उकडहंडी/ उकरांडी/ संक्रांतीची वाडवळी पद्धतीची मिक्स भाजी (ukadhandi mix bhaji recipe in marathi)

Komal Jayadeep Save
Komal Jayadeep Save @Komal_Jayadeep

उकडहंडी/ उकरांडी/ संक्रांतीची वाडवळी पद्धतीची मिक्स भाजी (ukadhandi mix bhaji recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 10-12काळी वांगी
  2. 3मोठे बटाटे
  3. 10पाती कांदे
  4. 1/4 किलोवालाच्या शेंगा (बनवाल, पावटा, घेवडा)
  5. 1/2 किलोकंदमुळे (रताळे, कोनफळ)
  6. 2कांदे
  7. 1/2 कपओलं खोबरं
  8. 4शेवग्याच्या शेंगा
  9. 1 कपकोथिंबीर
  10. 2 इंचआलं
  11. 7-8 लसून पाकळ्या
  12. 4हिरव्या मिरच्या
  13. आवश्यकतेनुसार तेल (10 टेबलस्पून)
  14. 1 टेबलस्पूनहळद
  15. 3 टेबलस्पूनवाडवळी मसाला
  16. चवीनुसारमीठ
  17. 1 टेबलस्पूनगरम मसाला
  18. 1 टीस्पूनगुळ

कुकिंग सूचना

  1. 1

    वांगी, बटाटे, कंदमुळे, वालाच्या शेंगा, शेवग्याच्या शेंगा चिरून पाण्यामध्ये भिजत ठेवा... भाज्या आकाराने मोठ्या कापा... पाती कांद्याचा सफेद आणि हिरवा भाग वेगवेगळे ठेवा... आले, लसूण, मिरची, कोथिंबीरच हिरवा वाटाण बनवून घ्या... खोबरं मिक्सरला वेगळं वाटून घ्या... आवश्यकता वाटली तर वाटताना थोडे पाणी घाला... बाकी संपूर्ण भाजीमध्ये आपण पाणी घालणार नाही आहोत...

  2. 2

    जाड बुडाच्या भांड्यामधे तेल गरम करून घ्या... ह्या भाजीमध्ये पाणी घातलं जात नाही, त्यामुळे तेलाचे प्रमाण थोडे जास्त असते तरीही आपल्या सोयीनुसार कमी-जास्त करा... बारीक चिरलेला कांदा आणि पाती कांद्याचा सफेद भाग तेला मध्ये व्यवस्थित परतून घ्या... मग त्यात हिरवा वाटण घालून तेही व्यवस्थित परतून घ्या... मग हळद, मीठ आणि मसाला घाला... वाडवळी मसाला नसल्यास घरगुती वापरातील मिक्स मसाला वापरा... तिखटाचे प्रमाण सवयीनुसार कमी जास्त करा...

  3. 3

    मग त्यात सर्व चिरलेल्या भाज्या आणि पाती कांद्याची हिरवी पात घाला... सर्व व्यवस्थित मिसळून घ्या... वाफेवर पाणी ठेवून मध्यम आचेवर शिजवण्यासाठी ठेवा... भाजी च्या आत मध्ये अजिबात पाणी घालणार नाही आहोत...

  4. 4

    साधारण 80 टक्के भाजी शिजल्यावर त्यात वाटलेला ओला नारळ घाला... टुथपिक च्या सहाय्याने आणि बटाटे आणि कंदमुळे शिजली आहेत की नाही ह्याची खात्री करा... सर्वात जास्त शिजण्यासाठी वेळ शेवग्याच्या शेंगेला लागतो... सर्व व्यवस्थित शिजल्यावर गरम मसाला आणि गूळ घाला... गुळ ऑप्शनल आहे...

  5. 5

    आपली वाडवळी पद्धतीची संक्रांति ची भाजी उकडहंडी किंवा उकरांडी तयार आहे...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Komal Jayadeep Save
Komal Jayadeep Save @Komal_Jayadeep
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes