मिक्स चिवडा भेळ (mix chivda bhl recipe in marathi)

Supriya Devkar
Supriya Devkar @cook_1983
Solapur

चिरमुरे भेळ तर आपण नेहमी खातोच मात्र घरामध्ये जर उपलब्ध चिवडे असतील वेगवेगळे तर आपण त्याचा वापर करून भेळ बनवू शकतो ही वेळ सुद्धा खूप सुंदर लागते चला तर मग आज बनवूयात मिक्स चिवडा भेळ.

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

15मिनिट
2प्लेट
  1. 2 वाटीभाजके पोहे चिवडा
  2. 1 वाटीभडंग
  3. 1 वाटीफरसाण
  4. 1टोमॅटो
  5. 1कांदा
  6. 1 वाटीचिंचेचा कोळ
  7. 2 टेबलस्पूनकोथिंबीर चिरलेली
  8. 1/2 टीस्पूनसैंधव मीठ
  9. 1/2 टीस्पूनचाट मसाला
  10. 1/2 टेबलस्पूनलाल तिखट किंवा मिरचीचा ठेचा

कुकिंग सूचना

15मिनिट
  1. 1

    सर्वप्रथम उपलब्ध असलेल्या चिवडा फरसाण चिरमुरे भडंग एकत्र करून घ्यावी आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा टोमॅटो कोथिंबीर हळद घालून घ्यावे

  2. 2

    तसेच यामध्ये लाल तिखट किंवा हिरव्या मिरचीचा ठेचा सैंधव मीठ चाट मसाला घालून घ्यावा

  3. 3

    सर्वात शेवटी चिंचेचा कोळ किंवा चिंच खजुराची चटणी घालून घ्यावी आणि सर्व एकत्र करून मिसळून घ्यावे तयार आहे आपली भेळ ही भेळ सर्व करताना वरून बारीक शेव कांदा टोमॅटो तळलेले शेंगदाणे आणि सोबत एखादी हिरवी मिरची तळलेली द्यावी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

यांनी लिहिलेले

Supriya Devkar
Supriya Devkar @cook_1983
रोजी
Solapur
cooking is my hobby. I like to cook new dishes. I like to innovate recipes.
पुढे वाचा

Similar Recipes