व्हेज खिमा पाव (veg kheema pav recipe in marathi)

#BFR लहानपणी आमचा सख्खा शेजार म्हणून आम्हाला एक पंजाबी कुटुंबीय मिळाले होते. आईची त्या Aunty शी खूपच चांगली मैत्री होती. त्यांच्याकडून आई बरेच पंजाबी पदार्थ जसं छोले-भटूरे, जीरा राईस, राजमा चावल, व्हेज खिमा, गाजर चा हलवा, रोटी चे विविध प्रकार शिकली होती. अशा एक नाही अनेक गोष्टी त्यांच्याच कडून आम्हाला खजिना रूपातच सापडल्या. त्यांच्याकडून आलेल्या रेसिपीज् पैकी माझी आई व्हेज खिमा दोन पद्धतीने बनवायची सोयाबीनच्या चुर्यापासून आणि दुसरी फ्लॉवर किसून त्यापासून! दोन्हीही अप्रतिम व्हायच्या पण माझी आवडती होती फ्लॉवरवाली रेसिपी.. ❤️ फ्लॉवर ची व्हेज खिमा रेसीपी मी पुन्हा कधीतरी शेअर करेन.
आज मात्र मी पूर्ण प्रोटिन्स आणि फायबर्स ने खचाखच भरलेला असा सोयाबीनच्या चुर्यापासून केलेला व्हेज खिमा सादर करत आहे. त्याला कारणही तसेच आहे, कुकपॅड मराठीचे ब्रेकफास्ट रेसिपी चॅलेंज! सकाळचा नाश्ता परिपूर्ण असेल तर अख्खा दिवस उत्साही जातो. तसंच हा पदार्थ बनवायला ही सोपा आहे आणि प्रोटिन्स्, फायबर्स नी भरलेला असल्यामुळे दुपारी च्या जेवणापर्यंत पोट टम्म ठेवायला मदत करणारा आहे.
आईमुळे रेसिपी ला नॉनव्हेज चा फील देण्यासाठी ओलं खोबरं ही घालण्याची सवय लागली. तसंच, व्हेज खिमा करताना मी नेहमी नगेटस् भिजवून, पिळून मिक्सरवर बारीक केलेला चुरा वापरते. कारण, मार्केटमध्ये तयार मिळणारा चुरा खूपच भुरभुरीत असतो. डिश बनल्यावर मिळून येत नाही, चोथा-पाणी होते. ही टीप लक्षात ठेवून केल्यास खूप छान रिझल्ट मिळतो. चला तर मग रेसिपी कडे वळूया ...
व्हेज खिमा पाव (veg kheema pav recipe in marathi)
#BFR लहानपणी आमचा सख्खा शेजार म्हणून आम्हाला एक पंजाबी कुटुंबीय मिळाले होते. आईची त्या Aunty शी खूपच चांगली मैत्री होती. त्यांच्याकडून आई बरेच पंजाबी पदार्थ जसं छोले-भटूरे, जीरा राईस, राजमा चावल, व्हेज खिमा, गाजर चा हलवा, रोटी चे विविध प्रकार शिकली होती. अशा एक नाही अनेक गोष्टी त्यांच्याच कडून आम्हाला खजिना रूपातच सापडल्या. त्यांच्याकडून आलेल्या रेसिपीज् पैकी माझी आई व्हेज खिमा दोन पद्धतीने बनवायची सोयाबीनच्या चुर्यापासून आणि दुसरी फ्लॉवर किसून त्यापासून! दोन्हीही अप्रतिम व्हायच्या पण माझी आवडती होती फ्लॉवरवाली रेसिपी.. ❤️ फ्लॉवर ची व्हेज खिमा रेसीपी मी पुन्हा कधीतरी शेअर करेन.
आज मात्र मी पूर्ण प्रोटिन्स आणि फायबर्स ने खचाखच भरलेला असा सोयाबीनच्या चुर्यापासून केलेला व्हेज खिमा सादर करत आहे. त्याला कारणही तसेच आहे, कुकपॅड मराठीचे ब्रेकफास्ट रेसिपी चॅलेंज! सकाळचा नाश्ता परिपूर्ण असेल तर अख्खा दिवस उत्साही जातो. तसंच हा पदार्थ बनवायला ही सोपा आहे आणि प्रोटिन्स्, फायबर्स नी भरलेला असल्यामुळे दुपारी च्या जेवणापर्यंत पोट टम्म ठेवायला मदत करणारा आहे.
आईमुळे रेसिपी ला नॉनव्हेज चा फील देण्यासाठी ओलं खोबरं ही घालण्याची सवय लागली. तसंच, व्हेज खिमा करताना मी नेहमी नगेटस् भिजवून, पिळून मिक्सरवर बारीक केलेला चुरा वापरते. कारण, मार्केटमध्ये तयार मिळणारा चुरा खूपच भुरभुरीत असतो. डिश बनल्यावर मिळून येत नाही, चोथा-पाणी होते. ही टीप लक्षात ठेवून केल्यास खूप छान रिझल्ट मिळतो. चला तर मग रेसिपी कडे वळूया ...
कुकिंग सूचना
- 1
सगळ्यात आधी सोयाबीनचे नगेट्स मीठ असलेल्या गरम पाण्यात दहा मिनिटे झाकण लावून ठेवून द्यावे. नंतर लगेच पिळून त्यातले पाणी काढून टाकावे आणि मिक्सर मध्ये एक दोनदा गरके मारून घ्यावेत.
- 2
नंतर एका मिक्सरच्या भांड्यात ओले खोबरे + कांदा + टोमॅटो + हिरव्या मिरच्या + आलं लसूण पेस्ट दह्याबरोबर गुळगुळीत वाटून घ्यावे.
- 3
कढईत ३ मोठे चमचे तेल गरम करून त्यात अख्खे खडे मसाले, हिंग, हळद, तिखट, किचन किंग मसाला / बिर्याणी मसाला घालून मग तयार वाटण त्यात घालावे. मी इथे फोडणीत थोड्या काजू पाकळ्या घातल्या आहेत. हे पूर्णपणे ऐच्छिक आहे.
- 4
मिश्रणाला चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे.
- 5
नंतर त्यात सोयाबीनचा चुरा, मीठ, कसुरी मेथी आणि १/२ वाटी पाणी घालून एक दणदणीत वाफ येऊ द्यावी.
- 6
पावांना मध्ये एक चीर देऊन बटरवर छान शेकून घ्यावेत.
- 7
तयार सोया खिमा पाव आणि कांदा याबरोबर सर्व्ह करावा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
व्हेज सोयाबीन खिमा (veg soyabean kheema recipe in marathi)
#EB3#W3विंटर रेसिपी चॅलेंज.वीक -3.सोयाबीन खुप पौष्टिक आहे.आज मी व्हेज सोयाबीन खिमा बनवला आहे. ब्रेड सोबत खूप छान लागतो. Sujata Gengaje -
-
खिमा पाव (Kheema Pav Recipe In Marathi)
#HV थंडीच्या दिवसात ठिकठिकाणी मालवणी जत्रा भरते. मग तेथे काय खाण्याची जंगीच असते. त्या एवढया गदीऀत उभे राहून घरातील मंडळीना खिमा पाव खिलवायचा. मग त्या पेक्षा तो खिमा पाव चा आस्वाद घरच्या घरी करून देण्याचा माझा प्रयत्न.... Saumya Lakhan -
व्हेज मराठा (veg maratha recipe in marathi)
ट्रेंडिंग रेसिपी व्हेज मराठा करताना मी कोबी आणि फ्लॉवर दोन्ही वापरले आहेत आणि ते चिरून घातले आहेत जर किसून घेतले की कोफ्ता करताना पाणी जास्त सुटतं आणि पीठाचा जास्त वापर केला जातो. कोफ्ता अधिक पौष्टिक बनविण्यासाठी मी बेसन जास्त प्रमाणात वापरलं आहे आणि काॅनफ्लोर मैदा कमी प्रमाणात वापरला आहे. Rajashri Deodhar -
चीज चिकन खिमा स्टफ चपाती रोल (cheese chicken kheema stuffed chapati roll recipe in marathi)
#wdr संडे स्पेशल रेसिपीही मला सुचलेली रेसिपी आहे. चिकन खिमा मी करणार होते. रात्रीच्या 3 चपात्या शिल्लक होत्या. म्हणून विचार आला, खिमा घालून,तसेच किसलेले चीज ही होते. हे पदार्थ घालून रोल बनवूया.मला ही रेसिपी सुचली. ती केली,आणि इतकी छान झाली होती. तळून घेतल्याने रोल कुरकुरीत झाले होते. घरातील सर्वांना खूप आवडली ही रेसिपी. नवीन रेसिपी सुचल्याचा आनंद काही औरच आहे.तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#cpm4व्हेज पुलाव साधी सोपी झटपट होणारी तितकीच स्वादिष्ट आणि पौष्टिक अशी रेसिपी आहेव्हेज पुलाव हा तांदूळ आणि निवडक भाज्यांचा वापर करून बनविला जातोटिफिन मध्ये देण्यासाठी झटपट बनणारी अशी ही रेसिपी आहे सकाळच्या कामात घाईगडबडीत आणि व्यस्त वेळेत अगदी काही मिनिटात तयार होणारी डिश म्हणजे रुचकर व्हेज पुलावकोशिंबीर किंवा दही सोबत खाल्ल्यास अधिकच चविष्ट लागतो चला तर जाणून घेऊया चमचमीत व्हेज पुलाव ची साधी सोपी रेसिपी 😀 Sapna Sawaji -
सोया खिमा कोफ्ता करी (soya kheema kofta curry recipe in marathi)
#कोफ्ताखिमा म्हटले की नॉन व्हेज रेसिपी वाट्टे पण नाही ह्ह्ह ही पुर्णपणे व्हेज आहे.. Devyani Pande -
व्हेज मराठा (veg maratha recipe in marathi)
#EB12 #W12 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड व्हेज मराठा या कीवर्ड साठी मी आज माझी व्हेज मराठा ही माझी रेसिपी मी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
व्हेज कोल्हापूरी (veg kolhapuri recipe in marathi)
#EB7 #W7 {#विंटर स्पेशल रेसिपीज Ebook } व्हेज कोल्हापूरी हि रेसिपी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे . त्याची ग्रेव्ही खूपच चवीस्ट आणि स्मूदी असते . आणि हि रेसिपी सर्वांना आवडणारी आणि जरा झणझणीत असते .Sheetal Talekar
-
व्हेज कोल्हापूरी (veg kolhapuri recipe in marathi)
#GA4 #week24#Cauliflower (फ्लॉवर)ओळ्खलेला कीवर्ड आहे Cauliflower. आज व्हेज कोल्हापुरी केली आहे. Sampada Shrungarpure -
व्हेज मराठा (veg maratha recipe in marathi)
#EB12#W12 या आठवड्यात मी 'व्हेज मराठा' ही भाजी बनवत आहे. जर तुम्ही 'शाकाहारी' असाल पण पंजाबी भाज्यांमध्ये नेहमी पनीर खाऊन कंटाळला असाल तर ही भाजी तुम्हाला नक्की आवडेल. Pooja Kale Ranade -
सोया मटार खिमा (soya matar kheema recipe in marathi)
#EB3 #W3 रेसिपी ई बुक चॅलेंज सोयाबिन चा वापर आपल्या आहारात नेहमी असला च पाहिजे सोयाबिनचे आपल्या शरीराला भरपुर फायदे मिळतात. सोयाबिन मध्ये प्रोटिन, फायबर, मिनरल्स आणि फाइटो इस्ट्रोजन्स असतात. वजन कमी होण्यास मदत करते. डायबिटीज व हार्टच्या आजारांना थांबवण्याचे कार्य करते. हाडांच्या मजबुतीसाठी फायदेशिर, आयरनचे प्रमाण जास्त असल्यामुळे महिलांसाठी जास्त फायदेशीर , एनिमिया व ऑस्टियोपोरोसिस पासुन वाचवले जाते. त्यात येणाऱ्या आशक्तपणामुळे वाचले जाते. चला तर अशा उपयोगी सोयाबिन पासुन नविन रेसिपी बघुया आपण Chhaya Paradhi -
-
स्ट्रीट स्टाईल खिमा तवा मसाला विथ पाव )(kheema masala pav recipe in marathi)
#EB3#W3" स्ट्रीट स्टाईल खिमा तवा मसाला विथ पाव"खिमा पाव म्हणजे अस्सल खवय्ये आणि नॉनव्हेज प्रेमींची आवडती डिश..... जी स्ट्रीट वर उभं राहूनच गरमगरम खाण्याची बहुतेकांना चटक असते...!! आणि का असू नये जिभेचे चोचले पुरवायचे म्हणजे स्ट्रीट फूड पुढे काही नाही....!! Shital Siddhesh Raut -
पंजाबी मिक्स व्हेज मसाला (Punjabi Mix Veg Masala Recipe In Marathi)
#MRमटार रेसीपी#पंजाबी रेसीपी#मिक्स व्हेज#mix veg#पंजाबी Sampada Shrungarpure -
व्हेज पुलाव...बिना कांदा लसूणाचा. (veg pulav recipe in marathi)
#डिनर #साप्ताहिक डिनर प्लॅनर #मंगळवार #पुलाव वरण-भात तूप लिंबू हे नैवेद्याच्या पानावरचा मुख्य पदार्थ.. साधारणपणे नेवैद्य म्हटले की आपण सात्विक भोजन करत असतो कारण आपण जसं भोजन करतो आहार घेतो त्याप्रमाणे आपल्या वृत्ती तयार होत असतात. सात्विक राजस आणि तामसी या त्या वृत्ती आणि त्याला अनुसरून असलेला सात्विक आहार, राजस आहार आणि तामस आहार.. याबद्दल आयुर्वेदात खूप विस्तृतपणे सांगितले आहे. सणावाराच्या दिवशी आपल्या वृत्ती सात्विक शांत असाव्यात आणि आपण मनाने देवाच्या अधिक जवळ असावे देवाचे आपल्याला चिंतन करता यावे यासाठी सात्विक आहाराची योजना केली आहे. म्हणून मग शक्यतोवर बिना कांदा लसूण याचा नैवेद्य केला जातो. नैवेद्यासाठी बहुतेक वेळा मसाले भात केला जातो पण या मध्ये थोडं व्हेरिएशन म्हणून मी कधी कधी हा बिना कांदा लसणाचा व्हेज पुलाव करते.. तेवढाच चवीमध्ये बदल..देव शेवटी भावाचा भुकेला.. चला तर आज आपण नैवेद्यासाठी पण चालणारा व्हेज पुलाव कसा करायचा ते पाहू या.. Bhagyashree Lele -
झणझणीत कोल्हापूरी मिसळ पाव (misal pav recipe in marathi)
#cr कोल्हापूर माझं माहेर.. इथे, तांबडा-पांढरा रस्सा, गोळीपुलाव, खांडोळी अशा अनोख्या मांसाहारी पदार्थांबरोबर च मिसळपाव, कटवडा, वडापाव, भेळ, दूधसार असा शुद्ध शाकाहारी खजिना ही खवय्यांची भूक चाळवतो. मिसळ चे माहेरघर म्हणून ही ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर मध्ये आता बर्याच मिसळी फेमस आहेत पण, लहानपणापासून खात असलेली आणि अजूनही चवीमध्ये तसूभरही फरक नसलेली "आहार" ची मिसळ ही माझ्या आजच्या मिसळ रेसिपी ची आदर्श आहे. कोल्हापूरी मिसळीचे वैशिष्ट्य हे तिथल्या कांदा लसूण मसाल्याचे आहे. तसंच, तिथं अजूनही मिसळ बरोबर स्लाईस ब्रेड च खाल्ला जातो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फरसाण! त्यात भावनगरी गाठिया आणि पापडी पेक्षा मुख्यपणे शेव + चिवडा हेच कॉम्बिनेशन जास्त हवे. Tried and tasted रेसिपी असल्याने ती अजिबात चुकणार नाही, नक्की रेसिपी करून पहा.. शर्वरी पवार - भोसले -
व्हेज बिर्याणी (veg biryani recipe in marathi)
#GA4#week16#व्हेजबिर्याणी#बिर्याणीविक 16 मध्ये दिलेल्या कीवर्ड बिर्याणी हे नाव शोधून रेसेपी बनवली आहे. बिर्याणी हा आपल्या भारतातल्या प्रमुख मेन खाद्यपदार्थ आहे, फ्लेवर ने भरपूर आणि दमदार, पोट भरणार असा पदार्थ आहे. भरपूर भाज्या मसाले फ्लेवर युज करून बिर्याणी बनवली जाते बिर्याणीला वन पॉट मिल असेही आपण म्हणू शकतो म्हणजे एकदा बनवली की आपण दोन-तीन वेळेस खाऊ शकतो प्रत्येकाची बिर्याणी ची रेसिपी बनवण्याची पद्धत प्रत्येकाच्या हाताला टेस्ट हा बिर्याणीवर खूप इफेक्ट करतो बिर्याणी बऱ्याच पद्धतीने बनवली जाते कोणी कुकर मध्ये डायरेक्ट बनवतात कोणी पॉट मध्ये भात शिजून बनवतात कोणी पूर्ण प्रिपरेशन झाल्यावर लेअर करून दम देऊन बिर्याणी बनवतात कोणी स्मोकिं इफेक्ट देऊन बिर्याणी बनवतात बनवायची पद्धत कशी असो पण बिर्याणी जवळपास पूर्ण भारतभर खूप प्रचलित प्रत्येक घराघरात बनवली जाणारी अशी ही डिश आहे , बिर्याणी म्हटले की तोंडाला पाणी सुटते, बिर्याणी बरोबर रायता ,कढी ,पापड, लोणचे ,पोळी, भाजी ,सलाद ग्रेव्ही सर्व्ह केली जाते, भारतात हैदराबाद ची बिर्याणी फेमस आहे, व्हेज बिर्याणी म्हटले म्हणजे जरा बरेच लोक नाक मुरडतात पण व्हेज मध्ये भरपूर भाज्या , पनीर ,फ्लेवर्स टाकले की बिर्याणी छान टेस्टी लागते. व्हेज एकूण नाराज होण्याचे काहीच कारण नाही व्हेज ही खूप छान लागते'बिर्याणीचे' साऊंड पार्टीची फिलिंग देणारे आहे बिर्याणी म्हणजे काहीतरी उत्सव, महोत्सव , आनंद साजरा करतो आहे असे वाटते.मी बिर्यानी बनवताना बासमती राईस युज न करता विदर्भीय तांदूळ काली मुचं /चीनोर हा राईस युज केला आहे कारण या तांदुळाला स्वतःचा खूप छान असा फ्लेवर आहे म्हणून मी हा राईस युज केला आहे. Chetana Bhojak -
मुशीचा खिमा (mushicha kheema recipe in marathi)
#GA4 #Week18 #fishगोल्डन एप्रन 4 -आठवडा 18 चे कीवर्ड- फिश मुशी मासे मध्ये ओमेगा -3 ची मात्रा चांगली आहे, म्हणून हृदय आणि त्वचा निरोगी ठेवण्यासाठी हे एक उत्कृष्ट आहार आहे. एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. ओमेगा 3 घटक लहान मुलांच्या बौद्धिक वाढीसाठी फायदेशीए आहे. यामुळे स्मरणशक्ती मजबूत होते. ही रेसिपी माझ्या नेहमीची मुशी मसाला किंवा मुशी खिमा बनवण्याची पद्धत आहे. मी मुशी मासे उकळत नाही, परंतु मासे बारीक तुकडे करताना मी माशाचा काटे काढून टाकते. आंबट चवी साठी तुम्ही 1 टोमॅटो बारीक कापून घाला किंवा 3/4 कोकम ही घालू शकता. मी या रेसिपी मध्ये टोमॅटो न घातल्यामुळे शिजवताना 1/4 पाणी घातले. Pranjal Kotkar -
व्हेज बिर्याणी (veg biryani recipe in marathi)
#br बिर्याणी हा शब्द उच्चारताच आपल्या डोळ्यासमोर रंगीबेरंगी बिर्याणी दिसते . त्यात रंगीबेरंगी भाज्या, केशर, बिर्याणी मसाला असल्याने खूपच टेस्टी, यमी, यमी लागते. मी येथे व्हेज बिर्याणी तयार केली आहे. चला तर कशी तयार करायची ते पाहूयात. Mangal Shah -
खिमा पालक (kheema palak recipe in marathi)
खिमा पालक रेसिपी करत आहे. पालक सहसा घरी खायला बघत नाही. त्यामुळे खिमा मध्ये पालक टाकली तर पचायला हलकी पण असते. आणि पालक भाजी पण खाल्ली जाते. rucha dachewar -
प्रोटिनयुक्त हेल्दी सोया व्हेजि बिर्याणी (Soya Veg Biryani Recipe In Marathi)
#RR2 लहान मोठ्यांसाठी पौष्टिक अशी ही व्हेज बिर्याणी. Saumya Lakhan -
व्हेज कोल्हापुरी (veg kolhapuri recipe in marathi)
#EB7 #W7 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड व्हेज कोल्हापुरी साठी माझी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#cpm4रात्रीच्या वेळी हलकेफुलके जेवण,कमी वेळेत बनणारे वन पॉट मिल ... आवडीनुसार भाज्या घालून केलेला व्हेज पुलाव सर्वांच्याच आवडीचा... चला तर बघू या रेसिपी... व्हेज पुलाव Priya Lekurwale -
चिकन खिमा पाव (Chicken Kheema Pav Recipe In Marathi)
#ATW1#TheChefStoryस्ट्रीट फूड रेसिपी Sujata Gengaje -
काॅलीफ्लाॅवर मटार खिमा (cauliflower matar kheema recipe in marathi)
काही कारणाने घरी आणलेल्या भाज्या डबल झाल्या तिच तिच भाजी खायचा मला आधीच कंटाळा! वेगवेगळ्या प्रकारे तिच भाजी कशी करता येईल ह्याचा विचार करता ही खिमा भाजी केली आणि ती मस्त झाली.रेसिपी आपल्या साठी... Pragati Hakim -
अंडा खिमा (anda kheema recipe in marathi)
#fdr सर्वांना Happy friendship Day .... तर आज या दिवशी मी माझी ही पहिली रेसिपी पोस्ट करत आहे. अंडा खिमा थोडीशी भुर्जी सारखीच पण थोडी मोकळी .... बघा करून... Nilesh Hire -
व्हेज कोल्हापुरी (veg kolhapuri recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक डिनर प्लॅनर#व्हेज कोल्हापुरी Rupali Atre - deshpande -
व्हेज बिर्याणी (Veg biryani recipe in marathi)
सुवर्णा पोतदार यांची व्हेज बिर्याणी कूकस्नॅप केली आहे.छान झालेली बिर्याणी. Sujata Gengaje -
व्हेज मराठा (veg maratha recipe in marathi)
#EB12 #W12हॉटेल स्टाईल भाज्या खायला सगळ्यांनाच आवडतात. व्हेज कोफ्ता ही सगळ्यांचीच आवडती भाजी.. आजची रेसिपी या भाजीच्या जवळपास जाणारी आहे. व्हेजिटेबल कटलेट बनवून त्यावर रेड ग्रेव्ही घालून ही सुंदर भाजी सर्व्ह केली जाते. नवीन डिशेस ट्राय करायला ज्यांना आवडते त्यांच्यासाठी ही भाजी म्हणजे एक चांगला ऑप्शन आहे. यात वापरले जाणारे वेजिटेबल कटलेट नुसते खायला तर मजा येतेच पण रेड ग्रेव्ही बरोबर त्यांची चव अजूनच वाढते. मी ही भाजी करताना माझे स्वतःचे प्रॉडक्ट इन्स्टंट रेड ग्रेव्ही मिक्स याचा वापर केला आहे त्यामुळे ही भाजी करण्यासाठी मला फक्त दहा ते बारा मिनिटे लागली. ओरिजनल रेड ग्रेव्ही ची रेसिपी मी खाली दिली आहे.Pradnya Purandare
More Recipes
टिप्पण्या (4)