रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिटे
४ ते ५ व्यक्तींसाठी
  1. 8 ते दहा ओले बोंबील
  2. 2 इंचआले
  3. ५-६ हिरव्या मिरच्या
  4. 1लसूण कांदा
  5. 1वाटी कोथिंबीर
  6. 8 ते दहा कढीपत्त्याची पाने
  7. 2 टी स्पूनमसाला
  8. 1 टी स्पूनलाल तिखट
  9. 1 टी स्पूनहळद
  10. १/४ टी स्पून हिंग
  11. चवी नुसार मीठ
  12. अर्धी वाटी बारीक रवा
  13. 1 वाटी तांदूळ पीठ
  14. तळण्यासठी तेल

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    बोंबील स्वच्छ कापून धू वून घ्या. बोंबील मधून चिरून घ्या. लसूण पाकळ्या, आले, मिरच्या, कढीपत्ता, कोथिंबीर यांचे वाटण करून घ्या. हळद मीठ मसाला हिंग लाल तिखट एकत्र करून घ्या.

  2. 2

    बोंबील ला वाटण लावून १०)१५ मिनिटे ठेवून द्या. तांदूळ पीठ व रवा एकत्र करून एका पसरट थाळीत घ्या.

  3. 3

    बोंबलाल हळद मीठ तिखट मसाला वगैरे समान लावून घ्या.

  4. 4

    एका बाजूला पॅनमध्ये तेल गरम करून घ्या. टीप: बोंबील तळताना गॅस मंद आचेवर ठेवा, म्हणजे बोंबील तुटणार नाहीत. रवा आणि पिठाच्या मिश्रणात एक एक बोंबील घोळवून घ्या.

  5. 5

    तेलावर बोंबील तळण्यासाठी सोडा, पाच सहा मिनिटे झाली की दुसऱ्या बाजूला उलथून घ्या. दोन्ही बाजूला मस्त खरपूस तळून घ्या.

  6. 6

    गरम बोंबील लगेचच जीभेवर तरळू द्या... अहाहा.... आणखी काय...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Gautami Patil0409
Gautami Patil0409 @cook_19582560
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes