ढेमसं विथ स्प्राउट्स (dhemse with sprouts recipe in marathi)

Bhaik Anjali
Bhaik Anjali @cook_19425386

#स्टफ्ड
कडधान्या सोबत एखादी भाजी करून पहावी म्हटलं, आणि ढेमसं होतेच..
मस्त कॉम्बिनेशन झालं..

ढेमसं विथ स्प्राउट्स (dhemse with sprouts recipe in marathi)

#स्टफ्ड
कडधान्या सोबत एखादी भाजी करून पहावी म्हटलं, आणि ढेमसं होतेच..
मस्त कॉम्बिनेशन झालं..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अर्धा तास
2 ते 3 सर्व्हिंग्ज
  1. 8 लहानआकाराचे ढेमसं
  2. 1मध्यम आकाराचा कांदा
  3. 2मध्यम आकाराचे टोमॅटो
  4. 1 टीस्पूनआलेलसूण पेस्ट
  5. 2 टेबल स्पूनतेल
  6. 1 टीस्पूनतिखट
  7. 1/2 टी स्पूनहळद
  8. 1 टीस्पूनमीठ
  9. 1 टीस्पूनकसुरी मेथी
  10. 1टिस्पून धणेपूड
  11. 1 टीस्पूनजिरे मोहरी
  12. 1 छोटातुकडा गुळ
  13. स्टफींग साठी साहित्य
  14. 1मध्यम आकाराचा गाजराचा कीस
  15. 2 कपमोड आलेले मटकी व मूग
  16. 1 टी स्पूनचिरलेली कोथिंबीर

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    सर्वप्रथम सर्व साहित्य तयार ठेवावे व ढेमसे वरून छोटी चकती कापून आतून पोकळ करून थोडं मीठ व तेलाचा हात लावून ठेवावे. ढेमसा च्या आतील गर आपण इतर भाज्यांमध्ये वापरू शकतो.एकीकडे गॅसवर भांडे ठेवून त्यामध्ये तेल घालून नेहमीप्रमाणे जिरे मोहरी फोडणी (वर दिलेल्या साहित्यातील अर्ध साहित्य आपल्याला उसळीला वापरायचे आहे) त्यानंतर आलेलसूण पेस्ट, मीठ,हळद, तिखट,धणेपूड घालून मोड आलेले मूग व मटकी ऍड करून पाणी न वापरता नेहमीप्रमाणे उसळ तयार करून घ्यावी परंतु उसळ 70% शिजवावी.

  2. 2

    आता मिक्सरच्या पॉट मध्ये टोमॅटोचे मोठे तुकडे,कांद्याचे मोठे तुकडे,आलं लसुण पेस्ट, धणेपुड, तिखट,मीठ,हळद व कसुरी मेथी घालून एक दाटसर पेस्ट तयार करून घ्यावी व उसळी मध्ये गाजराचा मिक्स करून ठेवावा.

  3. 3

    आता एका पॅनमध्ये तेल गरम करून वाटलेले मिश्रण गरम तेलामध्ये सोडावे व गॅस कमी करावा. याच वेळी मीठ व तेल लावलेल्या ढेमसांमध्ये उसळ दाबून भरून हे भरलेले पॅनमध्ये मध्ये अलगद ठेवावे. व पॅन वर झाकण ठेवावे. थोड्या थोड्या वेळाने हळुवारपणे ढेमस पलटवत राहणे. यावेळी अगदी थोडे पाणी ॲड करावे.

  4. 4

    पॅन मधले टोमॅटो कांद्याचे वाटण ढेमसांमध्ये मुरत राहते, त्यावेळेस गुळाचा खडा घालावा व पुन्हा झाकण ठेवावे. वाफेवर व तेलावरच छान मऊ शिजल्या जातात. ढेमसा चा रंग बदललेला दिसेल.थोडेसे हाताने शिजले का म्हणून तपासावे. मंद आचेवर ढेमसे छान शिजलेली आहेत. सर्व्ह करतांना चिरलेली कोथींबीर घालावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bhaik Anjali
Bhaik Anjali @cook_19425386
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes