भरलेली कारली (bharleli karla recipe in marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962

#लंच # भरलेली कारली कारल्याची भाजी ही आपल्या शरीरासाठी पौष्टीक आहे त्यात तांबे व्हिटॅमिन बी असते कारले मधुमेहाच्या रुग्णा साठी फायदेशीर आहे कारले खाल्ल्या मुळे दमा, कफ, गॅस , पोटदुखी कमी होते कारल्यामुळे शुगर लेव्हल नियंत्रणात राहाते चलातर अशा बहुगुणी कारल्याची भाजी बघुया

भरलेली कारली (bharleli karla recipe in marathi)

#लंच # भरलेली कारली कारल्याची भाजी ही आपल्या शरीरासाठी पौष्टीक आहे त्यात तांबे व्हिटॅमिन बी असते कारले मधुमेहाच्या रुग्णा साठी फायदेशीर आहे कारले खाल्ल्या मुळे दमा, कफ, गॅस , पोटदुखी कमी होते कारल्यामुळे शुगर लेव्हल नियंत्रणात राहाते चलातर अशा बहुगुणी कारल्याची भाजी बघुया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१/२ तास
१-२ जणांसाठी
  1. 2-3कारली
  2. 2 टेबलस्पुनभाजलेल्या शेंगदाण्याचा कुट
  3. 2 टेबलस्पुनभाजलेल्या कांदा खोबरआलं लसुण खडा मसाल्याचे वाटण
  4. 1/4 आललसुण ठेचा
  5. 2 टेबलस्पुनचिंचगुळाची चटणी
  6. 1/2 टीस्पूनटिस्पुन हळद
  7. 1 टीस्पूनटिस्पुन तिखट
  8. 1/2 टीस्पूनटिस्पुन मोहरी जीरे
  9. चविनुसार मीठ
  10. 1-2 टीस्पूनटिस्पुन तेल

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    कारली सर्व धुवुन त्याचे दोनदोन तुकडे करुन ठेवा

  2. 2

    कारल्याच्या तुकड्यांना मधोमध उभी चिर द्या व आतील गर बिया काढुन ठेवा नंतर चिर्‍या च्या आतील पोकळ भागास मीठ व हळद चोळुन ५ मिनटे ठेवा

  3. 3

    नंतर कुकरच्या भांड्यात कारली ठेवुन१० मिनिटे वाफवुन घ्या

  4. 4

    प्लेटमध्ये कांदा खोबर्‍याचे वाटण शेंगदाण्याचा कुट आललसुण ठेचा हळद तिखट व कारल्याचा आतील गर मीठ मिक्स करून ठेवा वाफवलेल्या कारल्याच्या आतील भागांत चिंचगुळाची चटणी लावुन घ्या

  5. 5

    कांदा खोबऱ्याच्या मिश्रणात चिंच गुळाची चटणी मिक्स करा

  6. 6

    कारल्यांच्या तुकड्यांना चटणी सर्व बाजुने लावून ठेवा व मिश्रण त्यात भरून ठेवा

  7. 7

    कढईत तेल गरम झाल्यावर मोहरी जीरे तडतडल्यावर त्यात मिश्रण भरलेली कारली टाकुन परतुन परतुन शिजवा

  8. 8

    तयार भरलेली कारली डिश मध्ये सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962
रोजी

टिप्पण्या (4)

Similar Recipes