आंबटचुका डाळभाजी (ambat chuka dal bhaji recipe in marathi)

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
Nagpur

#पावसाळी भाज्या # या दिवसात आंबटचुका ही पालेभाजी मिळते. या भाजीचे बेसन / पिठले , डाळ भाजी बनवतात. मी आज डाळ भाजी बनविली आहे. ही भाजी मुळातच आंबट असल्यामुळे त्यात पुन्हा काही आंबट टाकण्याची गरज पडत नाही. यात मी फक्त तूर डाळ वापरली आहे. आपण इतरही डाळी, एक किंवा अनेक वापरू शकतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीतूर डाळ
  2. 1/2 पावआंबट चुका भाजी
  3. थोडे ओल्या नारळाचे काप
  4. 2हिरव्या मिरच्या
  5. 1 टेबलस्पूनतेल
  6. 1 टीस्पूनजीरे मोहरी
  7. 1 टेबलस्पूनशेंगदाणे
  8. कढीपत्ता
  9. 1 टीस्पूनहळद
  10. 1 टेबलस्पूनतिखट किंवा चवीप्रमाणे
  11. 1/2 टीस्पूनमसाला
  12. चवीनुसारमीठ
  13. लहानगुळाचा खडा

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    आंबटचुका निवडून स्वच्छ धुवून, चिरून घ्यावा. तुरीची डाळ नीवडून धूवून घ्यावी. कूकरच्या भांड्यात, डाळ, त्यात आंबट चुक्याची भाजी, हिरव्या मिरच्या उभ्या चिरून, खोबऱ्याचे काप घालून, गरजेनुसार पाणी टाकावे. आणि कुकरमध्ये शिजवून घ्यावे.

  2. 2

    कुकर थंड झाल्यावर, शिजलेली डाळ भाजी घोटून घ्यावी.

  3. 3

    आता गॅसवर कढई मध्ये तेल घालून ते गरम झाल्यावर, त्यात जीरे मोहरी टाकावी. शेंगदाणे, कढीपत्ता, आणि हिंग टाकावा. अर्धा मिनिट परतून घेतल्यावर त्यात हळद, तिखट आणि मसाला टाकावा.

  4. 4

    मिक्स करून त्यात घोटलेली डाळ भाजी टाकावी. आवश्यकतेनुसार पाणी टाकावे. चवीनुसार मीठ आणि गुळ टाकावा. आणि दोन तीन मिनिट उकळावे. गॅस बंद करावा.
    मस्त गरमागरम भाजी, पोळी किंवा भाकरी सोबत खाण्यासाठी तयार आहे...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
रोजी
Nagpur

Similar Recipes