बिना तेलाची मिसळ (misal recipe in marathi)

Supriya Deshmukh-Ekambikar
Supriya Deshmukh-Ekambikar @Supriyasrecipes

बिना तेलाची मिसळ (misal recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

पंधरा मिनिट
4 ते 5 लोकांसाठी
  1. 150 ग्रॅममोड आलेली मटकी
  2. 1/2 खोबळा खोबरे
  3. 3 लवंग
  4. दालचिनीचा तुकडा
  5. 3 काळीमिरी
  6. 2कांदे
  7. 2टोमॅटो
  8. 1 इंच आल्याचा तुकडा
  9. छोटा लसणाचा गड्डा
  10. कडीपत्ता कोथिंबीर
  11. धने जीरे
  12. हिंग
  13. हळद लाल तिखट
  14. कांदा लसूण मसाला

कुकिंग सूचना

पंधरा मिनिट
  1. 1

    सर्वात प्रथम 2 टोमॅटो, 2कांदे, अर्धा खोबऱ्याचे वाटी, छोटा लसणाचा गड्डा, आणि आलं या सगळ्या गोष्टी ज्याप्रमाणे भरताचे वांगे भाजतो. त्याच प्रमाणे व्यवस्थित असे सर्व जिन्नस भाजून घ्यायचे आहे. हे सगळे जिन्नस भाजून झाल्यावर वरचे काळे कव्हर काढून ते थंड करायला साईडला ठेवायचे आहे. एका पॅनमध्ये 3लंवगा,3काळी मिरी, तमालपत्र अर्धे पान या गोष्टी व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत, त्यानंतर अर्धा टेबलस्पून जीरे आणि धने पण भाजून घ्यायचा आहे हा सर्व खडा मसाला व्यवस्थित मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे.

  2. 2

    यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यात टोमॅटो कांदे लसूण आलं व्यवस्थित वाटून घ्यायचे आहे. अशी पेस्ट बनवून घ्यायचे आहे पॅन गॅसवर ठेवा ही पेस्ट व्यवस्थित अशी परतून घ्यायचे आहे 10 मिनिट नंतर हे मिश्रण थोडे कोरडे झाल्यावर यामध्ये हिंग हळद लाल तिखट, उसळ मसाला हे मसाले घालून मिश्रण परत मिक्स करावे नंतर मोड आलेली मटकी घालून चवीनुसार मीठ घालावे. आणि उकळलेले पाणी घालावे.

  3. 3

    साधारणतः दीड लिटर पाणी लागते. छान उकळी आल्यावर मटकी शिजल्यावर रेडी होते. सर्व्हिंग प्लेटमध्ये मस्त मिसळ रस्सा, फरसाण कांदा कोथिंबीर लिंबू.

  4. 4

    Channel name: supriyas recipes
    या यूट्यूब चैनल वर जाऊन ही रेसिपी पाहू शकता

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Supriya Deshmukh-Ekambikar
Supriya Deshmukh-Ekambikar @Supriyasrecipes
रोजी

Similar Recipes