तुपाची रोटी (गोड धान) (tupachi roti recipe in marathi)

Minu Vaze
Minu Vaze @minu_7700

#संगीता
तुपाची रोटी (गोड धान)
हि एक पारंपारिक पद्धत आहे ,माझी आजी सासु ही रेसिपी खूप छान बनवायची, मी पहिल्यांदाच ही रेसिपी बनवली,या रेसिपी ला मी थोड कलरफुल बनवलय, रेसीपी बनवताना मनात शंका येत होती, आपल्याला हा पदार्थ बनवायला जमेल की नाही,मग आईच बोलन लक्षात आल ती नेहमी बोलायची कोणताही पदार्थ बनवताना अगदी मन लावून बनवायचा, मग अगदी मन प्रसन्न ठेवून मी ही रेसिपी बनवली, आणी ती रेसिपी मला जमली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 3 वाटीसाखर
  2. 3 वाटीपाणी
  3. १ वाटी गुळ
  4. १ वाटि तांदूळ
  5. 1/2 वाटीतूप
  6. १ वाटी खवलेला नारळ
  7. चवीनुसारड्रायफ्रूट
  8. चवीनुसारवेलची,जायफळ

कुकिंग सूचना

  1. 1

    तांदूळ स्वच्छ धुऊन उन्हात वाळवून त्याची थोडी जाडसर पीठ करून घ्यावे.

  2. 2

    एका पातेल्यात ३ वाटी पाणी घालून, त्यात तांदूळ पिठी थोडी थोडी घालून चमच्याने ढवळत रहावे.नंतर त्यात गूळ, साखर,डायफुट,खवलेला नारळ, वेलची पावडर, जायफळ पावडर घालुन मिश्रण एकजीव करावे.

  3. 3

    मिश्रण एकजीव झाल्यावर त्यात तुप व खाण्याचा पिवळा रंग घालावा.

  4. 4

    पुन्हा मिश्रण एकजीव झाल्यावर गॅस कमी करून त्यावर झाकण ठेवावे.मिश्रण शिजवून घट्ट झाल्यावर,गॅस बंद करावा.मीश्रण थंड झाल्यावर पातेल्यात सुरीने कडा सोडून त्यावर एक झाकण ठेवून पातेल उलट फिरवून तुपाची रोटी काढून घ्यावी.

  5. 5

    आपल्याला हव्या त्या आकारात आपण तुपाची रोटी कापू शकतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Minu Vaze
Minu Vaze @minu_7700
रोजी

Similar Recipes