स्टफ्ड चणाडाळ ढोकळा डिस्क

Sneha Kasat
Sneha Kasat @Sneha_kitchen

स्टफ्ड चणाडाळ ढोकळा डिस्क

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 2 वाटीभिजवलेली चणाडाळ
  2. 2शिजवून किसून घेतलेला बटाटे
  3. 1कांदा बारीक चिरलेला
  4. 2 टेबलस्पूनहिरवी मिरची लसूण पेस्ट
  5. 1 टीस्पूनलाल मिरची पावडर
  6. 1/2 टी स्पूनहळद
  7. 2 टी स्पूनआमचूर पावडर
  8. चवीनुसारमीठ
  9. तेल भाजी फोडणीसाठी व ढोकळा वर पेरण्यासाठी
  10. 1 टेबल स्पूनमोहरी
  11. 4हिरव्या मिरच्या उभ्या चिरलेल्या
  12. 10 ते १२ कडीपत्ता पानं
  13. 1 टेबल स्पूनइनो
  14. बारिक चिरलेली कोथिंबीर
  15. हिरवी चटणी
  16. चिंच गूळ चटणी
  17. बारिक शेव
  18. बारिक चिरलेला कांदा

कुकिंग सूचना

  1. 1

    कढई मध्ये तेल घालून त्यात चिरलेला कांदा घालून चांगले परतून घ्या व त्यात लसूण व मिरची पेस्ट घालून परतून घ्या. त्यात बटाटा, हळद, लाल मिरची पावडर, आमचूर पावडर व चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करून घ्या.

  2. 2

    चणाडाळ मिक्सर मध्ये बारिक वाटुन घ्या. त्यात हळद व मीठ घालून मिक्स करून घ्या. बॅटर मध्ये १ टेबल स्पून इनो घालून चांगले फेटून घ्या. ग्लास मध्ये तेल घालून ग्रीस करुन घ्या. त्यात थोडे बॅटर घालून त्या मध्ये स्टफिंग चा रोल करून मध्यभागी ठेवा.

  3. 3

    परत त्या वर बॅटर घालून १५ ते २० मिनिटे स्टीम करा. गार झाल्यावर ग्लास मधुन बाहेर काढा. त्याचे डिस्क कट करून घ्या. कढई मध्ये तेल घालून त्यात मोहरी, कडीपत्ता व उभी चिरलेली हिरवी मिरची घालून फोडणी करून ती फोडणी ढोकळा वर घाला.

  4. 4

    हिरवी चटणी व चिंच गूळ चटणी बरोबर सर्व्ह करा. ढोकळा वर दोन्ही चटण्या, चिरलेला कांदा, बारिक शेव व चिरलेली कोथिंबीर घालून सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sneha Kasat
Sneha Kasat @Sneha_kitchen
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes