चिली प्रॉनस

Gautami Patil0409
Gautami Patil0409 @cook_19582560
Mumbai

#सीफुड
#स्टार्टर

चिली प्रॉनस

#सीफुड
#स्टार्टर

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिट्स
4 व्यक्तींसाठी
  1. 1वाटी सोलून साफ केलेली कोळंबी
  2. 1वाटी बारीक चिरलेली भोपळी मिरची
  3. 1वाटी बारीक चिरलेल गाजर
  4. 1वाटी बारीक चिरलेले कोबी
  5. 1वाटी बारीक चिरलेला कांदा
  6. 1वाटी बारीक चिरलेला पाती कांदा
  7. 1 टेबल स्पूनहिरवी मिरची बारीक चिरलेली
  8. 1 टेबल स्पूनलसूण बरिक चिरलेला
  9. 1 टेबल स्पूनआले बारीक चिरलेले
  10. 1अंडे
  11. 1/4वाटी corn flour
  12. 1वाटी मैदा
  13. 1 टी स्पूनलाल तिखट
  14. 1.1/2 टी स्पून चिली सॉस
  15. 1 टी स्पूनसोया सॉस
  16. 1/4 टी स्पूनव्हिनेगर
  17. 1/4 टी स्पूनसाखर
  18. चवीनुसार मीठ

कुकिंग सूचना

15 मिनिट्स
  1. 1

    चिरलेल्या भाज्या खालील प्रमाणे.

  2. 2

    आधी कोळंबी तळून घेऊया, त्यासाठी लागणारे साहित्य खाली दर्शविले आहे.

  3. 3

    एका भांड्यामध्ये एक वाटी मैदा आणि पाव वाटी कॉर्न फ्लोअर मिक्स करून घ्यावे, यात एक चमचा लाल तिखट व मीठ घालून पुन्हा एकजीव करावे, यात एक अंडे घालून छान फेटून घ्यावे. नंतर यात थोडे थोडे पाणी घालून सतत ढवळा, जेणे करुन गुठळ्या होणार नाहीत. मिश्रण भाजीच्या पिठाप्रमाणे जाड असावे, खाली दर्शविले आहे.

  4. 4

    कढई मध्ये तेल गरम करून घ्या, पीठ मध्ये कोळंबी बुडवून एक एक तळून घ्या, दोन्ही बाजूला छान लालसर होऊ द्या. टी शू पेपर वर पसरवून अतिरिक्त तेल काढून घ्यावे. सध्या कोरोना मुळे मांसाहार विषयी बऱ्याच शंका आहेत तेव्हा मासे किंवा चिकन, मटण काहीही असो व्यवस्थित शिजवून घ्या.

  5. 5

    एका नॉनस्टिक पॅनमध्ये तेल गरम करून घ्या. यात मिरची लसूण व आले परतवून घ्या. यांचा रंग बदलला की या वर कांद्याची पात सोडून इतर सर्व भाज्या मोठ्या आचेवर परतवून घ्या. चायनीज शिजवताना गॅस मोठाच असावा. यात आधी सोया सॉस, व नंतर चिली सॉस घालून परतावे.

  6. 6

    नंतर चवीनुसार मिठ व थोडीशी साखर घालून पुन्हा छान परतून घ्यावे, यात आत्ता तळलेली कोळंबी घालून पुन्हा एकजीव करावे. वरून कांद्याची पात घालावी. चायनीज पदार्थ नेहमीच गरम गरम सर्व्ह करण्यात मजा येते... गरमागरम चिली प्रॉन स्वाहा होण्यास तयार... मासे खणाऱ्यासाठी हे फार आवडीचे स्टार्टर आहे..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Gautami Patil0409
Gautami Patil0409 @cook_19582560
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes