिनिटे गॅस बारीक ठेवावा. मग गॅस बंद करावा. दुसरीकडे कांदा, हिरवी मिरची, आले व लसूण मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे. कढईमध्ये तूप किंवा तेल तापत ठेवावे. त्यात थोडे जीरे, ओवा व हिंग टाकावे. मग त्यात कांद्याची पेस्ट घालून चांगले परतावे. मग त्यात टोमॅटोची प्युरी करून घालावी व थोडे पाणी घालावे. चांगली उकळी येऊ दयावी.

  2. 2

    आता त्यात राजमा मसाला, मीठ, हवे असेल तर तिखट घालावे. एक उकळी आली की त्यात राजमा घालावा. आता ५-१० मिनिटे गॅसवर झाकण ठेवून शिजवावे. कसुरी मेथी घालून गार्निश करावे. गरम पुरी, गरम भात किंवा पोळीबरोबर खायला दयावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Pallavi Gogte
Pallavi Gogte @Pallavi08
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes