मिक्स भजी प्लॅटर (mix bhaji platter recipe in marathi)

Pradnya Purandare
Pradnya Purandare @pradnya_dp
Mumbai

#रेसिपीबुक #week5
पावसाळी गम्मत
श्रावण
पावसाळा आला की आपल्याकडे भजी,वडे असे प्रकार केले जातात, बाहेर जोराचा पाऊस आणि घरात गरमगरम भजी, वाफाळता चहा... अहाहा अजून काय पाहिजे. आज मी मस्त मिक्स भजी केली आहेत आणि हो श्रावण स्पेशल त्यामुळे कांदा नाही... घरात ज्या काही भाज्या होत्या त्या वापरून भजी केली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15-20 मिनिटे
3 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपबेसन
  2. 1 टीस्पूनहळद
  3. 1 टीस्पूनलाल तिखट
  4. 1/2 टीस्पूनओवा
  5. 2मध्यम बटाटे
  6. 5-6पालक पाने
  7. 2वांगी
  8. 2भोपळी मिरची
  9. मीठ चवीनुसार
  10. तेल

कुकिंग सूचना

15-20 मिनिटे
  1. 1

    प्रथम भांड्यात पाणी घेऊन त्यात थोडे मीठ घातले. बटाटा सोलून त्याच्या पातळ स्लाइस केल्या, वांग्याचा देठ काढून त्याच्याही स्लाइस केल्या, भोपळी मिरची चे बिया काढून मोठे तुकडे केले आणि या सर्व स्लाइस मिठाच्या पाण्यात ठेवल्या. पालक पाने देठ काढून धुवून घेतली.

  2. 2

    दुसऱ्या भांड्यात बेसन घालून त्यात हळद, तिखट,मीठ घालून पाणी घालावे आणि जाडसर पेस्ट तयार करावी. कढईत तेल तापवून घ्यावे या तापलेल्या तेलातून १ चमचा गरम तेल तयार बेसन पेस्ट मध्ये घालावे. मग एक एक करून सर्व भजी तळून घ्यावी. गरम गरम भजी लसूण चटणी बरोबर सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pradnya Purandare
Pradnya Purandare @pradnya_dp
रोजी
Mumbai
Easy serv in busy life.. Haveeka
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes