हक्का नुडल्स (hakka noodles recipe in marathi)

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

हक्का नुडल्स (hakka noodles recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 3 लहानपॅकेट नुडल्स
  2. 2कांदे
  3. 1गाजर
  4. १२-१५ श्रावण घेवड्याच्या शेंगा
  5. 1मोठी वाटी कांदा पात
  6. 2 टेबलस्पूनटोमॅटो सॉस
  7. 1 टेबलस्पूनसोया सॉस
  8. 1 टेबलस्पूनरेड चिली सॉस
  9. २+१/२ टेबलस्पून तेल
  10. 1 टीस्पूनतिखट
  11. मीठ चवीनुसार
  12. 5-6लसूण पाकळ्या
  13. 1 इंचआलं
  14. 2हिरव्या मिरच्या

कुकिंग सूचना

३० मिनिट
  1. 1

    प्रथम सर्व भाज्या चिरून घेतल्या. आलं, लसूण, मिरची बारीक करून घेतले. मग गॅस वर एका पातेल्यात दीड लिटर पाणी घालून त्यात तेल व मीठ घातले.

  2. 2

    पाण्याला उकळी आल्यावर त्यात नूडल्स घातल्या. व त्यांचा कलर पालटे पर्यंत उकळून घेतल्या. व मग त्या चाळणीवर निथळून त्यावर थंड पाणी ओतून घेतले.

  3. 3

    आता गॅसवर कढईमध्ये तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला लसूण, आलं, मिरची घालुन परतले. मग कांदा घालून परतले. मग त्यात टोमॅटो सॉस, चिली सॉस व सोया सॉस तसेच तिखट व मीठ घालुन परतले. व मग त्यात गाजर, फरसबी व कांदा पात या भाज्या घालून परतून घेतले.

  4. 4

    आता त्यात वापरलेल्या मॅगी घातल्या व सर्व मिक्स करून हक्का नूडल्स तयार केल्या. वरून कांदा पात घालून गार्निश केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
रोजी
Nashik, Maharashtra

टिप्पण्या

Similar Recipes