मिक्स डाळी बेस पिझ्झा (Mix dal Base Pizza Recipe in Marathi)

Kalpana Pawar
Kalpana Pawar @Cook_20551026

#स्ट्रीट

मिक्स डाळी बेस पिझ्झा (Mix dal Base Pizza Recipe in Marathi)

#स्ट्रीट

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. ५० ग्रॅम हरभरा डाळ
  2. ५० ग्रॅम मुग डाळ
  3. ५० ग्रॅम उडीद डाळ
  4. १५० ग्रॅम तांदूळ
  5. 1 टेबल स्पूनमीठ
  6. 2 टेबल स्पूनतेल
  7. 1 टेबल स्पूनलाल-टोमॅटो चटणी
  8. 1 टेबल स्पूनकैरी चटणी
  9. सिमला, टोमॅटो कांदा काकडी सॅलड्स
  10. 1 टेबल स्पूनलोणी
  11. 1 टेबल स्पूनकोथिंबीर
  12. 1क्यूब अमूल चिझ

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्व डाळी स्वच्छ धुऊन ७-८ तास भिजवून मिक्सर मधून काढून घेतले.

  2. 2

    मिक्सर मधून काढून घेतलेले पीठ ५-६ तास झाकून ठेवावे.नंतर मीठ घालून ढवळावे व.पॅन गरम करून झाल्यावर गॅस कमी करून पॅनमध्ये तेल घालून आपण तयार केलेले ‌‌‌बॅटर एक डाव भरून पॅनमध्ये पसरवावे.

  3. 3

    पिझ्झा बेस उलटून त्यावर लाल चटणी पसरवून त्यावर सॅलड्स-सिमला, टोमॅटो कांदा काकडी थोडे थोडे अंतरावर ठेवून वरून कैरीची हिरवी चटणी पसरवली.

  4. 4

    नंतर चिझ किसून स्प्रेड केले. पिझ्झाचे टाॅपिंग करेपर्यंत खालचा भाग खरपूस भाजून होतो. नंतर एका डिश मध्ये काढून डाळींब दाणे नी गार्निश करून सर्व्ह करावे.

  5. 5

    सर्वांच्या आवडीचा पिझ्झा ताबडतोब फस्त होतो, एकदा नक्की करून बघा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Kalpana Pawar
Kalpana Pawar @Cook_20551026
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes