चटपटीत रगडापुरी (Ragdapuri Recipe In Marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
Kalyan

#ATW1 #TheChefstory #चाट, रगडा नाव काढताच तोंडाला पाणी सुटल ना चला तर स्टिट वर मिळणारा रगडा आपण घरच्या घरी बनवुया रेसिपी शेअर करतेय चला बघुया

चटपटीत रगडापुरी (Ragdapuri Recipe In Marathi)

#ATW1 #TheChefstory #चाट, रगडा नाव काढताच तोंडाला पाणी सुटल ना चला तर स्टिट वर मिळणारा रगडा आपण घरच्या घरी बनवुया रेसिपी शेअर करतेय चला बघुया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिटे
२ जणांसाठी
  1. १०० ग्रॅम सफेद वटाणे
  2. 1-2बटाटे
  3. 1-2कांदे
  4. 1टोमॅटो
  5. 1-2टिस्पुन आलेमिरची पेस्ट
  6. 1/2टिस्पुन हळद
  7. 1टिस्पुन लालतिखट
  8. 1टिस्पुन धने पावडर
  9. 1/2टिस्पुन जिरा पावडर
  10. 1/2टिस्पुन गरम मसाला
  11. 1टिस्पुन गुळपावडर
  12. 1-2टिस्पुन चिंचेचा कोळ
  13. 1-2टेबलस्पुन कोथिंबीर
  14. चविनुसार मीठ
  15. 2टेबलस्पुन तेल
  16. २० पाणीपुरीच्या पुर्‍या
  17. 10ग्रॅम दही
  18. २० ग्रॅम हिरवी तिखट चटणी
  19. २० ग्रॅम चिंच गुळाची गोड चटणी
  20. १-२ टिस्पुन चाटमसाला किंवा आमचुर पावडर

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    सफेद वटाणे व साल काढलेले बटाटे बारीक चिरून घ्या व छोट्या कुकर मध्ये हळद व मीठ मिक्स करून३-४ शिट्टया उकडून घ्या व थंड करून बटाटा मॅश करा दोन्ही चटण्या बनवुन ठेवा

  2. 2

    कढईत तेल गरम झाल्यावर जीरे मिक्स करून तडतडल्यावर त्यात आलेमिरचीची पेस्ट व चिरलेला कांदा मिक्स करून परता गुलाबी होई पर्यंत नंतर त्यात हळद, लाल तिखट, धने पावडर, जिरेपावडर, गरम मसाला व चिरलेला टोमॅटो मिक्स करा थोड मीठ मिक्स करून४ मिनिटे झाकण ठेवुन शिजवा

  3. 3

    नंतर त्यात उकडलेले वटाणे व बटाट्याचे मिश्रण मिक्स करा त्यातच कोथिंबिर चिंचेचा कोळ व गुळपावडर चविनुसार मीठ मिक्स करून परता आवश्यकते नुसार कोमट पाणी घाला व झाकण ठेवुन५ मिनिटे शिजवा नंतर थोडा चाटमसाला मिक्स करा आपला रगडा रेडी

  4. 4

    गरमागरम रगडा प्लेट मध्ये वरून कोथिंबिर कांदा टाकुन सर्व्ह करा सोबत पाणी पुरीच्या पुर्‍यां मध्ये तयार रगडा, कांदा, हिरवी चटणी, चिंचगुळाची गोड चटणी, दही भरून वरून चाटमसाला भुरभुरा रगडापुरी तयार करा तसेच छोट्या कागदाच्या वाटीत पुर्‍यांचा चुरा त्यावर रगडा, कांदा, दोन्ही चटण्या, दही व कोथिंबीर चाटमसाला भुरभुरून चाट प्लेट सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
रोजी
Kalyan

टिप्पण्या

Similar Recipes