आई प्रिय आमरस (Aamras Recipe In Marathi)

Madhuri Shah
Madhuri Shah @madhurishah
Solapur

#MDR

माझ्या आईला आमरस खूपच आवडायचा . आमच्याकडे शेतातून भरपूर आंबे यायचे .मग आम्ही घरातच आंब्याची आढि घालायचो . त्यावेळी घोळायचे आंबे (देसी आंबे ) असायचे . ( पण हल्ली हापूसच जास्त मिळतो , त्यामुळे हळूहळू देशी आंबे इतिहास जमा होत आहेत ) आंबे स्वच्छ धुवून घोळायचे व त्याचा भरपूर रस काढायचा . मग आईची लगबग सुरु व्हायची . रसा बरोबर बपुडी , पेंडपाला, भाजी , पिठल्याच्या वड्या , तळण, हिरवी चटणी, कोशिंबीर , लिंबू असं " चारी ठाव " जेवण आई बनवायची. खरं सांगू ?? त्या आमरसाची व जेवणाची चव अजूनही जिभेवर रेंगाळतेय .
आई , आंब्याचे दिवस आले कीं , तुझी प्रकर्षाने आठवण होते. तू बनवायची तसाच मेन्यू मी आज बनविलाय .
. खायला येशील ???

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिटे
2 सर्व्हिंगस
  1. 3आंबे हापुस
  2. 1 टिस्पून साखर
  3. 1/2 टीस्पूनलिंबूरस
  4. चिमूटभरमीठ

कुकिंग सूचना

10 मिनिटे
  1. 1

    आंबे स्वच्छ धुऊन घ्या. त्याची साल काढून, लहान लहान फोडी करा. फोडी पातेल्यात घेऊन त्यांत किंचित पाणी टाकून, हँड मिक्सी ने फिरवून घ्या. त्यात मीठ, साखर व लिंबूरस टाका छान ढवळून घ्या.

  2. 2

    आमरस तयार झाला.तो फ्रीजमध्ये ठेवा. गारेगार व यम्मी यम्मी आमरसाचा पोळी, भाजी, तळण, पिठलीच्या वड्यां बरोबर आस्वाद घ्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Madhuri Shah
Madhuri Shah @madhurishah
रोजी
Solapur

टिप्पण्या

Similar Recipes