खमंग मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
Dadar..Mumbai

#EB1
#W1
#विंटर स्पेशल रेसिपीज e book
#खमंग_मेथी_पराठा...🌿🌿

हिवाळ्यात भाजीपाला अगदी मुबलक...भाजीबाजार नुसता हिरवागार झालेला असतो..💚 माटुंग्याला सिटीलाईट मार्केटला,पार्ले येथील दिनानाथ मार्केट मध्ये वेगवेगळ्या रंगांच्या भाज्या अशा काही नजाकतीने मांडलेल्या असतात की पाहत रहावं नुसतं..डोळ्यांचं पारणं फिटतं अगदी..मी कधीतरी मुद्दाम जाते इकडे..आणि किती घेऊ,काय घेऊ असं करत करत हावरटासारख्या भाज्या खरेदी करते..😜..ते हिरवं सौंदर्य पाहून मन तृप्त होते ...💚 😍
मेथी हिवाळ्यात मुबलक प्रमाणात येणारी भाजी..🌿🌿..कडू असलेल्या मेथीचे एक से एक खमंग पदार्थ घरोघरी केले जातात..अगदी मेथीच्या मुटक्यांपासून ते मेथी मलई मटर पर्यंत..
चला तर मग आज आपण या मेथी platter मधले मेथी,बटाटा,पुदिना कोथिंबीर घालून केलेले खमंग मेथी पराठे करु या..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30-40 मिनीटे
4जणांना
  1. 1जुडी मेथीची
  2. 3-4 बटाटे किसून
  3. 1/2 कपदही
  4. 2 टेबलस्पूनआलं मिरची लसूण पेस्ट
  5. 1 टेबल्स्पूनतीळ
  6. 1/2 टीस्पूनओवा
  7. 1 टीस्पूनहळद
  8. मीठ चवीनुसार
  9. 2 टीस्पूनधने पावडर
  10. 1/2 टीस्पूनजीरे
  11. 3-4 टेबलस्पूनतेल
  12. 4 कपकणिक
  13. 3/4 कपतांदूळ पीठ
  14. थोडी कोथिंबीर चिरून
  15. 2 टेबलस्पून पुदिना चिरुन

कुकिंग सूचना

30-40 मिनीटे
  1. 1

    सर्वप्रथम पराठे चे सर्व साहित्य एके ठिकाणी गोळा करून घ्या मेथी व्यवस्थित धुवून बारीक चिरून घ्या आणि बटाटे साल काढून किसून ठेवा.

  2. 2

    आता एका पराती मध्ये मेथी किसलेला बटाटा घाला त्यामध्ये दही तीळ ओवा जीरे आणि सर्व मसाले घाला तेल मीठ घालून व्यवस्थित एकजीव करा आणि त्यामध्ये कणिक आणि तांदूळ पीठ घालून कणीक भिजवून घ्या आणि पंधरा ते वीस मिनिटं हा गोळा झाकून ठेवावा.

  3. 3

    नंतर याचे तुमच्या आवडीप्रमाणे गोळे करून पराठे तांदूळ पीठीवर लाटून घ्या. तव्यावर दोन्ही बाजूने सोनेरी रंगावर तेल घालून भाजून घ्या.

  4. 4

    तयार झाले आपले खमंग खरपूस असे मेथी पराठे एका डिश मध्ये छुंदा चटणी लोणचे किंवा दही किंवा सॉस याबरोबर हे गरमागरम मेथी पराठे सर्व्ह करा.

  5. 5
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
रोजी
Dadar..Mumbai
trying new recipes n food photography both are kind of stress buster to me...Write ups,poems, reading, travelling ...my inner peace...😇
पुढे वाचा

Similar Recipes