दही भल्ला (dahi bhalla recipe in marathi)

Vrunda Shende
Vrunda Shende @Vrundacook_23365995

#रेसिपीबुक #week 1 #दही भल्लानेहमी आपण उडदाच्या डाळीचा दहीवडा करतो. पण मी आज यात उडदाच्या डाळीचा सोबत मुगाची डाळ आणि थोडी चणाडाळ मिक्स केली. मी हा दही भल्लाकरून बघितला आणि खूप छान झाला

दही भल्ला (dahi bhalla recipe in marathi)

#रेसिपीबुक #week 1 #दही भल्लानेहमी आपण उडदाच्या डाळीचा दहीवडा करतो. पण मी आज यात उडदाच्या डाळीचा सोबत मुगाची डाळ आणि थोडी चणाडाळ मिक्स केली. मी हा दही भल्लाकरून बघितला आणि खूप छान झाला

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

14 घटक
  1. 1 वाटीउडदाची डाळ
  2. 1/2 वाटीमुगाची डाळ
  3. 1/4 वाटीचणाडाळ
  4. 1 टीस्पूनहिरवी चटणी
  5. 1 टीस्पूनचिंचेची चटणी
  6. 1 वाटीबारीक शेव
  7. 1 वाटीकोथिंबीर
  8. 1 टीस्पून जिरे पावडर
  9. 1 टी स्पूनचाट मसाला
  10. सजावटीसाठी डाळिंबाचे दाणे
  11. 2हिरव्या मिरच्या
  12. 1/2 लिटरदही
  13. चवीनुसारसाखर
  14. प्रमाणानुसार मीठ

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वप्रथम डाळ स्वच्छ धुऊन चार ते पाच तास भिजत घालावी. त्यानंतर स्वच्छ धुऊन मिक्सरमधून बारीक करून घ्यावी. डाळ बारीक करत असताना त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या आणि जिरे घालावे.. त्यानंतर प्रमाणानुसार मीठ घालावे किंचित सोडा घालावा आणि मिश्रण फेटून घ्यावे.

  2. 2

    गॅसवर कढई ठेवून तेल तापायला ठेवावे. तेल गरम झाले म्हणजे त्यामध्ये वडे घालावे. वडे बदामी रंगाचे होईस्तोवर मंद आचेवरतळून घ्यावे. एका बाजूने पातेल्यात गरम पाणी करायला ठेवावे. गरम पाणी झाले की तळलेल्या वड यांमध्ये घालावे. पाण्यामध्ये वडे म ऊ होऊ द्यावे.

  3. 3

    एका भांड्यामध्ये दही फेटून घ्यावे. फेटत असताना त्यामध्ये जिरे पावडर आणि साखर घालावे आणि पाण्यातील वड्यांचे पाणी दोन्ही हाताने दाबून काढून घ्यावे आणि हे वडे द-हयांमध्ये घालावे. दहया मध्ये वडे अर्धा ते एक तास ठेवावे. त्यानंतर डिश तयार करावी. एका प्लेटमध्ये दहीवडे घ्यावे. त्यावर चिंचेची चटणी हिरवी चटणी चाट मसाला लाल तिखट कांदे कोथिंबीर डाळींबाचे दाणे आणि बारीक शेव घालून डिश सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Vrunda Shende
Vrunda Shende @Vrundacook_23365995
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes