ढोबळी मिरचीचे पंचामृत (Dhobli Mirchiche Panchamrut Recipe In Marathi)

Madhuri Shah
Madhuri Shah @madhurishah
Solapur

#NVR
पंचामृत हा पदार्थ , मराठवाड्याची स्पेशालिटी म्हणायला हरकत नाही . कोणत्याही सणाच्या नैवेद्यामध्ये पंचामृत हमखास असतेच . विशेषतः मराठवाड्यात अनेक प्रकारचे पंचामृत केले जातात उदा . मिरची चे पेरूचे वगैरे , त्यांतील , ढोबळी मिरचीचे चटकदार असे आंबट गोड पंचामृत बनविले आहे .
चला कृती पाहू...

ढोबळी मिरचीचे पंचामृत (Dhobli Mirchiche Panchamrut Recipe In Marathi)

#NVR
पंचामृत हा पदार्थ , मराठवाड्याची स्पेशालिटी म्हणायला हरकत नाही . कोणत्याही सणाच्या नैवेद्यामध्ये पंचामृत हमखास असतेच . विशेषतः मराठवाड्यात अनेक प्रकारचे पंचामृत केले जातात उदा . मिरची चे पेरूचे वगैरे , त्यांतील , ढोबळी मिरचीचे चटकदार असे आंबट गोड पंचामृत बनविले आहे .
चला कृती पाहू...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 ते 20 मिनिटे
2 व्यक्ती
  1. 1ढोबळी हिरवी मिरची
  2. 1 टेबलस्पूनखोबरे कीस 1/2 टीस्पून जीरे
  3. 1 टेबलस्पूनतिळाचे कूट
  4. 1 टेबलस्पूनशेंगदाण्याचे कूट
  5. 1 टेबलस्पूनकाजू
  6. 3 टेबलस्पूनचिंचेचा कोळ
  7. दीड टेबलस्पून गुळ
  8. 1 वाटीगरम पाणी
  9. दीड टेबलस्पून लाल तिखट
  10. 1/2 टीस्पूनहळद
  11. मीठ चवीप्रमाणे
  12. तेल फोडणीसाठी

कुकिंग सूचना

15 ते 20 मिनिटे
  1. 1

    खोबरे व जीरे, तीळ, शेंगदाणे, तांबूस रंगावर भाजून घ्या.
    गरम पाण्यात काजू भिजत टाका.चिंच भिजवून त्याचा कोळ तयार करा.
    हिरव्या ढोबळीच्या लहान लहान फोडी करा,.
    खोबरे किस व जीरे (एकत्र कूट,) तीळ, शेंगदाणे,यायांचा मिक्सरवर फिरवून कूट करा.

  2. 2

    गॅसवर कढईत फोडणीसाठी तेल टाका. तेल तापल्यानंतर,त्यात हिंग, मोहरी, जीरे, मेथ्या टाकून तडतडल्यावर, 1/4 चमचा हळद टाकून, त्यांत मिरच्या च्या फोडी टाका. चवीपुरते मीठ टाकून, छान परतून घ्या. परतलेल्या फोडीवर झाकण झाकून 2 - 4 मिनिटे छान वाफ येऊ द्या.

  3. 3

    वाफलेल्या मिरच्यांच्या फोडीवर, खोबरे जिऱ्याची पूड, तिळाचा कूट,शेंगदाणा कूट, भिजवलेले काजू, लाल तिखट, टाकून छान परता. त्यांवर चिंचेचा कोळ टाकुन परता, वरून 3/4 वाटी गरम पाणी टाका,म्हणजे पंचामृत करपणार नाही. गूळ टाकून मिक्स करून, 2 -4 मिनिटांसाठी, पंचामृत छान वाफवून घ्या, ते आळून येईल व रुचकर ही लागेल.

  4. 4

    झक्कास पैकी आंबट - गोड खमंग, असे ढोबळी मिरचीचे पंचामृत तयार !!!
    ते गरम गरम सर्व्ह करा व मज्जा लुटा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Madhuri Shah
Madhuri Shah @madhurishah
रोजी
Solapur

टिप्पण्या

Similar Recipes