बटर पावभाजी (Butter Pav Bhaji Recipe In Marathi)

Shobha Deshmukh
Shobha Deshmukh @GZ4447

#PR पावभाजी हा एक सर्वांना आवडणारा ,हेल्दी,व पोटभरीचा प्रकार आहे. न आवडणारी सर्व भाजी पोटात जाते. ह्या मधे बरेच प्रकार आहेत. बटर पावभाजी करुया.

बटर पावभाजी (Butter Pav Bhaji Recipe In Marathi)

#PR पावभाजी हा एक सर्वांना आवडणारा ,हेल्दी,व पोटभरीचा प्रकार आहे. न आवडणारी सर्व भाजी पोटात जाते. ह्या मधे बरेच प्रकार आहेत. बटर पावभाजी करुया.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनीट
४ लोक
  1. १०० ग्रॅम कोबी
  2. १०० ग्रॅम फ्लॅावर
  3. 1मोठा टोमॅटो
  4. 2उकडलेले मध्यम आकाराचे बटाटे
  5. 1 टे. स्पुन आलं लसुन प्स्ट
  6. 2बारीक चिरलेले कांदे
  7. 1 कपचीरलेली कोथिंबीर
  8. 1लिंबु चिरुन
  9. 2 टे. स्पुन बटर
  10. 2 टे. स्पुन पावभाजी मसाला
  11. 1 टे. स्पुन लाल तिखट
  12. चवीपुरते मीठ
  13. 1 टे. स्पुन तेल
  14. 1/4 टे. स्पुन जीरे
  15. 8पाव

कुकिंग सूचना

३० मिनीट
  1. 1

    प्थम कुकरच्या डब्या मधे कोबी,फ्लॅावर व बटाटे उकडुन घ्यावे.व ते मॅश करावे.

  2. 2

    पॅन मधे बटर व तेल घालावे ते गरम झाल्यावर जीरे घालावे.नंतरआलं लसुन पेस्ट घालुन परतावे, नंतर कांदा घालुन परतुन घ्यावे टोमॅटो घालुन तो शीजवुन घ्यावा.व लाल तिखट घालुन मीक्स करावे म्हणजे भाजीला कलर छान येतो.

  3. 3

    नंतर पाव भाजी मसाला, मींठ घालावे व घोटुन घ्यावे व छान शिजवुन घ्यावे. वर बटर घालावे तयार आहे पावभाजी तव्या वर बटर व चीमुटभर तिखट ठासुन पाव भाजुन घ्यावे व एक प्लेट घेउन कांदा, कोथिंबीर व लींबु देउन वर बटर घालुन सर्व्ह करावी गरमागरम पावभाजी वीथ बटर.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shobha Deshmukh
रोजी

Similar Recipes