झातर मनकिश (अरेबिक ब्रेकफास्ट) (Jhatar Mankish recipe in marathi)

#BFR
अरेबिक देशांमध्ये चांगले शाकाहारी पदार्थ मिळत नाहीत हा माझा "मोठ्ठा गोड गैरसमज" झातर मनकिश ( Zaatar Manakish ) / झातर रोटी खाल्ल्यावर दूर झाला. "झातर" ही एक हिरवट रंगाची स्पाईस पावडर असते. ही झातर पावडर वापरून बनवलेले "मनकिश" म्हणजेच रोटी किंवा पराठा आज आपण बघणार आहोत.
प्रत्येक अरेबिक देशपरत्वे "झातर" चे घटक थोड्याफार फरकाने बदलतात. आम्हाला इथे तयार पावडर मिळते पण, भारतात ती मिळेलच असं नाही. त्यामुळंच मी झातर बनवण्याची भारतीय पध्दत सांगणार आहे. पिझ्झा, पास्ता मुळे आजकाल सगळ्यांकडे ड्राईड ऑरेगनो, बेसिल असतंच. त्याचाच वापर आपण करुया. तसंच रोटीसाठी मैद्याऐवजी गव्हाचं पीठ वापरणार आहोत आणि भारतीय चवीनुसार त्यात आलं-लसूण पेस्ट, हिरवी मिरची ही घातली आहे जेणेकरून "मनकिश" खमंग लागावे. झातर रोटी लाटून त्यावर स्प्रेड करून मग तंदूर किंवा ओव्हन मध्ये भाजतात. त्याऐवजी आपण स्टफ्ड् पराठा किंवा नान सारखं तयार करून तव्यावर भाजून बनवूया. बेकिंग पावडर, सोडा आणि दही यांमुळे "मनकिश" गव्हाच्या पीठाचे असले तरीही आतून मऊसूत आणि वरून एकदम खुसखुशीत होतात.
ह्या झातरचे औषधी गुणधर्म सुध्दा आहेत. अँटी ऑक्सिडंट्स ने ठासून भरलेली "झातर स्पाईस पावडर" प्राचीन काळापासून कृमिघ्न म्हणून अरब देशांमध्ये वापरली जाते. तसंच, पैलेस्टाईन मध्ये अजून एक चलन प्रचलित आहे. मनाची जागरूकता आणि आकलनक्षमता वाढवत असल्याने लहान मुलांना शाळेला जाताना "झातर" ब्रेकफास्ट मध्ये खाण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं. तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल ह्यात काहीच दुमत नाही. चला तर मग पाहुया, एक "लेवंँट अरेबिक डेलिकसी" ...
झातर मनकिश (अरेबिक ब्रेकफास्ट) (Jhatar Mankish recipe in marathi)
#BFR
अरेबिक देशांमध्ये चांगले शाकाहारी पदार्थ मिळत नाहीत हा माझा "मोठ्ठा गोड गैरसमज" झातर मनकिश ( Zaatar Manakish ) / झातर रोटी खाल्ल्यावर दूर झाला. "झातर" ही एक हिरवट रंगाची स्पाईस पावडर असते. ही झातर पावडर वापरून बनवलेले "मनकिश" म्हणजेच रोटी किंवा पराठा आज आपण बघणार आहोत.
प्रत्येक अरेबिक देशपरत्वे "झातर" चे घटक थोड्याफार फरकाने बदलतात. आम्हाला इथे तयार पावडर मिळते पण, भारतात ती मिळेलच असं नाही. त्यामुळंच मी झातर बनवण्याची भारतीय पध्दत सांगणार आहे. पिझ्झा, पास्ता मुळे आजकाल सगळ्यांकडे ड्राईड ऑरेगनो, बेसिल असतंच. त्याचाच वापर आपण करुया. तसंच रोटीसाठी मैद्याऐवजी गव्हाचं पीठ वापरणार आहोत आणि भारतीय चवीनुसार त्यात आलं-लसूण पेस्ट, हिरवी मिरची ही घातली आहे जेणेकरून "मनकिश" खमंग लागावे. झातर रोटी लाटून त्यावर स्प्रेड करून मग तंदूर किंवा ओव्हन मध्ये भाजतात. त्याऐवजी आपण स्टफ्ड् पराठा किंवा नान सारखं तयार करून तव्यावर भाजून बनवूया. बेकिंग पावडर, सोडा आणि दही यांमुळे "मनकिश" गव्हाच्या पीठाचे असले तरीही आतून मऊसूत आणि वरून एकदम खुसखुशीत होतात.
ह्या झातरचे औषधी गुणधर्म सुध्दा आहेत. अँटी ऑक्सिडंट्स ने ठासून भरलेली "झातर स्पाईस पावडर" प्राचीन काळापासून कृमिघ्न म्हणून अरब देशांमध्ये वापरली जाते. तसंच, पैलेस्टाईन मध्ये अजून एक चलन प्रचलित आहे. मनाची जागरूकता आणि आकलनक्षमता वाढवत असल्याने लहान मुलांना शाळेला जाताना "झातर" ब्रेकफास्ट मध्ये खाण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं. तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल ह्यात काहीच दुमत नाही. चला तर मग पाहुया, एक "लेवंँट अरेबिक डेलिकसी" ...
कुकिंग सूचना
- 1
सगळे पदार्थ मिक्स करून छान मऊ, पातळसर कणीक मळून घ्यावी. ती साधारण ब्रेडच्या कणकेप्रमाणे असावी. कणकेला १० ते १५ मिनिटे रेस्ट करावे.
- 2
तोवर, झातर साठीचे ही सगळे इन्ग्रेडियंट्स (तीळ आणि लिंबाचा रस सोडून) मिक्सरवर बारीक फिरवून घ्यावे. नंतर त्यात तीळ आणि लिंबाचा रस घालून हाताने मिक्स करावे.
- 3
तयार झातर मध्ये आलं+ लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्या, कसूरी मेथी, तेल, चवीनुसार मीठ घालून कालवून घ्यावे.
- 4
कणकेचे गोळे बनवून घ्यावेत.थोड्या कोरड्या पीठावर पातळ पोळी लाटून घ्यावी. त्यावर थोड्या तेलाचे बोट फिरवून तयार झातर मिश्रण स्प्रेड करावे. माझ्या मुलासाठी मी तेलाऐवजी थोडं चीज किसून त्यावर झातर पसरवलं आहे.
- 5
मोदकासारख्या पार्या करून कणकेचा गोळा नीट बंद करून घ्यावा.पोळी हलक्या हाताने किंचित जाडसर आणि छोटी लाटावी किंवा नान बनवताना हाताने पसरवतात तशी पसरवून घ्यावी.
- 6
थोड्या बटर किंवा तेलावर छान खरपूस भाजून घ्यावी. तयार झातर मनकिश टोमॅटो सॉस, लसणीच्या चटणीबरोबर किंवा झणझणीत खर्डा/ठेच्याबरोबर सर्व्ह करावा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मीठ मिरचीची रोटी (mith mirchichi roti recipe in marathi)
#GA4#week25#Rotiगोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये Rotiहा कीवर्ड बघून रेसिपी बनवली. आपल्या भारतीय आहारातला सर्वात महत्वाची धान्य म्हणजे गहू आहे या गव्हापासून रोटी तयार करून रोज आहारात घेतली जाते. गव्हाच्या पिठापासून पोळी तयार करून आहारातून घेणे ही भारतीय संस्कृतीतला एक प्रमुख असा भाग आहे. प्रोटीन जसे महत्वाचे असते शरीरासाठी तसेच कार्ब तेवढेच महत्त्वाचे आहे कार्ब साठी पोळी ,भात असे आपले भारतीय जेवणातून घेतले जाते लहानपणापासूनच आपल्याला पोळी भात हे आहारातून दिले जात आहे आणि आपण ते वर्षानुवर्षे घेत आहोत चहा पोळी हा जवळपास सगळ्यांचाच लहानपणीचा नाश्ता चा प्रमुख आहार आहे. मैद्यापासून तयार केलेले बिस्कीट पेक्षा आपल्याकडे गव्हाच्या रोटी ला महत्त्व दिले जाते. गव्हाची रोटी खाल्लेली कधीही चांगलीच असे ठाम मत आहे. भारतात वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या राज्यात गव्हापासून तयार केलेल्या मैद्याची रोटी, गव्हाची रोटी,पुर्या ,पराठा, ब्रेड, पाव डोसा असे बरेच प्रकार तयार केले जातात आणि आहारातून घेतले जाते. तसाच आज मी बनवलेला मीठ आणि मिरची ची रोटी हा माझा खानदानी नाश्ता खानदानी पोळीचा प्रकार असे म्हटले तरी चालेल हा प्रकार राजस्थान मध्ये सर्वात जास्त बनवला जातो याला 'नमक मिरची कि पुडी' असेही म्हणतात आम्हाला आमच्या मावशीने ही खायची सवय लावली होती मावशी बिकानेर साईडची असल्यामुळे ती हा प्रकार खूप छान बनवते अशा प्रकारच्या पोळ्या बनवून प्रवासात नेल्या जातात जसे गुजरात मध्ये थेपले नेतात तसेच राजस्थान मध्ये अशा प्रकारची रोटी बनवून बरोबर नेतात म्हणजे चहा बरोबर खाता येते भाजी ची गरज पडत नाही.माझ्याकडे आज पण रोजच्या पोळीबरोबर अशा पाच-सहा रोट्या शेवटी बनवण्याची पद्धत आहे ती वर्षानुवर्षे चांललीच आहे Chetana Bhojak -
पिझ्झा पराठा (Pizza Paratha Recipe In Marathi)
#PRN#PIZZAPARATHAपिझ्झा पराठा नावाने एकदम तोंडाला पाणी सुटेल अगदी हेल्दी अशी ही रेसिपी पिझ्झा बेस मध्ये मैद्याचा वापर करून पिझ्झा तयार केला जातो मग हा आपला इंडियन वर्जन का नाही तयार करायचा मग आपला इंडियन्सला रोटी ही गव्हाचीच चालते मग गव्हाच्या रोटी मध्येच आणि आलू पराठ्याचे स्टफिंग चा वापर करून डबल लोडेड असा पिझ्झा पराठा तयार केला. खूपच टेस्टी लहान मुले आवडीने खातील टिफिनलाही परफेक्ट असा हा पराठा कोणाच्याही समोर ठेवला तरी नाही म्हणणार नाही सॉफ्ट खायला आपल्या आवडीनिवडीनुसार आपण याला अजून तयार करू शकतो.यात अजून वेगवेगळ्या भाज्या बारीक चॉप करून स्टॉप करून हा पराठा तयार करू शकतोतर बघूया रेसिपी पिझ्झा पराठा. Chetana Bhojak -
गार्लिक मसाला लच्छा पराठा (garlic masala lachha paratha recipe in marathi)
#cpm3#लच्छापराठा#पराठासगळ्यांच्याच आवडीचा हा पराठा कोणीच नाही म्हणणार असे आपल्याला मिळणार नाही प्रत्येकाला आवडणार लच्छा पराठा वेगवेगळ्या पद्धतीने तयार करता येतो तयार करायला ही सोप्पा असा हा पराठातेल किंवा तूप किंवा बटर चा वापर करून लच्छा पराठा तयार करता येतो नुसता तूप आणि जिरा लावून केला तरी पराठा छान लागतो लहसुन आणि मसाल्याचा वापर करून पराठा तयार करून असाच दह्याबरोबर किंवा कोरा खाल्ला तरी छान लागतो. रोजच्या पोळीपेक्षा काही वेगळे खावेसे वाटले तर अशा प्रकारचा पराठा तयार करता येतो. घरात असलेल्या आपल्या रोजच्या जेवणातून हा पराठा तयार करता येतो चटपटीत वेगळं खावंसं वाटलं की तयार करता येतो चहा बरोबरही खूप छान लागतोमी तयार केलेला पराठा गव्हाच्या पिठाचा वापर करून लसूण आणि काही मसाल्याचा, तेल वापरून तयार केलेला लच्छा पराठा आहे रेसिपीतून नक्कीच बघा कशाप्रकारे तयार केला Chetana Bhojak -
तंदूरी रोटी (Tandoori roti recipe in marathi)
#EB12#W12#विंटर_स्पेशल_ebook_रेसिपीज_चँलेज..#तंदूरी_रोटी आपल्याला नेहमीच लग्नांमध्ये ,पार्टीजमध्ये, हॉटेलमध्ये तंदुरी रोटी मेन्यूमध्ये सर्वात फेव्हरेट डिश दिसून येते .आपल्या भारतीय खाद्यसंस्कृती पोळी, पराठा ,नान, रुमाली रोटी ,मिस्सी रोटी ,तंदुरी रोटी ,भाकरी असे वेगवेगळे प्रकार वेगवेगळ्या साहित्य पासून तयार करतात. खरंतर नान आणि तंदुरी रोटी तयार करण्यासाठी तंदूर चा वापर केला जातो .हा तंदूर म्हणजे एक मोठा मातीचा ओवन सारखाच असतो. खरंतर रोटी, पोळी याशिवाय आपले भारतीयांचे जेवण अधुरेच आहे.. ही रोटी कोणी गव्हापासून, कोणी मैद्यापासून ,कोणी बाजरीपासून , कोणी ज्वारीपासून. कोणी ओट्स पासून आपापल्या आवडीनुसार करतात.. बटर लावलेली गरमागरम तंदुरी रोटी आपल्या आवडत्या भाजीबरोबर खाणे किंवा नुसतीच खाणे हे माझ्यासाठी केवळ सुखच सुख आहे. साधारणपणे ढाब्यांमध्ये मिळणारी रोटी ही मैद्यापासून केली जाते आणि थंड झाल्यावर खूप चिवट होते .परंतु आज आपण बिना तंदूर ची तव्यावर तयार होणारी गव्हापासून तयार होणारी तंदुरी रोटी कशी तयार करायची ते बघू या..ही तंदुरी रोटी कणके पासून तयार केली असल्यामुळे गार झाल्यावर देखील चिवट होत नाही..चला तर मग घरच्या घरीच खमंग अशा तंदूरी रोटीचा आस्वाद घेऊ या.. Bhagyashree Lele -
तंदुरी रोटी (Tandoori roti recipe in marathi)
#EB12 #W12हॉटेल मध्ये आपण तंदुरी रोटी खातो तशी तंदुरी रोटी घरच्या घरी बनवु या Sushama Potdar -
ओपो पराठा (ओनियन पोटॅटो पराठा)(paratha recipe in marathi)
मी ओनीयन पराठा करते , कधी आलू पराठा करते. आज दोन्हींचे एक कॉम्बिनेशन करून टू इन वन असा ओपो पराठा बनवला. आपण सगळेच असे वेगवेगळे कॉम्बिनेशन बरेचदा करतो...वेगळे काही करण्यातली मजा आणि चवितला फरक याने कितीतरी नवे पदार्थ तयार होतात. Preeti V. Salvi -
मेथी पनीर स्टफ पराठा (methi paneer stuffed paratha recipe in marathi)
#EB1#w1#मेथीपनीरपराठारेसिपी ई-बुक चॅलेंज साठी मेथी पनीर स्टफ पराठा रेसिपी तयार केली . घरात मेथीची भाजी आवडीने खात नसेल तर अशा प्रकारचा पराठा तयार करून दिला तर आवडीने खाल्ला जातो आणि त्यामुळे मेथी आहारातून घेतली जाते. मेथीची पालेभाजी ही आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे मग आहारातून घेण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आपण पदार्थ तयार करतो त्याच प्रकारे मी पराठा ही रेसिपी मेथीची भाजी खावी यासाठी खास तयार करते आणि माझ्याकडे हा पराठा खूप आवडीने खाल्ला जातो.तर तुम्ही पण हा पराठा नक्कीच ट्राय करून बघा रेसिपी तून बघा कशाप्रकारे तयार केला Chetana Bhojak -
पनीर भुर्जी (सात्विक) (paneer bhurji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 पनीर भुर्जी ही एक द्रुत रेसिपी आहे, बनवण्यास सोपी आणि खूप रुचकर आहे.पनीर भुरजी ही एक अतिशय लोकप्रिय भारतीय डिश आहे आणि ते तयार करणे अगदी सोपे आहे. हे रोटी, तांदूळ, ब्रेड बरोबर सर्व्ह करता येते किंवा साईड डिश म्हणून देता येते. जर पनीर तयार असेल तर ते सुमारे 15 मिनिटांत तयार केले जाऊ शकते. Amrapali Yerekar -
पनीर फ्लॉवर पराठा (paneer flower paratha recipe in marathi)
#पराठापराठे पंजाब मध्ये अनेक प्रकारे बनवले जातात. दिल्लीमधील पराठे वाली गली तर प्रसिद्ध आहे. निरनिराळ्या प्रकारचे पराठे तिथे मिळतात.त्यातील रबडी पराठा आणि फ्लॉवर पराठा माझ्या आवडीचे. आज मी ब्रेकफास्ट साठी फ्लॉवर पराठा केला आहे. Shama Mangale -
शेंगदाणे चिक्की चे मोदक (shengdane chikki che modak recipe in marathi)
#cooksnap#modak#उपवासआज अंगारिका चतुर्थी निमित्त शेंगदाण्याची चिक्की ही रेसिपी आपल्या ऑथर pragati Hakim यांची रेसिपी बऱ्याच दिवसांपासून सेव करून ठेवली होती आज ती रेसिपी बनवण्यासाठी योग जुळून आला. अंगारिका चतुर्थीनिमित्त गणपतीला नैवेद्यासाठी काही चिक्की ही बनवली आणि काही मोदकही बनवून नैवेद्य दाखवले. गुळापासून तयार केलेला प्रसाद नैवेद्यासाठी तयार केला.धन्यवाद प्रगती ताई छान रेसिपी दिल्याबद्दल सेव करून ठेवल्यामुळे मी आज पाहून फॉलो करून झटपट तयार करू शकलीएक वेगळा घटक वापरून तयार केली.रेसिपी खूपच छान झाली आहे धन्यवाद Chetana Bhojak -
हैद्राबादी डोसा मसाला पावडर (hyderabadi dosa masala powder recipe in marathi)
#GA4 #WEEK13#KeywordHyderabadiहैद्राबादी रेसिपीज अतिशय मसालेदार,तिखट आणि तर्रीदार असतात.खूप नजाकतीने आणि मसाल्याच्या पदार्थांचा मुबलक वापर केलेल्या खमंग हैद्राबादी रेसिपीज पाहिल्यावरच तोंडाला पाणी सुटते!डेक्कन क्युझिन्स म्हणूनही या रेसिपीज भारतभर प्रसिद्ध आहेत.प्रामुख्याने सुक्या लाल मिरच्या,धणे,चिंच हे दाक्षिणी पदार्थात आवर्जुन घातले जातात,त्यामुळे उत्तरभारतातील रेसिपींपेक्षा या एकदम खट्ट्यातिख्या चवीच्या लागतात. हैद्राबादी डोसा मसाला पावडर म्हणजे गन पावडर...पण बंदुकीच्या गोळ्यांची पावडर नाही बरं का!....तर ही आहे डोसा करताना चमचमीत आणि डोशाची रंगत वाढवणारी झणझणीत अशी मसाला पावडर!!हैद्राबादी मसाला डोशावर ही हमखास भुरभुरतातच! तव्यावर डोसा असतानाच भरपूर "बटर मारके"... मग त्यावर ही गन पावडर पसरवून मग डोसाभाजी भरुन डोसा खाणं एक पर्वणीच असते.,,😋 हीच हैद्राबादी मसाला पावडर गन पावडर किंवा पोडी चटणी म्हणूनही दक्षिणेकडे जास्त वापरली जाते.ही तुम्ही तेल,तूप घालूनही डोसा किंवा इडलीबरोबर खाऊ शकता.अगदी पोळीबरोबरही चालू शकते.बिसीबेळी भातातही ही मसाला पावडर तुम्ही घालू शकता.या मसाला पावडरीची आंबटतिखट अशी जीभेवर रेंगाळणारी चव नक्कीच डोसा,इडली,उत्तप्पा,बिसिबेळी भात यांची रंगत वाढवते.एखादी छोटी बरणी भरुन करुन ठेवल्यास ऐनवेळच्या कोरड्या चटणीचाही पर्याय आपल्या स्वयंपाकघरात तयार ठेवता येतो. मी घेतलेल्या प्रमाणानुसार साधारण अर्धाकिलो एवढी ही मसाला पावडर तयार होते.तुम्हीही करुन पहा....चव नक्कीच आवडेल!!👌👌 Sushama Y. Kulkarni -
कढईतली तंदुरी रोटी (kadhai tandoori roti recipe in marathi)
#goldenapron3#week18#rotiह्या रोटी ची गोष्ट अगदी सोपी आहे। लोकडाऊन मध्ये चपाती केली, फुलके केले नान केले पण लेका ने तंदुरी रोटी मागितली। पण घरात तंदूर नाही म्हणून तंदुरी रोटी करायची कशी? माज बसळपण पंजाबी लोकान मध्ये गेलं। आई जिथे राहते तिठे 80 टक्के वस्ती म्हणजे पंजाबी। ती लोका स्वतः चा एक तंदूर बनवतात आणि नॉनव्हेज असला की दरेक जण आपल्या घरी तंदुरी रोटी कराहायचे। तसा तंदूर चा आकार कढई सारखा अर्थात कढई च कड म्हणजे तंदूर तेंव्हा मी कढई मध्ये तंदुरी रोटी try केली आणि अखेर जमली बुआ। Sarita Harpale -
चीज गार्लिक ब्रेड (cheese garlic bread recipe in marathi)
#बटरचीजगार्लिक ब्रेड बहुतेक सगळ्यांना आवडतो. आणि तो जर घरी बनवलेला असेल तर सोने पे सुहागा. ओव्हनमध्ये गार्लिक ब्रेड भाजताना बटर आणि लसणीचा दरवळ घरभर पसरतो आणि सगळे जण ओव्हन चा टायमर बंद व्हायची वाट बघत बसतात.गार्लिक ब्रेड ची कृती पावासारखीच असते. आणि दुसऱ्या वेळेला पीठ फुलायला लागत नसल्यामुळे पावापेक्षा लवकर होणारी कृती आहे. गार्लिक ब्रेड मध्ये बटर अगदी सढळ हाताने घालावं लागतं. नाहीतर ब्रेड सुका होतो. Sudha Kunkalienkar -
एगलेस फ्रेंच चॉकलेट टोस्ट (eggless french chocolate toast recipe in marathi)
#GA4#week23#toast#एगलेसफ्रेंचचॉकलेटटोस्टगोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये toast हा कीवर्ड बघून रेसिपी बनवली. हा टोस्ट मी पहिल्यांदाच घरी बनवला या कीवर्ड मुळे मला वेगळं काही बनवण्याची आयडिया आली की आपण हे बनवून बघायचा आणि घरी ही डिश कशी तयार होते आणि खूप छानही झाली टेस्टी हि झाली आहे फ्रेंच चॉकलेट टोस्ट हा मूळ जर्मन ब्रेकफास्ट डिश आहे हळूहळू ती फ्रान्स, यु एस ए सगळीकडे प्रसिद्ध झाली ही डिश ब्रेकफास्टमध्ये घेतात या डिशमध्ये अंडा वापरला जातो अंड्याचे बॅटर करून त्यात ब्रेड डीप करून त्याला तव्यावर टोस्ट करून त्याच्यावर सिरप फ्रुट्स असे गार्निशिंग करून हे नाश्त्याच्या प्रकारात घेतात. आपल्या भाषेत बोलायचे तर गोड ब्रेड पकोडा.यात दोन तीन दिवसाचा उरलेला शिळा ब्रेड वापरला तर अजून छान होते . भारतात ही डिश क्लब, कॅफे हाऊस, टीहाऊस, कॅन्टींग या ठिकाणच्या मेनूमध्ये आपल्याला दिसतो छानसे डेझर्ट म्हणूनही आपण हे एन्जॉय करू शकतो. व्हेजिटेरियन साठी डिश कशाप्रकारे तयार केली ते नक्कीच रेसिपी तून बघा या डिशमध्ये स्लाईस ब्रेड वापरला जातो. बाहेर वाफल्स म्हणून आपण जे खातो तसा हा टेस्ट लागतो. न्यूट्रीला चॉकलेट स्प्रेड अजून वेगळ्या प्रकारचे स्प्रेड ही बाजारात मिळतात तेही आपण वापरू शकतो इथे मी सिरप युज केले आहे. रेसिपी नक्कीच एक बघा. Chetana Bhojak -
तंदुरी बटर रोटी (tandoori butter roti recipe in marathi)
#GA4#week19#तंदुरीबटररोटी#तंदुरीगोल्डन एप्परण 4 च्या पझल मध्ये तंदूर हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली. तंदुरी रोटी म्हटली म्हणजे फक्त धाबा ,रेस्टॉरंट, हॉटेल डोक्यात येतात जेव्हा आपण रेस्टॉरंट मध्ये जेवायला जातो . मेनू कार्ड मध्ये आपण भाज्यांचा सिलेक्ट करायला खूप वेळ घेतो पण न बघता रोटी ही आपली डिसाईड असते सगळ्याची आवडती ही तंदुरी रोटी पहिलेच हीची ऑर्डर जाते . बाहेर जेवायला जायचे म्हणजे तंदूर ही पहिली आवड सगळ्यांचे असते. कारण हा प्रकार घरात रोजच्या जेवणात मिळत नाही . पण कधीतरी घरच्या मेनू तही आपण बाहेर सारखी टेस्ट देऊ शकतो. तंदूर हे एका प्रकारचे स्टोव्ह असते ते एका टेंपरेचर वर चालते त्या टेंपरेचर मध्ये त्या वस्तू बनवल्या जातात. ही खूपच जुनी अशी पद्धत आहेआजही आपल्याला बघायला आणि त्यातल्या वस्तू खायला मिळतात. त्याचा टेस्टही खूप छान लागतोबऱ्याच वेळेस आपण असे म्हणतो प्रत्येकाच्या हाताची वस्तू चा टेस्ट हा असतो, पण मला तसे नाही वाटत मला असे वाटते ते त्याठिकाणची भांडी त्याठिकाणची बनवण्याची पद्धत त्यांची स्टोव्ह , हाय फ्लेमवर ते काम करतात हे त्या गोष्टींचा टेस्ट वर अवलंबून असते तेच त्या टेस्टवर आपल्याला मिळतोपण आपण प्रयत्न नक्कीच करू शकतो घरी बनवण्याचा तसा प्रयत्नही केला आहे नक्कीच रेसिपी बघा नक्कीच घरी बनवू शकतो. तंदुरी बटर रोटी सोप्या पद्धतीने घरी बनु शकतो . Chetana Bhojak -
आलू पराठा (Aloo paratha recipe in marathi)
सर्वांना आवडणारा, झटपट होणारा असा हा पराठा. Sujata Gengaje -
पेरु डिलाईट (peru delight recipe in marathi)
#tmr#30_मिनीट_रेसिपी_चँलेंज#पेरु_डिलाईट..😍😋 पेरुचं नाव काढलं की लहानपणीचं बडबड गीत आठवतंच..मिठू मिठू पोपट ..आहे मोठा चावट..पेरु खातो कच्चा ..बाळाला म्हणतो लुच्चा..😀..तसंच लहानपणी पेरूची फोड असा एक धडा होता. एक पेरू असतो आणि त्याच्या सहा फोडी होतात. मग आईला फोडच राहत नाही. मग प्रत्येक मुलगा आपल्यातील एक फोड आईला देतो, मग आईकडे एक नाही तर तीन फोडी होतात. ही गोष्ट सांगण्यामागे एक कारण आहे. या गोष्टीतून आपण शेअरिंग आणि केअरिंग शिकतो. पण पेरूची फोड केली तरी ती तुम्ही एकट्यानेच खाल्ले पाहिजे. त्याचे कारणही तसेच आहे. पेरू हे आरोग्यासाठी खूप चांगले फळ मानले जाते. ते थंड फळ आहे. पोटाच्या विकारांना दूर करण्यासाठी हे रामबाण इलाज म्हणून पाहिले जाते. पेरूच्या सेवनाने बद्धकोष्टाची समस्या दूर होते. याच्या बियांचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. पेरूमध्ये व्हिटामिन सीचे मुबलक प्रमाण असते. त्यामुळे अनेक आजारात फायदा होतो. आयुर्वेदात पेरू आणि त्याच्या बियांच्या सेवनाचे अनेक लाभ देण्यात आले आहे. पेरू कापून संपूर्ण खाण्यामागचा तर्क तरी काय...पेरूच्या बिया या गुणकारी असतात. त्यांच्या सेवनाने म्हणजे या चावून खाल्ल्याने शरिरातील लोहाची पूर्तता होते. तसेच या खाल्याने बद्धकोष्टाची समस्या दूर होते. पेरू कापून पूर्ण खाल्ला पाहिजे. त्याला कोणासोबत शेअर केला नाही पाहिजे. जाणकारांनुसार पेरूतील एक अशी बी असते की जी संपूर्ण थंडीमध्ये तुम्हांला सर्दी पडशापासून दूर ठेवते. तसेच ही बी खाल्याने तुमची रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यात मदत होते. म्हणूनच पेरुचे पंचामृत, पेरुचे लोणचे,पेरुची चटणी,पेरुची कोशिंबीर,पेरुची भाजी,पेरुच्या वड्या,पेरुचं आईस्क्रीम, पेरुचा juice या गोष्टी आपण आपल्या आहारात ठेवणे Bhagyashree Lele -
मसाला रोटी (masala roti recipe in marathi)
#GA4 #week25 #Roti - कीवर्ड# मसाला रोटी (पराठा ) Rupali Atre - deshpande -
मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#मेथी_पराठामेथी ही पालेभाजी बहुगुणी आहे. नुसती भाजी खायला काही जणांना आवडत नाही. मग असे पराठे केले कि आवडिने खातात. मेथी पराठा रेसिपी खालील प्रमाणे 😊👇 जान्हवी आबनावे -
डोनट विदाउट यीस्ट (donut recipe in marathi)
#डोनट #सप्टेंबरडोनट हा एक प्रकारचा तळलेला गोल आणि गोड पदार्थ आहे. डोनट बर्याच देशांमध्ये लोकप्रिय आहेत. आणि विविध प्रकारात गोड स्नॅक म्हणून तयार आहे जो घरी बनविला जाऊ शकतो किंवा बेकरी, सुपरमार्केट, फूड स्टॉल्स वर मिळतो. Prachi Phadke Puranik -
राजस्थानी खोबा रोटी आणि डाळ (rajasthani khoba roti ani dal recipe in marathi)
#GA4#week25#khobaRoti#Rajasthaniगोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये Rajasthaniहा कीवर्ड बघून रेसिपी बनवली. आपल्या भारतीय आहारातला सर्वात महत्वाची धान्य म्हणजे गहू आहेपूर्ण भारतभर गव्हापासून तयार केलेली पोळी वेगवेगळ्या पद्धतीने आहारातून घेतली जातेभारतातला एक राज्य राजस्थान तिथे खोबा रोटी आणि डाळ अशा प्रकारचे जेवण घेतले जाते. राजस्थानचा खोबा रोटी आणि हा डाळ प्रकार खूप फेमस आहे तिथल्या खाद्यसंस्कृती गव्हाची पोळी आहारातून जास्त घेतली जाते तिथे भात जास्त करून खात नाही मूग मुगाची डाळ हे जास्त आहारातून घेतात याचे पीकही राजस्थान मध्ये भरपूर होते. उपलब्ध असतात पण छोट्या गावांमध्ये पारंपारिक पद्धतीने आहार घेण्याची खाद्यसंस्कृती आजही आहे गव्हाच्या पीठा पासून खोबा रोटी तयार केली जाते बऱ्याच पद्धतीने तयार करता येते एक जाड पोळी लाटून तिथे चिमटे घेऊन खोबा रोटी तयार केले जाते एक तव्यावरच अर्धवट भाजून तव्यावर चिमटे घेऊन रोटी तयार केली जाते. Chetana Bhojak -
डोनेट (donuts recipe in marathi)
या रेसिपीसाठी यीस्ट मी घरीच बनवले आहे. तयार यीस्ट ही वापरू शकता. हा अमेरिकेतील पदार्थ आहे.तिकडे ब्रेड, केक डोनेट इ.पदार्थ जास्त खाण्यासाठी वापरतात. आपल्याकडेही लहान मुलांना डोनेट खूप आवडतात.मी नेहमी अंड,बेकिंग पावडर यांचा वापर करून डोनेट करते.यावेळी वेगळया पद्धतीने केले. Sujata Gengaje -
मलई कोफ्ता करी (malai kofta curry recipe in marathi)
#rr बटाटा, पनीर, कांदा आणि टोमॅटो प्युरीसह बनवलेली ही अतिशय प्रसिद्ध आणि स्वादिष्ट नॉर्थ इंडियन क्रीमी करी रेसिपी आहे. उत्तर भारतीय पाककृतीमधील ही क्रीमयुक्त करी रेसिपी आपण रोटी किंवा भातासह सर्व्ह करू शकतो. सुप्रिया घुडे -
प्रॉन्स पेस्टो पिझ्झा (prawns pesto pizza recipe in marathi)
#GA4 #Week2#Spinach आणि #Fenugreek हे किवर्ड्स ओळखून मी हा पिझ्झा बनवला आहे चवीला खूप छान झाला आहे. तुम्हीही नक्की करून बघा.. Ashwini Jadhav -
मठरी/निमकी (mathri / nimaki recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी 4#मठरी# दिवाळी सुरु होण्याच्या आधीपासूनच, यावेळी मधुरा रेसिपीज मध्ये सांगितल्याप्रमाणे मठरी बनविण्याचे ठरविले होते. त्यानुसार यावेळी ही मठरी किंवा नीमकी बनवलेली आहे. चवीला खूपच छान आणि खुसखुशीत झालेली आहे. Varsha Ingole Bele -
तंदुरी गार्लिक रोटी (tandoori garlic roti recipe in marathi)
#EB12 #W12हाॅटेल मध्ये जेवणात रोटी घेतली जाते. हि रोटी मैद्यापासून बनवलेली असते. आज आपण गव्हाच्या पिठापासून हि रोटी बनवणार आहोत. चला तर मग बनवूयात तंदुरी गार्लिक रोटी. Supriya Devkar -
भोगी स्पेशल भाकरी (bhogi special bhakhri recipe in marathi)
#मकर#भोगीस्पेशलभाकरी#भाकरीसंक्रांतिच्या आधी भोगी त बनवली जाणारी भाजी, आमटी, चटणी ,झुणका, पिठलं,बरोबर भाकरी छान लागते. भाकरीबरोबर त्याची चव वेगळी लागते ती चव पोळीबरोबर नाही येत भाकरी हा प्रकार सगळ्यासाठी खूपच उत्तम आहे याचे बरेच फायदे आपल्याला माहीतच आहे आज सगळेच भाकरी खावी असे समजून गेले आहे . हाय फायबर असल्यामुळे पचायलाही खूप हलकी असते शिवाय डायटिंग करणाऱ्यांसाठी ग्लुटेन फ्री असते. तुम्ही बऱ्याचदा बघितले असेल ब्रेड, बंन ,पाव यावर तीळ लावलेली असते हे झाले विदेशी ब्रेड, ही भाकरी आपला देसी ब्रेड आहे.भाकरीचे बरेच प्रकार बनवले जातात ज्वारी,बाजरी, तांदूळ , नाचणी, मिश्र पिठाची भाकरी असे बरेच प्रकारे बनवली जाते अमुक भाज्या असतात त्या भाकरी बरोबर छान लागतात. रात्रीच्या जेवणात भाकरी शरीरासाठी उत्तम असते. मी भोगीच्या भाजीबरोबर ज्वारीची भाकरी तीळ लावून केली आहे. Chetana Bhojak -
इडली सांबार चटणी (idli sambar chutney recipe in marathi)
#GA4# week 7Breakfast ब्रेकफास्ट थीम नुसार. इडली सांबार चटणी बनवीत आहे आज नाश्त्याला काय बनवावे हा मोठा प्रश्न माझ्या डोळ्यापुढे उभा राहिला, मग मी खूप विचार केला मग एकदम माझ्या मनात विचार आला की चला आज इडली सांबार बनवूया जे की आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते . इडली हा प्रामुख्याने दक्षिण भारतामध्ये बनवला जाणारा पदार्थ आहे. इडली हलकी फुलकी असल्याने पचायला हलकी असते मी इडली,तांदूळ आणि उडीद डाळीचा आणि रव्याचा समावेश करून बनवली आहे.इडलीमध्ये तेलाचा वापर नसतो. त्यामुळे कॅलरीज कमी असतात. फॅट्स आणि कोलेस्टेरॉलही नसल्याने इडली हा एक उत्तम हेल्दी नाष्टा आहे. rucha dachewar -
फलाफल पीटा पॉकेट (falafal pita packet recipe in marathi)
#GA4#week6#falafal#फलाफलपीटापॉकेट#फलाफल#chickpea#pittapocet#falafalpittapocetगोल्डन अप्रन 4 च्या पझल मध्ये chickpea हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली. Chickpes /काबुली पांढरा चना ,फलाफल ही डिश बनवली."पीटा पॉकेट फलाफल" हे मिडिल ईस्ट ,साउथ ईस्ट यूरोपदेशांमध्ये खाल्ला जाणारा खाद्यपदार्थ आहे .फलाफल हे काबुली चना पासून बनवलेले डिपफ्राय बॉल आहे. व्हाईट काबुली चण्याचे मिक्चर पासून बॉल किंवा पेटीसच्या शेपमध्ये आपण फलाफल बनवून डिपफ्राय स्नॅक्स मधून देऊ शकतो. आपल्या भाषेत या डिश ला आपण छोले पॅटीस असे म्हणू शकतो .पिटा ब्रेड मध्ये फलाफल स्टफ केले जाते तीन प्रकारचे सॉस अशाप्रकारे पिटा ब्रेड तयार करून स्नॅक्स तयार होते त्याला"फलाफल पिटा ब्रेड विथ ताहिनी सॉस "असे म्हणतात.मी पिटा ब्रेड, फलाफल, हम्मस ,ताहिनी सॉस,तज़तजीकी सॉस हे सगळे रेडी केले आहे.एक वेळेस पूर्ण तयारी करून फक्त स्टफिंग करून आपल्याला तयार करता येतो. टेस्ट पण छान लागतो.एन्जॉय पीटा पॉकेट काही वेजिस आणि सॉस स्टफ करुण एक हेल्दी स्नैक्स आपन घेऊ शकतो .होममेड पीटाब्रेड &फलाफल पीटा पॉकेटतज़तजीकी सॉस Chetana Bhojak -
मिस्सी रोटी (missi roti recipe in marathi)
#GA4#week25Keyword- Rotiमिस्सी रोटी ही नेहमीच्या पोळी/रोटी पेक्षा थोडी वेगळी आणि चविष्ट..😊कांदा ,कसूरी मेथी ,बेसन ,गव्हाचं पीठ आणि इतर मसाल्याचं काॅम्बीनेशन असलेली ही चविष्ट रोटी,नाश्त्यासाठी एक छान ऑप्शन आहे. Deepti Padiyar
More Recipes
टिप्पण्या (18)