झटपट व्हेज बिर्याणी सारखा पुलाव (veg biryani pulav recipe in marathi)

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar

#tmr
#३०_मिनिट_रेसिपी_चॅलेंज
#झटपट_व्हेज_बिर्याणी_सारखा_पुलाव
जर‌ कधीतरी असं झटपट मस्त चमचमीत बनवून खावंसं वाटलं, किंवा अचानक पाहुणे जेवायला येणार असतील तर आपण जेवण बनवताना भाताचा प्रकार सगळ्यात शेवटी बनवतो, म्हणजे गरमागरम वाढायला आणि खायला पण मजा येते. अशा वेळी व्हेज बिर्याणी बनवायची असेल आणि बिर्याणी बनवायला पुरेसा वेळ नसेल तर तशाच चविची अगदी झटपट तयार होणारी बिर्याणी आपण पुलावच्या सारखी बनवून सर्वांना खायला घालून खुष करु शकतो. यामधे भात आणि भाजी वेगळी बनवून त्याचा थरावर थर लावतो याची गरज नसते. पण चव मात्र अगदी‌ बिर्याणी सारखीच अफलातून येते. झटपट होणारी वन डिश मील म्हणून हा पदार्थ एकदम मस्तच आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
४ जणांसाठी
  1. २५० ग्रॅम तांदूळ
  2. 1/4 किलोफ्लॉवर
  3. १०० ग्रॅम हिरवे वाटाणे
  4. 10 ग्रॅमफरसबी
  5. 1गाजर
  6. 1सिमला मिरची
  7. 2कांदे
  8. 2टोमॅटो
  9. 2बटाटे
  10. 2 टीस्पूनकाजू
  11. 2 टेबलस्पूनतिखट पूड
  12. 2 टीस्पूनहळद
  13. 2 टेबलस्पूनबिर्याणी पुलाव मसाला किंवा गरम मसाला पावडर
  14. 2 टीस्पूनधणे जीरे पावडर
  15. 2 टेबलस्पूनमीठ३ टेबलस्पून तेल
  16. 1 टीस्पूनतेल
  17. 2 टीस्पूनकसूरी मेथी
  18. 2 टीस्पूनपुदिना पाने
  19. 2 टीस्पूनकोथिंबीर

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    फ्लॉवर, बटाटा. फरसबी. गाजर धुवून मग त्यांचे आवडीप्रमाणे लहान मोठे तुकडे करुन घ्यावे, त्यात तिखट पूड, हळद, बिर्याणी पुलाव मसाला, धणे जीरे पावडर आणि मीठ घालून मिक्स करुन मॅरिनेशन करण्यासाठी ठेवावे.

  2. 2

    भाज्या मॅरिनेट होईपर्यंत कांदा चिरुन मग कढईत तेल घालून त्यात फोडणीसाठी जीरे घालून तडतडल्यावर कांदा आणि काजू घालून थोडे ब्राऊन होईपर्यंत परतावे.

  3. 3

    मग त्यात बारीक चिरलेला टोमॅटो, सिमला मिरची घालून परतून त्यात तिखट पूड, हळद, बिर्याणी पुलाव मसाला, धणे जीरे पावडर आणि मीठ घालून मिक्स करुन, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना पाने तोडून घालावी.

  4. 4

    मग फेटलेले दही घालून मिक्स करुन जरा परतून त्यात मॅरिनेट केलेल्या भाज्या घालून परत जरा परतावे.

  5. 5

    भाज्यांमधे गरम पाणी घालून उकळी आल्यावर मगच धुतलेले तांदूळ घालावे. आधी तांदूळ घातले तर भात तळाला करपतो.

  6. 6

    वाटाणे घालून मिक्स करुन मग वरुन १ टीस्पून मरम मसाला आणि २ टीस्पून तुप घालून न ढवळता झाकण ठेवून शिजवावे.

  7. 7

    मस्त वाफाळलेला गरमागरम बिर्याणी सारखा पुलाव एका प्लेटमधे वाढून कोशिंबीर आणि पापड, लोणच्या बरोबर सर्व्ह करावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes