चुरमा मोदक (churma modak recipe in marathi)

Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
मुंबई

#gur

#चुरमामोदक

बऱ्याच वर्षापासून गणेश चतुर्थी मी उत्साहाने भावभक्तीने साजरी करते
आता बदलत्या परिस्थितीनुसार विचारात आणि आपल्या भावभक्ती तही बदलाव करायला पाहिजे मागच्या दोन वर्षापासून आपण महामारी ने झटत आहोत ही महामारीत आपन बऱ्याच आपल्या लोकांना गमावले आहे आणि ही महामारी आपल्याला बरंच काही शिकून गेली आहे त्यामुळे मी गणेश मूर्ति मातीची बसवण्याचे बंद केले आणि घरातल्या चांदीच्या गणपतीचे दहा दिवस सेवाभावाने भक्तिभावाने पूजा करण्याचे ठरवले आहे
खूप काही न करता आता फक्त भाव ठेवून गणेश उत्सव साजरे करायचे ठरवले आहे
गणेश चतुर्थीच्या दिवशी पहिल्या दिवशी गणपती स्थापनेच्या दिवशी चुरमा लाडू तयार केला जातो मी लाडू न करता सुरमा मोदक बनवले आहे रेसिपीतून नक्कीच बघा कशाप्रकारे चूरमा मोदक तयार केले

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
11 व्यक्ति
  1. 1 कपगव्हाचे पीठ
  2. 1/4 कपरवा
  3. 1 कपगूळ
  4. 2 टेबलस्पूनतेल मोहन साठी
  5. 2 कपसाजूक तूप तळण्यासाठी
  6. 1/2 टीस्पूनइलायची पावडर
  7. 1/4 टीस्पूनजायफळ पावडर

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    सर्वात आधी एका बाउल मधे गव्हाचे पीठ आणि रवा काढून घेऊ मिक्स करून त्यात तेलाचे मोहन टाकून देऊ

  2. 2

    आता हळूहळू त्यात पाणी टाकून कडक असे पीठ लावायचे

  3. 3

    हाताने ओवल शेपमध्ये मुठीये तयार करायचे

  4. 4

    आता काढाइत साजूक तूप गरम करून त्यात मुठीये हळूहळू मंद आचेवर लाल रंगावर तळून घ्यायचे

  5. 5

    तळलेले मुठीये एका बाऊलमध्ये तोडून कुस्करून घ्यायचे

  6. 6

    आता मिक्सरच्या छोट्या पॉट मध्ये मुठीये चा चुरा टाकून मिक्सरमध्ये पावडर तयार करून चूरमा करून घेऊ

  7. 7

    आता हा चुरमा पूर्ण एका बाऊलमध्ये काढून आता
    त्यात जायफळ पावडर इलायची पावडर टाकून घेऊ आणि मिक्स करून घेऊ
    गुळ मोजून काढून घेऊ

  8. 8

    तळलेल्या तूपातच अजून तूप टाकुन त्यात गूळ टाकून देऊन गूळ व्यवस्थित वितळल्यावर पाक तयार होतो

  9. 9

    तयार पाक चुरमात टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊ

  10. 10

    थोड्यावेळाने हातावर घेऊन मोदक तयार करून घेऊ

  11. 11

    तयार मोदक गणपतीला नैवेद्य दाखवून

  12. 12

    तयार आपले चुरमा मोदक

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
रोजी
मुंबई
Cooking is an art which touches heart and lives across the globe with all mankind.Follow my page on Instagram_cuisine _culture _
पुढे वाचा

Similar Recipes