मालपुआ (Malpua Recipe In Marathi)

#HR1 होळी रे होळी पुरणाची पोळी असं जरी म्हटलं गेलं असेल तरी होळी म्हटलं की रंगांसोबत गोडवा आलाच मग त्यात गोड पदार्थांची रेलचेल राहतेच आज आपण असाच होळी स्पेशल पदार्थ मालपोआ बनवणार आहोत तयारी असेल तर हा पदार्थ झटपट बनवता येतो. चला तर मग आज आपण मालपुवा बनवूयात
मालपुआ (Malpua Recipe In Marathi)
#HR1 होळी रे होळी पुरणाची पोळी असं जरी म्हटलं गेलं असेल तरी होळी म्हटलं की रंगांसोबत गोडवा आलाच मग त्यात गोड पदार्थांची रेलचेल राहतेच आज आपण असाच होळी स्पेशल पदार्थ मालपोआ बनवणार आहोत तयारी असेल तर हा पदार्थ झटपट बनवता येतो. चला तर मग आज आपण मालपुवा बनवूयात
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम आपण मालपोळ्यासाठी लागणारा पाक तयार करून घेऊयात पाक म्हणजे एक तारीख किंवा दोन तारीख नव्हे तर जेवढी साखर घेतली आहे त्याच्या निम्मे पाणी घालून ही साखर विरघळेपर्यंत उकळायचे आहे व त्यानंतर किमान दोन मिनिटे उकळून गॅस बंद करायचा आहे त्यामध्ये केशर वेलची पूड ही घालायची आहे
- 2
आता मालपुवा साठी लागणारे रवा मैदा आणि गव्हाचे पीठ एकत्र करून घ्यायचं आहे चिमूटभर मीठ घालायचं त्यानंतर त्यामध्ये सौफ ची पावडर किंवा भरड घालायची आहे हे सर्व आधी कोरडे चमच्याने मिक्स करून घ्यायचे आणि नंतर त्यात दूध घालून हळूहळू त्याचे छान डोशाप्रमाणे बॅटर तयार करायचे आहे
- 3
हे बॅटर तयार करून दहा ते पंधरा मिनिटं किंवा अर्धा तास झाकून ठेवायचे आहे त्यानंतर तूप कढईमध्ये गरम करायचे आहे कढई पसरट असावी किंवा तुम्ही पॅनही घेऊ शकता तूप चांगले गरम झाल्यानंतरच त्यात मालपुवा चे बॅटर चमच्याने गोलाकार सोडायचे आहे पुरीचा आकार येईल एवढे बॅटर घातल्यानंतर ते एका बाजूने चांगले भाजू द्यायचे आहे
- 4
त्याला चॉकलेटी रंग आल्यानंतर त्याला पलटावे दोन्ही बाजूनी छान चॉकलेटी रंगावर या पुऱ्या परताव्यात त्यानंतर त्या तेलातून काढून पाकामध्ये घालायचे आहेत आणि दोन्ही बाजूंनी भिजवायचे आहेत आणि मग त्या बाहेर काढून ठेवाव्यात अशा सर्व पुऱ्या झाल्यानंतर त्याच्यावरती ड्रायफ्रूट किसावेत
- 5
तयार आहे आपला मालपुवा हा मालपुवा तुम्ही गरमागरम किंवा थंड करूनही खाऊ शकता तुम्हाला नक्कीच खव्याच्या जिलेबी ची आठवण मालपुवा खाल्ल्यावर येईल
Similar Recipes
-
चिक्कू मालपुवा (नो मैदा नो शुगर लेस घी) (chickoo malpua recipe in marathi)
#hr#मालपुवाहोळी म्हटले की विविध पदार्थांची चांगलं असते .घरी येणाऱ्या पाहुण्या स्थी थंडाई मालपुवा चणे अगदी ठरलेले.आज थोडे वरिएशन करावे व हेल्दी असावे असे ठरवून घरी चिकू पावडर होती .केलेत मालपुवा त्यावर मध म्हणजे अप्रतिम अशी पावती मिळाली. Rohini Deshkar -
बेबी कॉर्न स्टिक्स (Baby Corn Sticks Recipe In Marathi)
#HR1 होळी म्हटलं की रंगांसोबतच खाद्यपदार्थांची ही रेलचेल असते आज आपण बेबी कॉन्स्टिक्स बनवणार आहोत आता मग आज बनवूया बेबी कॉर्नस्टिक्स Supriya Devkar -
पारंपरिक पुरणपोळी (paramparik puran poli recipe in marathi)
#hr#puranpoliहोळी रे होळी, पुरणाची पोळी...होळीला पुरणपोळीचा नैवेद्य हा हवाच. घरोघरी पुरणपोळ्यांचा सुवास दरवळू लागतो. पदार्थ जरी तोच असला तरी प्रत्येकाची बनवण्याची रीत वेगवेगळी असते. आज मी घेऊन आले आहे थोडीशी वेगळी पण पारंपरिक पुरणपोळीची रेसिपी जी मऊ, लुसलुशीत,तोंडात टाकताच लगेच विरघळणारी. मला ही रेसिपी सासूबाईंनी शिकवली. त्यांना त्यांच्या सासूबाईंनी शिकवली.कदाचित त्यांनाही त्यांच्या सासूबाईंनी शिकवली असेल. चला तर मग पाहूया पारंपरिक पुरणपोळी रेसिपी. Shital Muranjan -
गव्हाच्या पिठाचे मालपुव (gavyachya pithache malpua recipe in marathi)
#rbr#गव्हाच्या पिठाचे मालपुवा. मालपुवा ही राजस्थानी मिठाई आहे.विशेष करून मालपुवा हा राजस्थान ,गुजरात ,मध्य प्रदेश या भागांमध्ये जास्त बनविला जातो. श्रावण महिन्यात मारवाडी कम्युनिटीज चे रक्षाबंधन, तीज, जन्माष्टमी हे मोठे सण असतात. मारवाडी लोक खास करून या सणासाठी मालपुवा, घेवर, सत्तू चे लाडू तयार करतात. तसेच मालपुवाचे वेगवेगळ्या प्रकारे, वेगवेगळे घटक वापरून बनविले जाते. तर मी आपल्यासाठी मैदा न वापरता गव्हाच्या पिठाचे हेल्दी असे मालपुवा बनवत आहे.स्नेहा अमित शर्मा
-
मालपुवा (malpua recipe in marathi)
#पश्चिम#मध्यप्रदेशआज़ मी मध्यप्रदेश मधील मालपुवा हा गोड पदार्थ केला आणि खूप छान झाला. Nanda Shelke Bodekar -
खमंग पुरण पोळी (khamang puran poli recipe in marathi)
#hr#खमंग पुरण पोळी#पारंपरिक पदार्थप्रत्येक सणाला कुठला तरी पदार्थ हा नित्यनेमाने केला जातो जसे की होळी आली की पुरणाची पोळी ही असतेच आणि तशी म्हणही आहेच की,होळी रे होळी पुरणाची पोळी...म्हणजे या सणाच आणि पुरणाचा घनिष्ट नात आहेच... खमंग भाजलेली पुरणाची पोळी आणि त्यावर तुपा चा झालेला अभिषेक....अहाहा....सगळ्या गोडाच्या पदार्थात मानाचे स्थान पुरण पोळी ला आहे...वडा पुरणाचा नैवेद्य हा कुळचारिक मानल्या जातो मराठी घरात एक तर कटाच्या आमटी सोबत पुरणाची पोळी खाली जाते... नाहीतर विदर्भ खाद्यसंस्कृती मध्ये आंब्याचा रस,दूध आणि तुपा सोबतही ही पोळी खाली जाते....पुरणाची पोळी ही दुसऱ्या दिवशी दुधा सोबत खूपच छान लागते बरं का..असो....पंगतीत पुरणाची पोळी वाढताना पोळी तव्यावरून काढली की तुपाची धार सोडली जाते....अशाच खमंग पुरणाच्या पोळ्याची रेसिपी..... Shweta Khode Thengadi -
पुरणपोळी (Puran Poli Recipe In Marathi)
#HR1 #होळी रे होळी पुरणाची पोळी # होळी च्या सणाला आपल्या महाराष्ट्रात घरोघरी नेवेद्यासाठी पुरणपोळी चा घाट घातला जातोच चलातर . पुरणपोळीची रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
पुरणपोळी
#पुरणपोळीहोळी रे होळी पुरणाची पोळी! होळी च्या सणा निम्मित बनवली आहे मस्त मऊ लुसलुशीत पुरणपोळी. Varsha Pandit -
होली स्पेशल मालपुवा (malpua recipe in marathi)
#hr उत्तर भारतामध्ये होळी मध्ये केला जाणारा खूप स्वादिष्ट असा हा पदार्थ करायला सोपा असा वाटतो पण सर्वांना करता येत नाही मालपुवा कणकेचा मैद्याचा आणि रव्याचा केला जातो आणि नुसता पाठवून पण खाता येतो आणि जर सोबतीला जर रबडी असेल तर त्याची काही मजा औरच R.s. Ashwini -
राजस्थानी रबडी मालपुआ (rajasthani rabdi malpua recipe in marathi
#पश्चिम #राजस्थानराजस्थानी पारंपरिक रबडी मालपुआ मऊ लुसलुशीत आणि स्वादिष्ट पदार्थ आहे. Shama Mangale -
पुरणपोळी (puran poli recipe in marathi)
#hr आपल्या मराठी लोकांकडे प्रत्येक सणांचे फार महत्त्व आहे. त्या दिवशी ठराविकच पारंपरिक स्वयंपाक करण्याची पद्धत पडलेली आहे. निरनिराळ्या सणाला वेगवेगळे पदार्थ बनविले जातात. त्यातलाच "होळीचा" सण. होळीच्या सणाला पुरणपोळी बनवितात. "होळी रे होळी पुरणाची पोळी"..असे म्हणून मुलं बोंब ठोकतात.. तर पुरणपोळीची ही रेसिपी...🥰 Manisha Satish Dubal -
रबडी मालपुआ (malpuva recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3नैवेद्य १आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज नैवेद्यासाठी मी रबडी मालपुआ बनवला. मिठाई म्हटलं तर दुधाचीच. कुठे दूध फाडून, कुठे दूध आटवून ती केली जाते. अर्थात, बुंदी, मोहनथाळसारखे अपवाद आहेत. परंतु, त्यातही मैद्यापासून बनणारा मालपुआ हटकेच म्हटला पाहिजे. जगन्नाथाच्या प्रसादापासून मुस्लिम बांधवांच्या इफ्तारपर्यंत सर्वमान्यता मिळालेली ही मिठाई एकमेव असावी. दुकानातही फारसा न मिळणारा हा प्रकार अलीकडे काही मॉलमध्येही दिसू लागला आहे. मिठाईची संस्कृती प्रत्येक प्रांतात वेगळी परंतु मालपुआ या प्रकाराला कोण्या एका विशिष्ट प्रांताचे लेबल नाही. स्मिता जाधव -
पुरणपोळी आणि आटीव दूध (Puran Poli Recipe In Marathi)
#HR1होळी रे होळी पुरणाची पोळी!!होळी या सणाबरोबरच सप्तरंग, उत्साहाचे वातावरण,खमंग पुरणपोळी आणि बरोबर आटीव दूध किंवा साजूक तूप. हे सगळं वातावरण तयार होते. लहान मुलांना रंगाचं आणि पुरणपोळीचा आकर्षण असतं आणि हा एक असा सण आहे की घरातले सर्व यात सहभागी होतात. भावपूर्ण रीतीने होळीची पूजा केली जाते.होळीला नारळ अर्पण केला जातो. त्याचबरोबर स्वतःमध्ये असलेले दुर्गुण आणि वाईट आठवणी होळी बरोबरच जाळून नवीन उमंग आणि नवीन विचाराने पुढील आयुष्य एकमेकांना शुभेच्छा देऊन सुरू केले जाते. Anushri Pai -
मालपुआ (Malpua recipe in marathi)
होळी स्पेशल रेसिपी#HSRमालपुआ, खवा, मैदा दुध या पासुन तयार होणारी अप्रतिम चवीची ही रेसिपी होळी च्या निमित्त केली. Suchita Ingole Lavhale -
पुरणपोळी
#पुरणपोळीहोळी म्हटलं की पुरणपोळी हवीच. मग ती तेलपोळी असू दे किंवा खापरावरची पोळी असु देत. मी आज पुरणात केशर घालून पुरणपोळी बनविली, स्वाद तर अहाहा.....शिजवलेल्या चणाडाळीतले पाणी काढून त्याची कटाची आमटी बनविली. Deepa Gad -
मालपुआ / मालपुवा (malpua recipe in marathi)
#पश्चिम #राजस्थान .स्पेशल रेसिपीज मधील ही एक रेसिपी आहे. मी पुष्कर, राजस्थान येथे गेलेली असताना तेथे खाल्ली होती. खूप छान लागते. Sujata Gengaje -
चूरमा लाडू (churma ladoo recipe in marathi)
#लाडू #साप्ताहिकरेसिपी लाडू म्हंटल की आपण रवा, बेसनाचे, नारळा चे लाडू नेहमीच करतो, पण आज मी चूरमा लाडू करणार. चूरमा लाडू हा राजस्थानातील पारंपारिक गोड पदार्थ आहे. जसे महाराष्ट्रात पूरणाची पोळी नैवेद्याला करतात तसे राजस्थानात चूरमा लाडू करतात. माझ्या मुलाला फार आवडतात हे लाडू. चला तर मग बघुयात चूरमा लाडू ची रेसिपी. Janhvi Pathak Pande -
कालाजाम (kala jamun recipe in marathi)
#shr #श्रTवण शेफ वीक3 श्रावण म्हणजे सणांची रेलचेल त्यातच उपासतापास नैवेद्याला रोज नविन गोड पदार्थ आलाच चला तर असाच गोड पदार्थ व त्याची रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
शेवेचे लाडू (sheveche ladoo recipe in marathi)
#ks6जत्रा म्हटली की खाद्य पदार्थांची रेलचेल असते.विविध गावाची खाद्य जत्राच असते. लाकडाऊन असल्याने जत्रा नाही आहे.पण कुकपॅडमुळे आपण जत्रेत मिळणारे पदार्थ घरी बनवून खाऊ शकतो.चला तर मग असाच एक पदार्थ करूया जत्रेत मिळणारे शेवेचे लाडू . Shilpa Ravindra Kulkarni -
मिनी मटार पनीर करंजी (mini matar paneer karanji recipe in marathi)
#hr"'सर्वांना होळीच्या रंगमय शुभेच्छा""होळी रे होळी पुरणाची पोळी "हे समीकरण तर ठरलेलंच आहे . परंतु या सणाला बरेच पदार्थ बनवतात . उदा .- थंडाई ,मठरी ,गुजिया, कबाब वगैरे... पण मी येथे डेलिशीअस, कलरफुल ... मिनी मटार पनीर करंज्या केल्या आहेत .अत्यंत चविष्ट , खुसखुशीत, यम्मी लागतात. कशी करायची ते पाहूयात .... Mangal Shah -
पुरणपोळी कटाची आमटी (puran poli recipe in marathi)
#hr होळी रे होळी पुरणपोळी ,असं वातावरण आज सगळीकडे आपल्याला पाहायला मिळते. म्हणूनच प्रत्येक घरात आज पुरणपोळी चा बेत असतोच. त्यात आपल्या भारतीय परंपरेनुसार आपले सण पुरणपोळी शिवाय होतच नाहीत ,तर मग होळी कशी बिना पुरणपोळी होईल म्हणून आज मी देखील पुरणपोळी बनवली तर मग बघू माज्या पुरणपोळी ची पाककृती.. Pooja Katake Vyas -
गाजर मालपुवा (Gajar malpua recipe in marathi)
#HSRहोळी स्पेशल रेसिपी गाजर मालपुवासाधारणता एमपी, यूपीमध्ये होळी खूप मोठ्या प्रमाणात मनवली जाते. तिकडचा होळी ला खास मालपुवा बनवला जातो.मालपुवा म्हंटलं की मग त्याच्यात मैदा ,तूप, साखर आली म्हणजे खाणाऱ्याला टेन्शनच. म्हणूनच त्याला थोडासा पोष्टिक बनवण्याचा मी प्रयत्न केला आहे. Deepali dake Kulkarni -
मालपुआ.. खव्याचा (Malpua Khavyacha Recipe In Marathi)
#ATW2#TheChefStory..या आठवड्याच्या थीमनुसार मी केलेले आहेत खव्याचे रसदार मालपुए... वेगवेगळ्या प्रकारचे मालपुए तयार करताना, मी आज त्यात खव्याचा वापर केलेला आहे . तेव्हा बघूया.. Varsha Ingole Bele -
पुरणपोळी (Puranpoli recipe in marathi)
पुरणपोळी#HSRHOLI RECIPESहोळी रे होळी पुरणाची पोळी....होळीच्या दिवशी पुरणपोळीचा नेवैद्य महत्त्वाचा मानला जातो. होळीच्या दिवशी महाराष्ट्रीय घरामध्ये पुरणपोळी केली नाही असं सहसा होत नाही. खूप सोप्या पद्धतीने तुम्ही ही घरच्या घरी पुरण पोळी बनवू शकता, मग वाट कसली पाहताय लागा तयारीला आणि करा ही होळी पुरणपोळीसोबत साजरी! Vandana Shelar -
मावा गुजिया (Mawa Gujiya Recipe In Marathi)
#होळी_स्पेशल_ रेसिपी#HR1 मावा गुजिया.. होळीच्या सर्वांना सप्तरंगी शुभेच्छा..🎉🎊 रंग बरसे..❤️💙💚💛🧡💜🖤 चिंता,क्लेश,वाईट विचार,दु:ख यांचे होळीत दहन करुन सप्तरंगांची उधळण करत दुसर्या दिवशी धुळवड,धूलिवंदन आपण साजरी करतो..धुळवडीपासून नवचैतन्याचा, नवस्रुजनाचा,निसर्गाच्या नव आविष्काराचा, नवीन कोवळ्या लुसलुशीत पोपटी रंगाच्या पालवीचा,कोकिळेच्या कुहू कुहू चा वसंतोत्सव सुरु होतो..संपूर्ण निसर्गात आनंदाची लहर पसरते..आणि याच वसंतोत्सवाच्या स्वागताची सुरुवात आपण धुळवडीच्या दिवशी एकमेकांवर रंगांची बरसात करुन,आपसातील मतभेद विसरुन नव्याने नात्यांची वीण बांधतो..खरंच खूपच हर्षोल्हासाचं वातावरण असतं..😍..आणि या अशा वातावरणात खायला आवडीचे पदार्थ असतील तर मग वाह क्या बात है..❤️ ,होळी रे होळी ..पुरणाची पोळी..थंडाई,मावा गुजिया,जिलेबी,मठरी,निमकी,फाफडा असा चवदार बेत असतो बहुतेकांकडे..तर आज आपण या सणाचे गोडव्याने स्वागत करण्यासाठी उत्तर भारतात हमखास केला जाणारा मावा गुजिया ही अतिशय स्वादिष्ट रेसिपी करु या..मावा गुजिया हा सतराशे वर्षांपूर्वी मध्यप्रदेशातील बुंदेलखंड या भागात होळीच्या निमित्ताने प्रथम तयार केला गेला..आणि तो मग भारतभर पसरला..अतिशय नजाकतीचा ,मधुर असा हा पदार्थ..😍..मावा गुजिया तोंडात घातल्यावर डोळे मिटून च आस्वाद घ्यायचा ..हे याचं शास्त्र असतं..😀 म्हणजेच मावा गुजियांचा मान राखला जातो..😍चला तर मग रेसिपीकडे जाऊ या.. Bhagyashree Lele -
गाजर मालपुआ
#गुढी#मालपुआमालपुआ म्हटलं की गव्हाच्या पिठाचा, मैद्याचा, रव्याचा वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये बनवू शकतो. तर मी आज गाजराचा मालपुआ बनविला आहे. Deepa Gad -
संत्र्याचा मालपुआ (orange malpua recipe in marathi)
#CookpadTurns4 #Cook_with_fruit Happy Birthday to Cookpad🎂💐🌹🎉🎊 Ranjana Balaji mali -
-
पालक पनीर पराठा (Palak Paneer Paratha Recipe In Marathi)
#TBR टिफिन म्हटल कि पोळी भाजी सोबत पराठा तर आलाच. आज आपण स्टफ्ड पनीर पराठा बनवूयात. Supriya Devkar -
मालपुवा...होळी स्पेशल (malpua recipe in marathi)
#मालपुवा..😋 भारतीयांची मने ही सणांमध्ये उत्सवांमध्ये खूप रमलेली असतात .त्याला कारणही असंच आहे. आपल्या भारतीय सण उत्सवांची परंपरा खूप मोठी आहे. प्रत्येक सण हा एखाद्या देवतेशी आणि निसर्गाशी जोडलेला आहे. त्यामुळे मुळातच उत्सवप्रिय असलेला भारतीय प्रत्येक सण मोठ्या उत्साहाने आनंदाने आणि मनापासून पूर्वापार शतकानुशतके साजरे साजरा करत आला आहे. या सगळ्या सणां मधून आपल्याला सकारात्मकता मिळते आपल्या जीवनात आलेली मरगळ या सणांच्या निमित्ताने दूर होते आणि माणूस परत ताजातवाना टवटवीत होतो. जगण्यासाठी अजुन काय हवं दुसरं.. आनंदी मन आणि समाधान...😍 या सगळ्या सणांच्या निमित्ताने माणसामाणसांमधील कधी उसवलेले नाते तर कधी विरलेले नाते परत जोडले जाते.. हे सणच माणसांना माणुसकीच्या ,जिव्हाळ्याच्या ,प्रेमाच्या बंधनात बांधून ठेवतात . सगळे गिले शिकवे दूर करतात हे सण आणि आपले जगणे सुकर समाधानी करतात..😊 तसेच भारत हा शेतीप्रधान देश असल्यामुळे शेती, निसर्ग आणि सण यांचा मिलाफ आपल्या पूर्वजांनी असा काही घडवून आणलेला आहे की आपण या सणांच्या निमित्ताने आपोआपच निसर्ग देवतेच्या जवळ जातो आणि निसर्ग देवतेच्या भव्यतेची, तिच्या औदार्याची,आपल्यावर दोन्ही हाताने भरभरून उधळणाऱ्या निसर्ग संपत्तीची आपल्याला जाणीव होते आणि आपण निसर्ग देवते पुढे नतमस्तक होतो.. असे हे आपले सण आणि उत्सव .. आपले Power house च.. चला तर मग आता होळी सण आहे .त्यानिमित्ताने होळी स्पेशल म्हणून जी रेसिपी भारतात केली जाते ती म्हणजे मालपुवा करुन होळीच्या सणाचा आनंद द्विगुणित करु या.. होळीच्या सर्वांना मंगलमयी आनंदमयी शुभेच्छा💐🌹🎊🎉❤️💙💛💚💜 Bhagyashree Lele
More Recipes
- कोथिंबीर वडी (Kothimbir Vadi Recipe In Marathi)
- मटार- वांग -बटाटा भाजी (Mix Bhaji Recipe In Marathi)
- उडीद डाळ चे वडे टॉमेटो चटणी (Urad Dal Vade Tomato Chutney Recipe In Marathi)
- पुदिना- कोथिंबीर शाही पुलाव (Pudina Kothimbir Pulao Recipe In Marathi)
- चवळीची गरम मसाल्याची आमटी (Chavlichi Garam Masala Amti Recipe In Marathi)
टिप्पण्या