मुगाचे लाडू (moongache ladoo recipe in marathi)

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
Dadar..Mumbai

#gur
#गणेशोत्सव_स्पेशल_रेसिपी_चँलेंज
#मुगाचे_लाडू...😋

गणपती बाप्पा मोरया 🙏🌺🙏

गणेशोत्सवाच्या तुम्हां सर्वांना मंगलमय शुभेच्छा 💐🌹

जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
तुझे गुण वर्णाया मज कैंची स्फूर्ती ॥ ध्रु० ॥

नानापरिमळ दूर्वा शमिपत्रें ।
लाडू मोदक अन्नें परिपूरित पातें ।
ऐसें पूजन केल्या बीजाक्षरमंत्रें ।
अष्टहि सिद्धी नवनिधि देसी क्षणमात्रें ॥१॥

तुझे ध्यान निरंतर जे कोणी करिती ।
त्यांची सकलहि पापें विघ्नेंही हरती ॥
वाजी वारण शिबिका सेवक सुत युवती ।
सर्वहि पावुनि अंती भवसागर तरती ॥ जय देव० ॥ २ ॥

शरणागत सर्वस्वे भजती तव चरणीं ।
कीर्ति तयांची राहे जोंवर शाशितरणी ॥
त्रैयोक्यों ते विजयी अद्भुत हे करणी ।
गोसावीनंदन रत नामस्मरणीम ॥ जय देव जय देव० ॥३॥

गणपतीच्या या आरती मध्ये बाप्पाला आवडणार्या ,प्रिय असणार्या सर्व गोष्टींचं वर्णन केलंय..माझा बाप्पा येणार म्हणून मोदकांबरोबरच त्यांच्या आवडीचे लाडू केलेत..यावर्षी मी मुगाचे लाडू केले आणि बाप्पाला नैवेद्य दाखवला..😍देवाला आवडणारे पदार्थ स्वतः च्या हाताने करुन देवाला अर्पण करण्यात खूप सुखसमाधान असतं..शेवटी काय देव भावाचा भुकेला..😊😊
बोला गणपती बाप्पा मोरया 🙏🌺🙏

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30-40 मिनिटे
12-15 लाडू
  1. 1 कपमूगडाळ
  2. 5 टेबलस्पूनसाजूक तूप
  3. 100 ग्रामपिठीसाखर कमी अधिक आवडीनुसार
  4. 1/4 कपदूध
  5. वेलची पावडर
  6. काजू बदाम पिस्ता तुकडे आवडीनुसार

कुकिंग सूचना

30-40 मिनिटे
  1. 1

    प्रथम एका कढईत एक टेबलस्पून तूप घालून मुगडाळ लालसर भाजून घ्यावी.

  2. 2

    नंतर गार झाल्यावर मिक्सरमध्ये किंचीत जाडसर वाटून घ्या.

  3. 3

    आता एका कढई मध्ये तीन टेबलस्पून साजूक तूप घालून त्यामध्ये वरील मुगाचे पीठ घाला आणि पुन्हा मंद आचेवर खमंग वास सुटेपर्यंत मुगाचे पीठ बदामी रंगावर भाजून घ्या. हवे असल्यास यामध्ये थोडे तूप अजुन घालून पीठ छान भाजून घ्या.

  4. 4

    नंतर कढई खाली उतरवून त्यामध्ये पाव कप दुधाचा हबका मारा आणि सगळे पीठ व्यवस्थित एकजीव करा.

  5. 5

    नंतर पीठ कोमट असतानाच त्यामध्ये आवडीनुसार पिठीसाखर काजू-बदामाचे भरड घालू छान पैकी लाडू वळून घ्या.

  6. 6

    तयार झाले बापाला आवडणारे लाडू..बाप्पाला नैवेद्य दाखवून या मूग डाळीच्या लाडवांचा मनसोक्त आस्वाद घ्या.

  7. 7
  8. 8
  9. 9
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
रोजी
Dadar..Mumbai
trying new recipes n food photography both are kind of stress buster to me...Write ups,poems, reading, travelling ...my inner peace...😇
पुढे वाचा

Similar Recipes