राघवदास लाडू/रवा खोबर्याचे पाकातले लाडू (rava pakatle laddu recipe in marathi)

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar

राघवदास लाडू/रवा खोबर्याचे पाकातले लाडू (rava pakatle laddu recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ तास
८ ते १० जणांसाठ
  1. 1 किलोझिरो नंबरचा अगदी बारीक रवा
  2. 1 वाटीओलं खोबरं मोठी दिड
  3. ६०० ग्रॅम साखर
  4. १५० ग्रॅम तुप
  5. 1 टेबलस्पूनवेलची पूड
  6. मनुका/बेदाणे
  7. पाणी

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    रवा थोडावेळ सुकाच भाजावा, यामुळे रवा हलका होतो. मग त्यात थोडं थोडं तुप घालून मंद आचेवर खरपूस भाजून घ्यावा.‌ मग त्यात ओलं खोबरं घालून परत ५ मिनिटे रवा खोबरं मिश्रण परतावे. खरपूस भाजल्या मुळे लाडवाची चव खूप छान खमंग येते. मग त्यात वेलची पूड घालून मिक्स करावे.

  2. 2

    कढईमधे साखरेच्या अर्धं पाणी घालून ढवळत ढवळत एक तारी पाक करावा. कढईमधला साखरेचा फेस येणं थांबलं की मग गॅस बंद करावा. पाकाचा एक थेंब जरा ‌गार करुन दोन बोटांच्या चिमटीत थेंबभर पाक धरुन बघावे. पाकाला एक बारीक तार येऊ लागल्यावर आपला पाक झाला आहे.

  3. 3

    साखरेच्या पाकात खरपूस भाजलेला रवा घालून पटापट ढवळावे,‌ नाही तर मिश्रण‌ सुके होते. जर मिश्रण जास्त सुकं झालं तर थोडसं पाणी शिंपडून मिश्रण एकत्र करावे.

  4. 4

    रवा खोबर्याचे खमंग लाडू वळावे. हे लाडू खायला फारच छान लागतात. पण खोबरं असल्यामुळे हे लाडू आठ दिवसांपेक्षा जास्त टिकत नाहीत. फ्रिज मधे हे लाडू पंधरा दिवस टिकतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
रोजी

Similar Recipes