भेंडीची भाजी (Bhendi Bhaji recipe in marathi)

anita kindlekar
anita kindlekar @anita_9

झटपट होणारी, चवीला मस्त अशी भेंडीची भाजी

भेंडीची भाजी (Bhendi Bhaji recipe in marathi)

झटपट होणारी, चवीला मस्त अशी भेंडीची भाजी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अर्धा तास
४ जणांसाठी
  1. 1/4 किलोभेंडी
  2. 2कांदे
  3. 1/2 चमचामोहरी
  4. 1/2 चमचाजीरे
  5. चवीनुसारलाल तिखट
  6. चिमुटभरहिंग
  7. चवीनुसारमीठ
  8. 4 चमचेतेल
  9. 4 ते 5 आमसुले

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    कढई गॅसवर ठेवा. मंद आचेवर भेंडी कोरडीच म्हणजे तेल न घालता परतून घ्या. पाच ते सहा मिनीटांनंतर त्यात आमसुले टाकावे आणि परतून घ्यावे. भेंडी कोरडी भाजल्यामुळे त्यातील चिकटपणा निघून जातो.आता ती भेंडी एका भांड्यात काढून ठेवा.

  2. 2

    कढई गॅसवर ठेवा नेहमीप्रमाणे फोडणी करून घ्या. त्यात कांदा घाला आणि छान तेलावर परतला की त्यात भाजलेली भेंडी घालावी. भेंडी आणि कांदा एकत्र परतून घ्यावा. आता त्यात चवीनुसार लाल तिखट आणि मीठ घालावे.

  3. 3

    काहीजण भेंडी भाजी शिजताना त्यावर झाकण ठेवतात पण त्यामुळे काय होते वाफेचे पाणी भाजीत पडून ती चिकट होते. म्हणून झाकण ठेवू नका. भेंडी आधी परतून घेतलेली असते त्यात कांदा तेलावर भाजलेला असतो त्यामुळे भाजी छान शिजते.

  4. 4

    अगदी कमी वेळेत आणि झटपट होणारी भेंडीची भाजी तयार आहे. पोळी, भाकरी किंवा वरणभातासोबत त्याचा आस्वाद घ्यावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
anita kindlekar
रोजी

Similar Recipes