आलं, मिरची, आंबी हळद लोणचे... (वाडवळी पद्धतीने) (aala mirchi ambi haldi lonche recipe in marathi)

Komal Jayadeep Save
Komal Jayadeep Save @Komal_Jayadeep

आलं, मिरची, आंबी हळद लोणचे... (वाडवळी पद्धतीने) (aala mirchi ambi haldi lonche recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 100 ग्रामआंबेहळद
  2. 50 ग्रॅमआलं
  3. 50 ग्रॅमहिरवी मिरची
  4. १+१ टीस्पून हळद
  5. चवीनुसारमीठ
  6. 1/4 कपराई डाळ
  7. 1 टेबलस्पूनधने
  8. 1 टीस्पूनहिंग
  9. 1/2 कपराई तेल
  10. 2 टेबलस्पूनलिंबाचा रस

कुकिंग सूचना

  1. 1

    मिरच्यांचे देठ काढून घ्यावे... आलं आणि आंबी हळद चमच्याच्या किंवा पिलर च्या सहाय्याने सोलून घ्यावी... सर्व व्यवस्थित धुवून कोरडे करून घ्यावे... ह्या नंतर पाणी लागू देऊ नका...

  2. 2

    आलं आणि आंबी हळदीचे ज्युलियन्स कापून घ्या... मिरचीचे गोल बारीक तुकडे करा...

  3. 3

    सर्व जिन्नस काचेच्या किंवा प्लास्टिकच्या बरणीमध्ये भरा... धातूच्या बरणी चा वापर टाळावा... मग त्यात 1 टीस्पून हळद आणि साधारण एक टेबलस्पून मीठ घाला... बरणीचे झाकण लावून सर्व व्यवस्थित शेक करुन घ्या...

  4. 4

    हे सर्व दोन दिवस मुरू द्या... दिवसातून दोन वेळा बरणी शेक करा... दोन दिवसानंतर जाळीच्या भांड्यामध्ये काढून त्यातले तयार झालेले मिठाचे पाणी निघून जाऊ दे... मग हे सुती कपड्यावर पसरून साधारण तासभर सावलीतच वाळू द्यावे...

  5. 5

    राई डाळ मिक्सरमध्ये दरदरीत वाटून घ्या... आमच्याकडे लोणच्यामध्ये मेथी दाणे टाकले जात नाहीत त्याने लोणचं खराब होते असं मानतात...

  6. 6

    तेल व्यवस्थित तापल्यावर त्यात हिंग, मीठ आणि धने व्यवस्थित परतून घ्या... मग राई डाळ घालून परता... गॅसची फ्लेम बंद करून मग हळद घाला... मीठ साधारण एक टिस्पून एवढाच घाला... आपण सर्व जिन्नस मिठामध्ये आधीच मुरवले होते त्यामुळे खूप मीठ लागत नाही...

  7. 7

    आपले लोणच्याचे पुरण तयार झाले... हे थंड होऊ द्या...

  8. 8

    वाळवलेले आलं, मिरची, आंबी हळद पुराणांमध्ये घालून व्यवस्थित मिसळून घ्या...

  9. 9

    बरणीमध्ये भरण्यापूर्वी त्यात लिंबाचा रस घालून व्यवस्थित मिसळून घ्या... मग व्यवस्थित कोरड्या केलेल्या बरणीमध्ये भरा...

  10. 10

    एक दिवस असंच ठेवून मग फ्रीजला लावा... लोणचं फ्रिज मध्ये वर्षभर टिकतो... पण वरती तेलाचा थर राहायला हवा... तेल कमी झालं तर लोणचं फ्रिज मध्ये सुद्धा खराब होते... कोरड झाला असं वाटलं तर तेल संपूर्ण गरम करून मग थंड करून वरून घाला...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Komal Jayadeep Save
Komal Jayadeep Save @Komal_Jayadeep
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes