खमंग खुसखुशीत तिळगुळ पोळी. (Tilgul Poli Recipe In Marathi)

#SWR... आताच संक्रांत झाली आणि आज रथसप्तमी.. त्या निमित्त आज पुन्हा तिळगुळ पोळी झाली. छान खमंग, खुसखुशीत.. अगदी 4-5 दिवस टिकतील अशा पोळ्या..
खमंग खुसखुशीत तिळगुळ पोळी. (Tilgul Poli Recipe In Marathi)
#SWR... आताच संक्रांत झाली आणि आज रथसप्तमी.. त्या निमित्त आज पुन्हा तिळगुळ पोळी झाली. छान खमंग, खुसखुशीत.. अगदी 4-5 दिवस टिकतील अशा पोळ्या..
कुकिंग सूचना
- 1
सुरुवातीला सारणाची सर्व सामग्री एकत्र ठेवावी. तीळ निवडून घ्यावे. गुळ किसून किंवा बारीक करून घ्यावा. त्यानंतर एका पॅनमध्ये तीळ टाकून भाजून घ्यावेत. त्यानंतर त्यातच खसखस टाकून तीही सोबत भाजून घ्यावी.
- 2
आता भाजलेले तीळ आणि खसखस बाजूला काढून थंड करून घ्यावी.
- 3
आता त्याच पॅनमध्ये तूप घालून त्यात बेसन टाकावे.
- 4
थोडा सुगंध येईपर्यंत आणि रंग बदलेपर्यंत भाजून घ्यावे. आता थंड झालेले तीळ, मिक्सर पॉट मध्ये टाकून, जाडसर बारीक करावे. खूप बारीक करू नये.
- 5
त्यानंतर त्यात गूळ टाकून पुन्हा छान मिक्स करून घ्यावे. हे तिळगुळ एका बाउल मध्ये काढून घ्यावे.
- 6
या मिश्रणात आता भाजलेले बेसन, वेलची पूड आणि जायफळ पूड घालून मिक्स करावे.
- 7
आता हे मिश्रण पुन्हा मिक्सर मधून काढून घ्यावे.
- 8
या तयार मिश्रणाचे, आपल्याला पाहिजे त्या आकाराचे गोळे बनवून घ्यावे. याच गोळ्यांच्या पोळ्या करावयाच्या आहेत आपल्याला.
- 9
आता पोळ्या साठी कणीक मळून घ्यावी. कणीक, मैदा, रवा, बेसन आणि तांदळाचे पीठ चाळून घ्यावे.
- 10
त्यात मीठ आणि गरम केलेले कडकडीत, तेल टाकावे. मिक्स करून घ्यावे व पाण्याने भिजवून घ्यावे. हा तयार गोळा, 15-20 मिनिटे झाकून बाजूला ठेवावा.
- 11
15-20 मिनिटांनी कणीक मळून घ्यावी. त्याचे पाहिजे त्या आकाराचे गोळे करून घ्यावे. जेणेकरून, तिळगुळाचे सारणाचा गोळा त्यात बसेल. त्यानंतर. छोटी पोळी करून, त्यात सारण भरावे. आणि मोदकासारखे बंद करावे. हलक्या हाताने पोळी लाटून घ्यावी. आणि गरम तव्यावर, दोन्ही बाजूंनी तूप घालून खरपूस भाजून घ्यावी.
- 12
अशा प्रकारे सर्व पोळ्या करून घ्याव्यात. आता या पोळ्या, तुपाचा गोळा आणि किंचित आंबटगोड दह्यासोबत सर्व्ह कराव्यात.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
खमंग खुसखुशीत तिळगुळ पोळी (til gud poli recipe in marathi)
#मकर"खमंग खुसखुशीत तिळगुळ पोळी" आज संक्रांत म्हणजे तिळगुळाच्या पदार्थांची रेलचेल असते.. पुर्वी आमच्या गावाकडे प्रत्येक सणाला चना डाळीची पुरणपोळीच बनवली जायची....पण मुंबई मध्ये माझ्या शेजारी एक काकु होत्या त्या संक्रांतीला नेहमी तिळगुळ पोळी बनवायच्या...मी त्यांच्याकडून च शिकले ही तिळगुळ पोळी...अतिशय खमंग खुसखुशीत.. लता धानापुने -
गुळ तीळ पोळी (gul til poli recipe in marathi)
#मकर # संक्रांतीचा दिवस म्हटलं की पुरणाची पोळी किंवा तीळ गुळाचे पोळी करणे आलेच! मीही आज गुळ तीळाची पोळी केली आहे. कारण या पोळी मध्ये तीळा पेक्षा गुळाचे प्रमाण जास्त आहे. पण एकंदरीत ही पोळी खूपच छान खुसखुशीत लागते. आणि ज्यांना गोड आवडते त्यांच्यासाठी तर एकदम उत्तमच.... Varsha Ingole Bele -
तीळ गुळ पोळी (Tilgul Poli Recipe In Marathi)
#SWRही तिळगुळ पोळी अतिशय खमंग खुसखुशीत आणि चवीला उत्तम असते मी दिलेल्या प्रमाणात केली तर ती कधीच बिघडणार नाही व अतिशय सुंदर व खमंग अशी होईल Charusheela Prabhu -
खमंग तिळगुळ पोळी (tilgul poli recipe in marathi)
#EB9#W9#गुळपोळीपारंपारिक पद्धतीने तयार करण्याती येणारी गुळपोळी आपल्या सर्वांनाच आवडते. काही खास सणांसाठी हा पदार्थ तयार केला जातो. ही गुळपोळी फक्त चवीलाच उत्तम नाहीतर आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर ठरते. गहू आणि गुळापासून तयार करण्यात आलेली ही हाय फायबर पोळी शरीरामधील आयर्नची कमतरता भासू देत नाही.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
तीळ गुळ पोळी (til gul poli recipe in marathi)
#EB9 #W9...नुसत्या गुळाची पोळी खाण्यापेक्षा, त्यात तीळ टाकले की आणखी छान होते पोळी.. या संक्रांतीच्या निमित्त केलीय मी. Varsha Ingole Bele -
खमंग गुळाची पोळी (gulachi poli recipe in marathi)
#EB9#W9संक्रांती ला आमच्या तिळाचे विविध प्रकार असतात तिळाची वाडी,तिळाचा लाडू,हलवा,गुळच्या पोळ्या आणि आमच्या वऱ्हाड मधे कोचल्या फार प्रसिद्ध आहेत.पण आमच्या कडे गुळ पोळी जास्त आवडते.तिचा खुसखुशीत पणा शेवट पर्यंत टिकून राहतो Rohini Deshkar -
तिळगुळाची पोळी (tigulachi poli recipe in marathi)
# तिळगुळ पोळी weekly Trending recipeसंक्रांत आणि तिळगुळ जसे समीकरण आहे तसेच तिळगुळ पोळी , तिळगुळ लाडु , गुळपोळी चे पण आहे खमंग खुसखुशीत अशी ही तीळगुळ पोळी. Shobha Deshmukh -
तिळगुळ पोळी (tilgul poli recipe in marathi)
#EB9#W9संक्रात स्पेशल तिळगुळ पोळी बनवली आहे. संक्रांतीला तीळगुळाचे लाडू तर घरामध्ये बनवले जातात पण ही तीळ गुळाची पोळी सुद्धा आवर्जून बनवली जाते. Poonam Pandav -
-
तिळगुळ पोळी (Tilgul Poli Recipe In Marathi)
#मकर#तीळगुळाचीपोळी#गुळपोळी#तिळगुळपोळीमकर संक्रांतीचा उत्सव खूप उत्साहाने साजरा होत आहे पूर्ण भारतभर खूपच उत्साहाने होत आहे जवळपास सगळ्यांच्या घरी पारंपारिक रेसिपी तयार होत आहे आणि त्यात कुकपॅडचा खूप मोठा हात आहे त्यामुळे पारंपारिक रेसिपी करण्यात खूप आनंद येत आहे. या रेसिपी शेअर करताना अजून उत्साह येतो, आपण करतोय आपल्या बरोबर आपल्या कुकपैड च्या मैत्रिणीही बनवत आहे त्यामुळे उत्साह अजून डबल होतो कुकपॉड च्या ऍक्टिव्हिटी मुळे रेसिपी करायला उतसाह आला . तीळगुळाची पोळी बनवली खूप छान आहे पोळी टेस्ट पन खमंग आहे. तीळगुळाच्या बऱ्याच रेसिपी पाहिल्या नंतर सगळ्या रेसिपी मधली कॉमल घटक बघितले, अजून वेगळं काही का कोणी टाकत असेल तर तेही बघितले आणि शेवटी सगळे मिळून जुळून डोक्यात तयार करून रेसिपी बनवली Chetana Bhojak -
गुळपोळी (gul poli recipe in marathi)
#EB9 #W9संक्रांत spl गूळ पोळी खुसखुशीत नी खुटखुटीत होते.सारण करून बरेच दिवस वापरू शकतो Charusheela Prabhu -
गुळपोळी (gul poli recipe in marathi)
#EB9 #W9 #विंटर_स्पेशल_ebook_रेसिपीज#गुळपोळी#मकर_संक्रांत🌞🌾🪁🎉🎊 मकर संक्रांतीच्या सर्वांना तिळगुळमय स्नेहमय गोड शुभेच्छा 🎉🎉🎊🍚🪁🪁 मकर संक्रांत म्हणजे तिळगूळ,गुळपोळी , तीळ शेंगदाणे चिक्की खादाडी साठी हवीच.. तिळातील स्निग्धतेचे गुळातील गोडव्याशी घट्ट सूत जुळवून आणून मग एकमेकांना तिळगूळ घ्या गोड गोड बोला असं म्हणत तिळगुळ देऊन नात्यांमधल्या स्नेहा मध्ये गोडवा वाढावा..मनामनातील स्नेह वृद्धिंगत व्हावा..नाती समृध्द व्हावीत..विचारांच्या मतभेदांमुळे,कटुतेमुळे तुटलेली ,दुरावलेली मने पुन्हा स्नेहरुपी तिळगुळाच्या गोडव्यामुळे नव्याने जोडली जावीत..हीच सदिच्छा असते.. कटु विचारांचे मळभ दूर सारण्याचा दिवस. त्यासाठीच तर आजचा दिवस खास..😊..तिळगुळ घ्या ,गोड बोला,आमचा तिळ सांडू नका,आमच्याशी भांडू नका असे एकमेकांना सांगत मना मनांचा आनंदोत्सव आज आपण साजरा करतो..😍..कारण मन आनंदी, प्रसन्न असेल तरच मानवाच्या हातून दैनंदिन जीवनात उत्तम काम होऊ शकते..म्हणून मग ॠतुमानानुसार शारिरीक आणि मानसिक आरोग्य उल्हसित करणारे हे सण..😊🎉 या गोडव्यातूनच तर समाजमनात गोडी टिकून राहते..शेवटी हे सगळं कशासाठी??.. तर समाजप्रिय असलेल्या माणसांसाठीच ना... 😊 आपल्या माणसांच्या हृदयात पोहोचायचे असेल तर तो मार्ग पोटातून जातो..😍 चला तर मग हा मार्ग आपण गुळपोळी करुन अधिक खमंग ,चविष्ट,मधुर करु या..😋 Bhagyashree Lele -
खमंग, खरपूस तिळगुळ पोळी (teelgud poli recipe in marathi)
#मकर मकर संक्रांत म्हटले की तिळगुळ आलेच.तिळात कॅल्शियम आहे, याशिवाय मँगनीज, लोह, फॉस्फरस, सेलेनियम, ब गटातील जीवनसत्त्वे आणि तंतुमय पदार्थही आहेत. तीळातील कॅल्शियम हाडांसाठी चांगलं तर आहेच, तसेच तिळात झिंक जास्त असते, जे हाडांचा ठिसूळपणा रोखण्यास मदत करते.पूर्वी पदार्थांची गोडी वाढवण्यासाठी साखरेपेक्षा अधिक वापर गुळाचा केला जायचा.तरीही गूळ मात्र साखरेपेक्षा आरोग्यास जास्त फायदेशीर आहे. साखरेमुळे हळूहळू गुळाचं महत्त्व आणि वापरही कमी होऊ लागला.गूळ पोळी, पुरणपोळी, मोदक, चिक्की, शेंगदाण्याचा लाडू, तिळाचे लाडू यांसारख्या पांरपरिक पदार्थांमध्ये गुळाचा वापर आवर्जून केला जातो.आज मकरसंक्रांतीच्या निमित्ताने ,मी खमंग तिळगुळ पोळी केली आहे. Deepti Padiyar -
तिळगुळ पोळी (teelgud poli recipe in marathi)
#मकर#खमंग खुसखुशीत तीळगूळ पोळी सर्वांना मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा 🙂 तीळ गूळ घ्या गोड गोड बोला Rupali Atre - deshpande -
स्वादिष्ट तिळगुळ वडी (Tilgul Vadi Recipe In Marathi)
#TGR... संक्रांत आणि तिळगुळाचे नाते सर्वश्रुत आहे. यावेळी तिळगुळाचे लाडू, वड्या, पोळ्या प्रत्येक घरीच तयार केल्या जातात. मी पण केल्या आहेत सोप्या पद्धतीने, तिळगुळ वड्या.. Varsha Ingole Bele -
पारंपरिक - गुळाची पोळी / तिळ गूळ पोळी (Tilgul Poli Recipe In Marathi)
#SWRस्वीट्स रेसीपी#गुळाची पोळी#तिळ गूळ पोळी#तिळ Sampada Shrungarpure -
तीळगुळ पोळी (tilgul poli recipe in marathi)
#EB9 #W9 #हीवाळा_स्पेशल #तीळगुळ पोळी ... तीळ गुळ पोळी आमच्या कडे नेहमी फक्त तीळगुळाचच सारण भरून पोळी केली जाते ...पण यावेसे मी तीळासोबत शेंगदाणे कूट टाकून हे सारण बनवलं आणि पोळी बनवली खूप छान लागते ......कोणी त्यात बेसन पण भाजून टाकतात पण मी नाही टाकले ...बेसन मी वरच्या कव्हर मधे टाकले ...तसे तीळगुळ पोळी बनवण्याची बहूतेक लोकांची पद्धत वेगवेगळी असते .. Varsha Deshpande -
तिळगुळ पोळी (teelgud poli recipe in marathi)
#मकर मकर संक्रांती हा हिंदू दिनदर्शिकेतील एक उत्सव दिवस असून तो सूर्य देवताला समर्पित आहे. पौष महिन्यात सूर्य मकर राशीवर येतो तेव्हाच हा सण साजरा केला जातो. सध्याच्या शतकात हा उत्सव जानेवारी महिन्याच्या चौदाव्या किंवा पंधराव्या दिवशी येतो, या दिवशी सूर्य धनु राशि सोडून मकर राशीत प्रवेश करतो. हा उत्सव साजरा करण्यासाठी महाराष्ट्रातील पारंपरिक 'गुल पोली', तिळगुळ वडी किंवा तिळगुळ लाडू तयार करतात. मूळ घटक गुळ व तीळ शरीराला उबदार ठेवतात आणि थंडीच्या काळात आवश्यक प्रमाणात पोषण देतात. Pranjal Kotkar -
तिळगुळ पोळी (tilgul poli recipe in marathi)
#EB9 #W9आम्ही संक्रांतीला तिळगुळ ची पोळी करतो ती रेसिपी Shital Ingale Pardhe -
-
-
तिळगुळ पोळी (tilgul poli recipe in marathi)
#EB9 #W9खास संक्रांत सणासाठी ,प्रवासाला नेण्यासाठी अत्यंतखास अशी ही .:-) Anjita Mahajan -
आईची तिळगूळ पोळी (aaichi tilgul poli recipe in marathi)
#kd ही रेसिपी माझी आई नेहमी संक्रांत मध्येही बनवते,आणि तिची हातची पोळी म्हणजे मला फार आवडते😋😋😋 !!!!! शेफ आशा बिठाणे -
खमंग खुसखुशीत स्वादिष्ट शेंगदाण्याची पोळी (shengdanyachi poli reicpe in marathi)
#रेसिपीबुक #week11#पुरणपोळीशेंगदाणे आणि गुळाचं सारण घालून बनवलेल्या ह्या पोळ्या म्हणजे महाराष्ट्रातील लोकप्रिय पदार्थ आहे. अतिशय पौष्टिक आणि स्वादिष्ट अशा ह्या पोळ्या बनवायला अगदी सोप्या आहेत. घरात नेहमी असणारं साहित्य वापरून ह्या पोळ्या अगदी झटपट करता येतात. Sudha Kunkalienkar -
तिळगुळ पोळी (tilgul poli recipe in marathi)
विंटर स्पेशल##week9#EB9तिळगुळ पोळीहिवाळ्याच्या सुरवातीला येणारे तिळ उष्ण असल्यामुळेआहारात वापर करण्यात येतो. मकर संक्रांतीला आवर्जून तिळगुळ पोळी केल्या जाते. Suchita Ingole Lavhale -
तीळगूळ पोळी (til gud poli recipe in marathi)
#मकर...मकर संक्रांतीला आवर्जून केला जाणारा प्रकार तीळगूळ पोळी ...पण आमच्या कडे गाजराचा हलवा पण मकर संक्रांतीला करतात ...आज मी दोन्ही प्रकार बनवलेत दोन्ही खूपच सूंदर झालेत ....आमच्या कडे पोळ्या जरा क्रंची आणी खरपूस भाजलेल्या तूप लावून कडकसर अशा आवडतात ...या करून 2-3 दिवस खाऊ शकतो .... Varsha Deshpande -
तिळगुळ वडी (tilgul wadi recipe in marathi)
#EB9 #W9संक्रांत spl कड्डम kuddam तिळगुळ वडी Charusheela Prabhu -
खवाबेस पोळी (khawabase poli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 सात्विक रेसिपी खव्याच्या पोळ्या मी पोळीचे नवीनच नामकरण केलेले आहे पहिल्यांदा. तसे तर मी खव्याच्या पोळ्या बनवते पण आता तुम्हाला सांगायचा आहे ना सगळी रेसिपी आणि मी त्यामध्ये बेसन पण ऍड केला आहे त्यामुळे मी त्याचं नवीन नामकरण खवाबेस केले. खव्याच्या पोळ्या सगळेच करतात पण त्या जास्तच गोड होते म्हणून मी त्यामध्ये बेसन ऍड केले तुम्ही पण बनवून पहा खूप छान लागतात. काहीतरी नवीन टेस्ट माझ्या घरी नागपंचमीचे करंज्या बनवायला खवा आणलेला होता त्यामधून वाचलेल्या खव्याच्या पोळ्या करण्याचा बेत होता माझा आणि आपल्याला सात्विक रेसिपी नवीन चॅलेंज पण आले होते तर म्हटलं चला नवीन काहीतरी करावे आणि ते पण एक नंबर झाली मला करून खूप आनंद झाला मैत्रिणींनो चला तर बनवूया खव्याच्या पोळ्या नाही नाही खवा बेस पोळी.... Jaishri hate -
खमंग तिळगुळाची पोळी (Tilgulachi Poli Recipe In Marathi)
#LCM1खमंग हा शब्द जणू तिळगुळाच्या पोळीला चिकटलेलाच आहे ती. पोळी खमंगच लागते. तिळगुळाची पोळी म्हटलं की घरातल्या सगळ्यांच्या डोळ्यात खुशी दिसते. तर अशी ही खुसखुशीत खमंग तिळगुळाची पोळी बघूया Anushri Pai -
खवा पोळी (khava poli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 नारळीपोर्णीमा स्पेशल ..नारळीपोर्णीमेला ...मी पण नारळी भात मीठाई वगरे करते पण जेवणात मीठाई कोणाला खायला आवडत नाही म्हणून ..खवा पोळी केली ...खूप सूंदर खरपूस छान झाली ....ही पोळी खवा ऐवजी खवा पेढे पण वापरून करू शकतो ... Varsha Deshpande
More Recipes
टिप्पण्या (2)