कोबी पराठा (kobi paratha recipe in marathi)

Manisha Shete - Vispute
Manisha Shete - Vispute @manisha1970
मुंबई

#EB5 #W5
विंटर स्पेशल रेसिपी...पौष्टिक कोबी पराठे

कोबी पराठा (kobi paratha recipe in marathi)

#EB5 #W5
विंटर स्पेशल रेसिपी...पौष्टिक कोबी पराठे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 वाटी बारीक चिरलेला कोबी
  2. 1 टेबलस्पूनमिरची-आलं पेस्ट
  3. 1 टेबलस्पूनतिखट
  4. 1/2 टीस्पूनहळद
  5. 1 टीस्पून धणे जीरे पूड
  6. 1 टीस्पून गरम मसाला
  7. 1 टीस्पून आमचूर पावडर
  8. 1 टीस्पून जीरे
  9. थोडी कोथिंबीर
  10. मीठ चवीनुसार
  11. 1 वाटीगहू पीठ
  12. 1 टेबलस्पूनतेल
  13. 1 टेबलस्पूनतेल
  14. पाणी आवश्यकतेनुसार

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्व साहित्य एकत्र घ्यावे. कोबी-कोथिंबीर बारीक चिरुन घ्यावी.

  2. 2

    पराठासाठी कणीक भिजवून घ्यावी. कढईत १ टेबलस्पून तेल तापवून त्यात जीरे तडतडले की मिरची-आलं परतावे.

  3. 3

    सर्व मसाले परतवून कोबी व कोथिंबीर घालून एकजीव करावे. पाणी अजिबात घालू नये. मोठ्या गॅसवर ३-४ मिनिटे परतावे व थंड होण्यास ठेवावे.

  4. 4

    कणकेचे साधारण मोठे गोळे बनवून घ्यावे. पारी करुन त्यात कोबीचे सारण भरुन जाडसर पराठा लाटावा.

  5. 5

    गरम तव्यावर तूप सोडून दोन्ही बाजूंनी खरपूस भाजावा. पौष्टिक चविष्ट कोबी पराठा तयार. बटर लावून दही,लोणचे, टोमॅटो सॉस किंवा भाजी बरोबर खायला द्यावी.

  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Manisha Shete - Vispute
रोजी
मुंबई

टिप्पण्या (6)

Varsha S M
Varsha S M @varsha_1964120
Ok मला वाटलेली तुम्ही सोडलं, कदी तरी एक रेसिपी टाकत राहा. Bye 🌷

Similar Recipes