व्हेजिटेबल पुलियोगरे (Vegetable Puliogare Recipe In Marathi)

Madhuri Shah
Madhuri Shah @madhurishah
Solapur

#JLR
हिवाळा आला कीं, भरपूर प्रमाणात भाज्या येतात . सर्व भाज्या , ह्या ऋतूत शरीराला पोषक असतात . म्हणून सगळ्या भाज्या परतून त्यांत भात टाकून वाफवला कीं, झटपट , पौष्टिक असा पुलियोगरे तयार झाला .तो अबाल - वृद्धांसाठी उपयुक्त आहे . अनेक जीवनसत्वानीयुक्त असा पुलियोगरे मी बनविला आहे , त्याची चव पहा .ही रेसिपी दक्षिण भारतात सर्रास केली जाते . कृती सांगतेच .....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1/2 तास
2 ते 3 व्यक्ती
  1. 1 वाटीतांदूळ
  2. 2 वाट्यापाणी
  3. 1कांदा (मध्यम आकार)
  4. 1टोमॅटो
  5. 1बटाटा
  6. 1 टेबलस्पूनप्रत्येकी,हिरव्या, पिवळ्या, लाल ढोबळीच्या फोडी
  7. 1 टेबलस्पूनगाजर फोडी
  8. 4पाकळ्या लसूण,
  9. 1" आलं
  10. दीड टीस्पून लाल तिखट
  11. 1/2 टीस्पूनहळद
  12. चवीपुरते मीठ
  13. 2 टीस्पूनगरम मसाला
  14. 1 टेबलस्पूनचिंच गूळ कोळ
  15. 1 टेबलस्पूनपुदिना पाने
  16. कोथिंबीर
  17. कढीपत्ता
  18. u2.5 टेबलस्पून तेल फोडणी करता

कुकिंग सूचना

1/2 तास
  1. 1

    कुकरमध्ये 3 शिट्या करून, भात शिजवून घ्या. कुकरची वाफ गेल्यावर भात बाहेर काढून, तो मोठ्या प्लेटमध्ये गार करणेस ठेवा.कांद्याचे उभे काप करा. टोमॅटो, ढोबळी, गाजर, बीन्स बटाटा या सर्व भाज्यांच्या बारीक फोडी करा.

  2. 2

    गॅसवर पॅन मध्ये तेल तापवा.त्यांत कांदा तांबूस रंगावर तळून घ्या. तो एक प्लेट मध्ये काढा..
    कुकर मधला गार झालेला भात प्लेटमध्ये काढा. त्यांत एक टीस्पून तेल टाका व हाताने तो मोकळा करा, म्हणजे दाणा एकमेकांना चिकटणार नाही.

  3. 3

    पॅनमध्ये तापलेल्या तेलात,मोहरी व जीरे टाकून तडतडू द्या.त्या नंतर कढीपत्ता व सर्व चिरलेल्या भाज्या टाका. त्या भाजतानाच, त्यांत हळद, लाल तिखट व मीठ टाकून, सर्व भाज्या तांबूस भाजून घ्या, वरून चिंचेचा कोळ टाका. पुन्हा भाज्या परता.

  4. 4

    आता त्यांत मोकळा केलेला भात थोडा थोडा टाकत वरून गरम मसाला टाकून, हलक्या हाताने भात छान मिक्स करा. त्यांवर झाकण झाकून गॅसची फ्लेम बारीक करून 5 ते 7 मिनिटे भाताला छान वाफ येऊ द्या.
    मस्त सर्व भाज्या घातलेला पौष्टिक व्हेजिटेबल पुलियोगरे तयार झाला.त्याला वरून गार्निश करण्यासाठी कोथिंबीर व तळून ठेवलेला कांदा पेरा.
    गरम गरम सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Madhuri Shah
Madhuri Shah @madhurishah
रोजी
Solapur

टिप्पण्या (4)

Similar Recipes