उपवासाची कचोरी (upwasachi kachori recipe in marathi)

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

#रेसिपीबुक #week7 #उपवास #प्रसाद #उपवासाची रेसिपी #प्रसादाची रेसिपी #नवरात्र
श्रावणात उपवास जास्तच असतात.त्यामुळे ही झटपट होणारी टेस्टी व सोपी रेसिपी.

उपवासाची कचोरी (upwasachi kachori recipe in marathi)

#रेसिपीबुक #week7 #उपवास #प्रसाद #उपवासाची रेसिपी #प्रसादाची रेसिपी #नवरात्र
श्रावणात उपवास जास्तच असतात.त्यामुळे ही झटपट होणारी टेस्टी व सोपी रेसिपी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
  1. 3बटाटे
  2. 3 टेबलस्पूनसाबुदाणा पीठ
  3. 1 (1/2 टेबलस्पून)राजगीरा पीठ
  4. 1 टीस्पूनजिरे पूड
  5. मीठ चवीनुसार
  6. स्टफींगसाठी
  7. 5 टेबलस्पूननारळाचा चव
  8. 5-6काजूंचे तूकडे
  9. ८-१० बेदाणे
  10. 1 टेबलस्पूनखरबुजाच्या बीया (मगज)
  11. 1 टेबलस्पूनबारीक चिरलेली कोथिंबीर
  12. 2हिरव्या मिरच्यांची पेस्ट
  13. 1/2लींबू रस
  14. 1 टीस्पूनजीरपूड
  15. 3/4 टेबलस्पूनपीठी साखर
  16. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    प्रथम बटाटे उकडून स्मॅश करून घेतले. व त्यात साबुदाणा पीठ, राजगिरा पीठ, जिरे पावडर व मीठ घालून त्याचा गोळा बनवला.

  2. 2

    मिश्रणाचा गोळा बनवून झाल्यानंतर झाकून ठेवला. नंतर स्टफिंग साठी एका बाऊलमध्ये नारळाचा चव, किसमीसचे कट केलेले पीसेस, व काजूचे लहान तूकडे, मगज, हिरवी मिरची पेस्ट, साखर, लिंबाचा रस, बारीक चिरलेली कोथिंबीर,, जीरपूड हे सर्व घालून मिक्स करून घेतले.

  3. 3

    स्टफींग चे सर्व साहित्य मिक्स झाल्यानंतर आपण कव्हर साठी केलेल्या बटाट्याच्या गोळ्यातील लहान गोळा घेऊन त्याची पारी केली. व त्या पारित नारळाचे स्टफिंग भरून त्याचा गोल गोळा बनवला. असे सर्व गोळे बनवून घेतले. व ते साबुदाण्याच्या पिठात घोळवून घेतले. आणि फ्रिजमध्ये अर्धा तास ठेवून दिले.

  4. 4

    फ्रिजमधील गोळे बाहेर काढून घेतले. गॅसवर कढई मध्ये तेल गरम करून त्यात सर्व गोळे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेतले. व ते एका डिश मध्ये काढून दाण्याच्या चटणीबरोबर सर्व्ह केले.

  5. 5

    हि उपवासाची कचोरी चवीला खुपचं मस्त लागते. व पटकन होते.उपवास नसल्यास आपण वेगळे स्टफींग बनवू शकतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
रोजी
Nashik, Maharashtra

Similar Recipes