कोकोनट मँगो (coconut mango recipe in marathi)

Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
मुंबई

#रेसिपीबुक
#week8
#नारळीपौर्णिमारेसिपीस
मी सहसा रक्षाबंधनला घरीच मिठाई व खोबऱ्याच्या वड्या वेगवेगळ्या फ्लेवर च्या बनवून नाविण्य आणते. त्यामुळे दिसायलाही छान दिसतात व खायलाही. चला तर मग वळू या रेसिपीकडे....

कोकोनट मँगो (coconut mango recipe in marathi)

#रेसिपीबुक
#week8
#नारळीपौर्णिमारेसिपीस
मी सहसा रक्षाबंधनला घरीच मिठाई व खोबऱ्याच्या वड्या वेगवेगळ्या फ्लेवर च्या बनवून नाविण्य आणते. त्यामुळे दिसायलाही छान दिसतात व खायलाही. चला तर मग वळू या रेसिपीकडे....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५ मिनिटे
६ जण
  1. ३०० ग्राम ओलं खोबरं खवलेलं (३ कप)
  2. ५० ग्राम कंडेन्सड मिल्क (१/४ कप)
  3. १०० ग्राम आटवलेला आमरस (१/३ कप)
  4. 2 टिस्पून साखर
  5. 2 टेबलस्पूनमिल्क पावडर
  6. हिरवा फूड कलर

कुकिंग सूचना

२५ मिनिटे
  1. 1

    सर्व साहित्य तयार ठेवा. पॅनमध्ये ओलं खोबरं, कंडेन्सड मिल्क, आमरस व साखर घालून सतत ढवळत राहा.

  2. 2

    मिश्रण घट्ट होत आलं की गॅस बंद करा. ट्रेला तुप लावून घ्या. त्यात अर्ध मिश्रण पसरा वरून ड्रायफ्रूट्स घाला सुरीने वड्या पाडा व राहिलेलं अर्ध मिश्रण ताटात पसरून थंड व्हायला ठेवा.

  3. 3

    राहिलेलं अर्ध मिश्रण थंड झालं की हाताला तूप लावून त्याचे ७ गोळे करून घ्या. एका गोळ्यात हिरवा फुड कलर घालून मिक्स करा. आता गोळ्यांना आंब्याचा आकार देऊन त्यावर हिरव्या मिश्रणाचा देठ बनवून त्याला दाबून चिकटवा. हे झाले कोकोनट मँगो तयार. मस्त सजावट करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
रोजी
मुंबई

टिप्पण्या (10)

Anita Desai
Anita Desai @cook_20530215
मॅंगो चा आकार कशाने दिला ताई

Similar Recipes