केळीचे पापलेट(keliche paplet recipe in marathi)

Gautami Patil0409
Gautami Patil0409 @cook_19582560
Mumbai

#रेसिपीबूक
#गावाकडची रेसिपी
#चिंचणी हे निसर्गाच्या कुशीत, समुद्राच्या गुजगोष्टी ऐकणारे हिरवेगार गाव. पालघर जिल्हा एक संपन्न आणि समृद्ध जिल्हा... जगाच्या पाठीवर पालघरचे नाव जगप्रसिद्ध झाले ते म्हणजे तारापूर अणूशक्ती केंद्र आणि बोर्डीची चिकू यामुळेच ... माझे माहेर चिंचणी ...आई आणि बाबा माझे निवृत्त शाळा शिक्षक, परंतु पीढीजात आम्ही बागायतदार ... मिरची, भात, चिकू , नारळ, आंबा, केळी अशा नानाविविध फळ आणि ताज्या भाज्यांची ( माझ्या पिढीच्या भाषेत ॲार्गॅनिक) रेलचेल सतत तिथे मी जन्मापासूनच अनुभवली आहे.
या रेसिपीमध्ये मी ज्या केळ्यांचा उपयोग केला आहे, त्यांना भाजीची केळी म्हणतात. कोळंबी सोबत यांचे कालवण म्हणजे अस्सल वाडवळांसाठी मेजवानीच. या केळ्यामध्ये भरपूर आर्यन असते. यांची प्रकृती उष्ण त्यामुळे बाळंतपणामध्ये जिरे व काळीमिरी तसेच आले लसूण यांच्या रश्यातील भाजी हमखास खाऊ घातली जाते..
या केळीचे काप संध्याकाळच्या चटपटीत नाश्त्यासाठी आवर्जून केले जातात... केळीचे पापलेट हे नाव अगदी अलिकडेच , म्हणजे ३ वर्षांपूर्वीचे... पदार्थ जरी पारंपरिक असला तरी माझ्या अट्टल मासेखाऊ मुलाने यांचे आधुनिक नामकरण असे केले आहे.... तेच माझ्या गावच्या मातीचा ओलावा लेवून इथे पेश करते...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिटे
४ व्यक्तींसाठी
  1. 5केळी
  2. अर्धे लिंबु रस
  3. 3 टी स्पूनतांदूळ पिठ
  4. 1 टी स्पूनधणे जिरे पूड
  5. 1 टीस्पूनघरगूती मसाला
  6. 1 टी स्पूनलाल तिखट
  7. 1/2 टी स्पूनहळद
  8. 1/4 टी स्पूनहिंग
  9. 1 टी स्पूनआले लसूण मिरची कोथिंबीर वाटण
  10. चवीनुसारमीठ
  11. 1 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    वरील नमूद केलेली केळी अशी दिसतात, त्यांना धुवून घेऊ

  2. 2

    यानंतर केळ्यांचे साल काढून घ्यावे. तत्पूर्वी हाताला थोडे तेल लावावे, जेणेकरुन केळ्याचा चिक लागणार नाही. इतर सर्व साहित्य एका पसरट भांड्यामध्ये घ्यावे. थोडेसे तेल सुरीला ही लावावे.

  3. 3

    केळीचे उभे काप करून घ्यावे, म्हणजे पापलेटचा आकार येईल😂(श्रावण महिन्यात तितकीच सोबत) भांड्यात सर्व मसाला, लिंबु रस व तांदूळ पिठ एकजीव करून घ्या. पॅनमध्ये तेल घेऊन मंद आचेवर तापवून घ्या.

  4. 4

    हलक्या हाताने सर्व मसाला केळीला लावून घ्या.

  5. 5

    पॅनवर एक एक केळी पापलेट चे तुकडे शॅलो फ्राय करून घ्या. खूप वेळ लागणार नाही. दोन मिनिटांनी परतून घ्या, मग प्लेट मध्ये काढून घ्या.

  6. 6

    एक एक सर्व काप तळून घ्या. आणि गरमागरम स्वाहा करा.

  7. 7

    टीप : ही केळी पिकली तर नुसती खाल्ली जात नाहीत, तेव्हा यांचे गोल काप करावे, कढईमध्ये तुप गरम करून त्यात जिरे फोडणीस घालावे, मग केळी घालून त्यांवर थोडे मीठ व साखर पेरावी. थोडे शिजल्यावर ओले खोबरे पेरावे.. उपवासालाही खाऊ शकतो. छानच लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Gautami Patil0409
Gautami Patil0409 @cook_19582560
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes