गाजर- मका खीर (gajar maka kheer recipe in marathi)

Pradnya Purandare
Pradnya Purandare @pradnya_dp
Mumbai

#फोटोग्राफी
या दोन गोष्टींना एकत्र करून इतकी छान चवदार खीर बनेल असे वाटले न्हवते पण दोन्ही पदार्थांचा स्वतःची गोडी त्या खीरे मध्ये उतरली आणि ओल्या नारळाची त्याला साथ मिळाली. कमी साखरेचा वापर करून बनलेली पहिलीच खीर असेल.. नक्की करून पहा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20-25 मिनिटे
2-3 जणांसाठी
  1. 1/2 कपमका दाणे
  2. 1लहान किंवा अर्धे मोठे गाजर
  3. 2 टेबलस्पूनओला नारळ किसून
  4. 1 कपदूध
  5. 2 टेबलस्पूनतूप
  6. 3-4 टेबलस्पूनसाखर
  7. बदाम, काजू तुकडे
  8. 1 टीस्पूनवेलची पावडर

कुकिंग सूचना

20-25 मिनिटे
  1. 1

    प्रथम गाजराचे पातळ स्लाइस करून ते आणि मका दाणे उकडून घ्या. चाळणी मध्ये काढून पाणी पूर्ण निथळून घ्या. थंड झाल्यावर मिक्सर मध्ये मका, गाजर आणि ओला नारळ एकत्र करून त्याची बारीक पेस्ट करा (पाणी घालू नका)

  2. 2

    एका जाड बुडाच्या भांड्यात तूप घालून त्यात प्रथम बदाम काजू तुकडे घालून परतून घ्या मग त्यात वरील पेस्ट घालून मंद आचेवर गुलाबी भाजून घ्या.

  3. 3

    त्यानंतर त्यात दूध घालून मिक्स करा आणि हलवत राहून उकळी आणा. नंतर त्यात साखर आणि वेलची पावडर घालून थोडी दाट होईल अशी उकळवा. थंड झाल्यावर फ्रीज मध्ये ठेवा व गार सर्व्ह करा खूप छान लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pradnya Purandare
Pradnya Purandare @pradnya_dp
रोजी
Mumbai
Easy serv in busy life.. Haveeka
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes