मिक्स डाळी ढोकळा (MIX DAL DHOKALA RECIPE IN MARATHI)

Kalpana Pawar
Kalpana Pawar @Cook_20551026

मिक्स डाळी ढोकळा (MIX DAL DHOKALA RECIPE IN MARATHI)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. ३०० ग्रॅम तांदूळ
  2. १०० ग्रॅम उडीद डाळ
  3. ५० ग्रॅम हरभरा डाळ
  4. 20 ग्रॅममेथी दाणे
  5. 1 टेबल स्पूनमीठ
  6. हिरवी चटणी :
  7. ५-७ हिरव्या मिरच्या
  8. 2इंचआले
  9. १०-१५ लसूण पाकळ्या
  10. 1 टेबल स्पूनजिरे
  11. 1 टेबल स्पूनओवा
  12. 1/2 टिस्पून मीठ
  13. १०-१२ कढीपत्ता पाने
  14. 1 टेबल स्पूनकोथिंबीर
  15. तडका :
  16. 1 टेबल स्पूनमोहरी
  17. 3-4हिरव्या मिरच्या
  18. १०-१२ कढीपत्ता पाने
  19. 1 टेबल स्पूनसाखर
  20. 1 टिस्पून काळं मीठ
  21. 2 टेबल स्पूनतेल

कुकिंग सूचना

  1. 1

    तांदूळ हरभरा डाळ, उडीद डाळ व मेथी दाणे धूवून ५-६ तास पाण्यात भिजत घालून नंतर धूवून मिक्सर मधून ग्राइंड करून घ्यावे.

  2. 2

    ४ ही पदार्थ मिक्सर मधून बारीक करून ३-४ तास झाकून ठेवावे. तो पर्यंत हिरव्या मिरच्या आले लसूण ओवा जिरे मीठ मिक्सर मधून हिरवी चटणी बारीक करून घ्यावे नंतर हिरवी चटणी व मीठ घालून सारखे एका बाजूने ढवळावे.

  3. 3

    ढोकळा पात्राला तेलाचा हात लावून त्यात हे मिश्रण. ओतून झाकण ठेवून १५ मिनिटे मेडिअम फ्लैमवर वाफवून घ्यावेत.

  4. 4

    १५ मिनिटांनंतर ढोकळा मऊलुसलुसीत फुलून आल्यावर एका पसरट भांड्यात पलटी करून घ्यावे.व तडका पॅनमध्ये तेल घालून त्यात मोहरी कढीपत्ता मिरचीचे तुकडे घालून चांगले तडतडल्यावर ढोकळ्यावर तो तडका ओतून घ्यावा. नंतर आपल्या आवडीच्या आकारात कट करून त्यावर तडका व कोथिंबीर ने गार्निश करून सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Kalpana Pawar
Kalpana Pawar @Cook_20551026
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes