व्हेज सिंगापूरी नूडल्स (Veg Singapori Noodles Recipe In Marathi)

Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
Pune

#CHR
जगभरामध्ये चायनीज रेसिपी आवडीने खाल्ल्या जातात,त्या त्यातील मसाल्यांच्या आणि सॉसच्या वेगळेपणामुळे.आपल्याकडे चायनीज हे फास्टफूड म्हणूनही ओळखले जाते पण ते हेल्दीही असते.तसंच ते बऱ्यापैकी स्वस्तही असते.चायनीज आवडण्याचे मुख्य कारण हे करायला पटकन,सोपे आणि ताजे असते.संध्याकाळच्या पूर्ण जेवणातही आपण याचा समावेश करु शकतो.
सिंगापूर नुडल्सचा चायनीज मेनू कार्डमध्ये समावेश असतो.परंतू,चायनीज हक्का नुडल्सपेक्षा याचा स्वाद खूपच वेगळा असतो.मुळात सिंगापूरी नूडल्स या सिंगापूरच्या नाहीतच!..त्या आहेत हॉंगकॉंगच्या.त्यामुळे स्पाईसी टच असलेल्या सिंगापूर नूडल्स प्रसिद्ध आहेत.अतिशय गडद रंग आणि अजिनोमोटो याचा मुबलक वापर स्टॉलवरील चायनीजमधे केलेला असल्याने असे खाणे हे घातकच असते.
आजच्या सिंगापूरी नुडल्स खास भारतीय आणि चायनीजचे फ्युजन आहे!चला तर रेसिपी बघू या🍝🍜

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1:30तास
5 व्यक्ती
  1. 4पँक नूडल्स
  2. 3 लीटरपाणी
  3. 1 टेबलस्पूनमीठ
  4. 2ते3 टेबलस्पून तेल - नूडल्स उकडताना
  5. भाज्या :-
  6. 1/2कोबी मध्यम आकाराचा
  7. 2मोठ्या हिरव्या सिमला मिरची
  8. 2मध्यम गाजरे
  9. 3कांदे
  10. 4-5कांदापात
  11. 4हिरव्या मिरच्या (तिखट असणाऱ्या)
  12. 3 टेबलस्पूनलसूण पेस्ट
  13. 1/4 इंचआले
  14. मसाले व सॉसेस :-
  15. 4लवंगा
  16. 2बादलफूल/चक्रीफूल
  17. 2तमालपत्र
  18. 3दालचिनी काड्या
  19. 2 टीस्पूनमीरेपूड
  20. 2 टीस्पूनहळद
  21. 1 टेबलस्पूनमीठ (जरुरीप्रमाणे)
  22. 4 टेबलस्पूनसोयासॉस
  23. 2 टेबलस्पूनव्हिनेगर
  24. 4 टेबलस्पूनरेड चिली सॉस
  25. 1 टीस्पूनमध
  26. तेल :-
  27. 5 टेबलस्पूनतीळाचे तेल
  28. 2 टेबलस्पूनबटर
  29. 1/4 कपचिरलेली कांदापात गार्निशिंगसाठी

कुकिंग सूचना

1:30तास
  1. 1

    सिंगापूर नुडल्स करण्यासाठी लागणारे सर्व साहित्य-नूडल्स, भाज्या,मसाले,सॉसेस,तेल इ. एकत्र जमवून घ्यावे.

  2. 2

    भाज्या चिरुन घ्याव्यात :-
    1)कोबी,गाजर,कांदा,आले,हिरव्या मिरच्या-लांब व पातळ चिराव्यात.
    2)सिमला मिरची -मोठे चौकोनी चिरावी.
    3)लसूण पेस्ट करावी.
    4)कांदापात-अगदी बारीक गार्निशिंगसाठी चिरावी.
    आपल्या आवडीनुसार मशरुम,कॉर्न्स,रंगीत सिमला मिरची असेही घालू शकता.

  3. 3

    मोठ्या कढईत पाणी उकळण्यास ठेवावे. थोडे गरम झाले की मीठ व तेल घालावे.उकळी आली की एकेक नूडल्सचे ब्लॉक्स घालावेत.

  4. 4

    साधारण 7-8मिनिटात नूडल्स शिजण्यास लागतात.जास्तही उकडू नयेत.उकडल्यावर मोठ्या तळणीच्या झाऱ्यातून पाणी वगळून नूडल्स चाळणीवर काढून घ्याव्यात.

  5. 5

    सर्व नूडल्स चाळणीत काढल्यानंतर त्या नळाखाली गार पाण्यातून काढाव्या.व निथळून 10मिनिटे थंड होण्यास ठेवाव्यात.
    तोपर्यंत भाज्या फ्राय करुन घेऊ या.कढई मोठ्या गँसवर तापत ठेवून त्यात तीळाचे तेल व बटर घालावे. थोडे बटर विरघळले की त्यात लवंग,बादलफूल,तमालपत्र, दालचिनी घालावे व तळावे.

  6. 6

    आता त्यावर आल्याचे काप,मिरच्या घालावे.लसूणपेस्ट घालून परतावे.यावर प्रथम गाजर घालावे.दोन मिनिट परतावे.त्यावर कांद्याचे काप घालून परतावे.नंतर कोबी व सिमला मिरची घालावे.

  7. 7

    पाच-सात मिनिटे परतल्यावर यावर आता अनुक्रमे हळद,रेड चिली सॉस,सोयासॉस,व्हिनेगर, मीठ,मीरेपूड व मध भाज्यांवर घालावे व सर्व हलवून घ्यावे.गँस मिडीयम असावा.
    इथे कोणत्याही कृत्रिम रंगाऐवजी हळद वापरली आहे.व अजिनोमोटो ऐवजी साधे मीठ वापरले आहे.तरीही रंग व चव छान आली आहे.तसेच मधामुळे तिखटपणा बँलन्स झाला आहे.

  8. 8
  9. 9
  10. 10

    आता या वर थंड झालेल्या नूडल्स घालून फोर्कच्या सहाय्याने नूडल्सना सगळीकडून भाज्या,मसाले,सॉसेस लागतील असे हलवून घ्यावे.
    यासाठी👇व्हिडीओ पहा.

  11. 11

    सिंगापूरी नूडल्स तयार आहेत.यावर चिरलेली कांदापात घालून प्लेटमध्ये गरमागरम सर्व्ह कराव्यात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
रोजी
Pune
सदा सर्वदा योग कुकपँडचा घडावा ।कुकपँड कारणी नवा पदार्थ माझा घडावा ।आवडीने पदार्था सुगरणीने तो करुनी पहावा ।मने जिंकण्या मार्ग पोटातून जावा ।।
पुढे वाचा

Similar Recipes