रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मिनिटे
२ व्यक्तींसाठी
  1. उकडलेले बटाटे
  2. १ मध्यम आकाराचा कांदा
  3. 1 वाटी चिरलेली कोथिंबीर
  4. १५० ग्रॅम दही
  5. १/४ टी स्पून हळद
  6. १/२ टी स्पून chat masala
  7. १/२ टी स्पून लाल तिखट
  8. १ टी स्पून मसाला

कुकिंग सूचना

१० मिनिटे
  1. 1

    बटाटे स्वच्छ धुवून उकळवून घ्या. एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घ्यावा. कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी. दही छान फेटून घ्यावे

  2. 2

    दह्यामध्ये हळद, chat masala, तिखट, मसाला घालून पुन्हा छान फेटून घ्या, व बाजूला ठेवा.

  3. 3

    पॅनमध्ये तेल घालून गरम करून घ्या. गॅस मंद आचेवर असू द्या. आत्ता तेलावर मोहरी जिरे हिंग यांची फोडणी करावी व कांदा घालून परतावे. नंतर यावर उकडलेला बटाटा घाला व सोबत थोडी कोथिंबीर ही घालून पुन्हा छान परतून घ्यावे.

  4. 4

    कांदा गुलाबी व थोडा नरम झाला की यावर दही फेटलेले पेस्ट घाला. व ढवलात रहा, जेणेकरून दही फाटणार नाही.

  5. 5

    छान दही बटाटा २ मिनिटात तयार.. घाई असल्यास झटपट होणारी ही पाककृती आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Gautami Patil0409
Gautami Patil0409 @cook_19582560
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes