हक्का नूडल्स (hakka noodles recipe in marathi)

Ashwini Anant Randive
Ashwini Anant Randive @Ashwini

#camb

सर्वांनाच प्रिय असणारे हक्का नूडल्स आमच्याकडे सुद्धा मुलांना खूप आवडतात. चला तर मग पाहूया त्याची रेसिपी

हक्का नूडल्स (hakka noodles recipe in marathi)

#camb

सर्वांनाच प्रिय असणारे हक्का नूडल्स आमच्याकडे सुद्धा मुलांना खूप आवडतात. चला तर मग पाहूया त्याची रेसिपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अर्धा तास
4 जणासाठी
  1. 200 ग्रामचे नूडल्स पाकीट
  2. 1/2 कपगाजर
  3. 1 कपकोबी
  4. 1/2 कपकांद्याची पात
  5. 1/2 कप ढोबळी मिरची
  6. 1/2 कप फ्रेंच बीन्स
  7. 1कांदा
  8. 2 चमचेटॉमॅटो सॉस
  9. 2 चमचेसोयासॉस
  10. 2 चमचेरेड चिली सॉस
  11. 1 चमचाव्हिनेगर
  12. 2 चमचेमीठ
  13. 2 चमचेतेल
  14. 1/4 चमचामिरपूड बरोबर
  15. 4-5लसूण पाकळ्या
  16. 1 इंचआले

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    सगळ्यात अगोदर कढईमध्ये 8 कप पाणी घेणे. पाण्याला उकळी आली की त्यामध्ये एक चमचा मीठ व एक चमचा तेल टाकणे. आता त्यात नूडल्स चे एक पाकीट फोडून टाकणे. 5 मिनीट नूडल्स उकळून घेणे.किंव्हा नूडल्स चा कलर थोडा बदल होई पर्यंत शिजवून घेणे.

  2. 2

    आता नूडस एका चाळणी मध्ये ओतून घेणे. त्यावर थंड पाणी सोडणे म्हणजे त्याची कुकिंग प्रोसेस स्टॉप होते.

  3. 3

    आता गाजर कोबी फ्रेंच बीन्स कांदा ढोबळी मिरची आपल्या आवडीनुसार उभे चिरून घेणे.आले लसूण सुद्धा बारीक कापून घेणे. आता कढई मध्ये तेल घेऊन त्यात हाय फ्लेमवर लसुन आले परतून लगेच त्यात कांदा गाजर फ्रेंच बीन्स कोबी ढोबळी मिरची थोडीशी परतून घेणे जास्त शिजवू नये. आता त्यात सगळे सॉस,मिरपूड आणि नूडल्स घालून परतून घेणे वरतून व्हींनेगर मीठ टाकणे. ही सर्व प्रोसेस हाय फ्लेम् वरच करणे.

  4. 4

    सर्व्ह करताना कांद्याची पात घालून
    सर्व्ह करणे. तयार आहेत खाण्यासाठी आपले हक्का नूडल्स.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ashwini Anant Randive
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes