स्टीम मसाला पुरी चाट (PURI CHAT RECIPE IN MARATHI)

Sanhita Kand
Sanhita Kand @savikaj_re1
India

#स्टीम हे पदार्थ हलके तर असतातच पण तितकेच टेस्टी ही बनू शकतात. यांना आपण तितकेच चमचमीत ही बनवू शकतो. अशीच मी एक इनोव्हेटिव्ह स्टीम पुरी बनवून त्याचा पुढे चाट बनवला आहे खूपच यम्मी आणि टेस्टी बनला. चला तर मग बघुया याची रेसिपी.

स्टीम मसाला पुरी चाट (PURI CHAT RECIPE IN MARATHI)

#स्टीम हे पदार्थ हलके तर असतातच पण तितकेच टेस्टी ही बनू शकतात. यांना आपण तितकेच चमचमीत ही बनवू शकतो. अशीच मी एक इनोव्हेटिव्ह स्टीम पुरी बनवून त्याचा पुढे चाट बनवला आहे खूपच यम्मी आणि टेस्टी बनला. चला तर मग बघुया याची रेसिपी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. स्टीम पुरी बनवण्याचे साहित्य ---
  2. 100 ग्रामगव्हाचे पीठ
  3. 1 टिस्पून तिखट
  4. 1/2 टीस्पूनहळद
  5. 1 टीस्पूनओवा
  6. 1/2 टीस्पूनहिंग
  7. कणिक भिजवायला पाणी
  8. हिरव्या चटणी चे साहित्य ----
  9. 3हिरव्या मिरच्या
  10. 4 टीस्पूनकोथिंबीर
  11. 4 टीस्पूनपुदिना
  12. 2 स्टिक कढीपत्त्याची पानं
  13. 1 इंचआल्याचा तुकडा
  14. 6लसून पाकळ्या
  15. 1 टीस्पूनचाट मसाला
  16. थोडे सैंधव मीठ
  17. गोड चटणी चे साहित्य ----
  18. 30 ग्रामचिंच
  19. 80 ग्रामगूळ
  20. 1 टिस्पून तिखट
  21. चवीनुसारमीठ
  22. 2मध्यम कांद्याचे बारीक चिरलेले तुकडे
  23. 2मध्यम आकाराचे उकडलेल्या बटाट्याचे काप
  24. 2 लहानटोमॅटो बारीक चिरलेले
  25. 6 टीस्पूनशेंगदाणे शिजवून घेतलेले
  26. 6 टीस्पूनडाळींबाचे दाणे
  27. वरुन घालायला बारीक नायलॉन शेव

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम एका भांड्यामध्ये कणिक घेऊन त्याच्यामध्ये हळद तिखट हिंग ओवा मीठ असं सर्व घालून पाण्याने घट्ट भिजवून घेणे. म्हणून तेलाचा हात लावून पुन्हा एक सारखे मळून घेणे.

  2. 2

    कणिक पंधरा मिनिटा नंतर मुरल्यावर जाडसर लाटून त्याच्या हव्या त्या आकाराच्या लाट्या करून घेणे थोडक्यात पुऱ्या तयार करून घेणे. ह्या पुऱ्या तयार झाल्या की वाफवून घ्यायच्या आहेत परंतु मी या इडलीच्या यंत्रांमध्ये ठेवून वाफवून घेतल्या आहेत.

  3. 3

    त्यामुळे आपली छान खोलगट पुरी तयार झाली आहे. ही मसाला पुरी हलकि आणि टेस्टी ही लागते. ही पुरी इडली यंत्रातून काढल्याने आपल्याला हवा तसा खोलगट आकाराचा शेप ही मिळतो. अगदी सहज वाफवून सुंदर पुरी तयार झाली आहे.

  4. 4

    ग्रीन चटणी साठी घेतलेले सर्व साहित्य आपण एका मिक्सरच्या भांड्यात घालून थोडे पाणी घालून एकदम बारीक, घट्टसर अशी पेस्ट करून घेतली आहे. आणि आपली सुंदर ग्रीन चटणी तयार आहे.

  5. 5

    इथे आपण दोन तास आधी चिंच आणि गूळ पाण्यामध्ये भिजत ठेवलं आहे नंतर त्याची पेस्ट बनवून, गाळून ती एका गरम कढई मध्ये घालून त्यात तिखट आणि मीठ घालुन त्याला एक उकळी आणली आहे. त्यामुळे ही चटणी दाट आणि टेस्टी होते. जेव्हा आपल्या पुऱ्या तयार होत असतात तेव्हा आपण या दोन्ही चटण्या तसेच शिजलेल्या बटाट्याचे काप कांद्याचे काप टोमॅटोचे काप असे तयार करून घ्यावे. शेंगदाणेही वाफवून घ्यावे. डाळिंबाचे दाणे सोलून तयार ठेवावे. म्हणजे इथे आपली मसाला पुरी चे साहित्य झटपट तयार होते.

  6. 6

    आता आपण सगळे साहित्य कांदा, टोमॅटो, बटाटा, डाळिंब, वाफवलेले शेंगदाणे, हिरवी चटणी, गोड चटणी एका छोट्या भांड्यामध्ये व्यवस्थित काढून तयारी करून घ्यावी आणि आपल्या पुऱ्या एका प्लेटमध्ये सजवून मांडून घ्याव्यात. ते झाले की फोटोत दाखवल्याप्रमाणे पुरीमध्ये बटाटा, कांदा, टोमॅटो, शेंगदाणे, डाळींबाचे दाणे, शेव, गोड चटणी, हिरवी चटणी थोडासा चाट मसाला असं सगळ घालून पुरी तयार करून घ्यावी.

  7. 7

    अशाप्रकारे आपल्या सर्व पुऱ्या तयार करून प्लेटमध्ये भरून घ्या आणि खायला द्याव्या. अतिशय टेम्पटिंग चटपटीत स्टीम मसाला चाट पुरी तयार आहे. तुम्ही जरूर बनवा आणि सर्वांना खायला द्या ह्या टीम पुऱ्या असल्याने पचायला हलक्या तर आहेच चावायलाही सोपे आहेत. त्यामुळे वयस्कर लोक किंवा अतिशय लहान मुले यांच्यासाठी अतिशय उत्तम आहेत. आणि घरच्या घरी गव्हाच्या बनवल्यामुळे अजूनच उपयुक्त आहेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sanhita Kand
Sanhita Kand @savikaj_re1
रोजी
India

Similar Recipes