पाणीपुरी केक (pani puri cake recipe in marathi)

Sushma Shendarkar
Sushma Shendarkar @cook_21138614

#रेसिपीबुक #week9 पाणीपुरी केक नाव ऐकून आश्चर्य वाटलं ना, मलासुद्धा पहिल्यांदा हे नाव ऐकल्यानंतर खूपच आश्चर्य वाटलं. मी ठाण्याला सौ.स्मिता यांच्याकडे केक शिकायला गेले होते तेव्हा त्यांनी या केकची कल्पना दिली. ऐकून नवल वाटलं आणि बघण्याची खूप इच्छा झाली. त्यांच्या शिकवण्याच्या पद्धती मुळे केक बनवणे अगदी सोप वाटत. म्हणूनच स्मिता मॅडम यांनी शिकवलेल्या केक ची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मिनिट
8 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपमैदा
  2. 1/4 कपसाखर
  3. 1/4 कपमिल्क पावडर
  4. 1/2 कपदूध
  5. 1/4 कपतेल
  6. 1/2 टीस्पूनबेकिंग पावडर
  7. 1/4 टीस्पूनबेकिंग सोडा
  8. 7/8पुदिन्याची पान
  9. 1 कपविप क्रीम
  10. 1/4 कपचिंच गुळाची चटणी
  11. 1 टेबलस्पूनपुदिन्याची चाटनी
  12. 4/5पाणीपुरीच्या पुऱ्या
  13. 2 टेबलस्पूनखरी बुंदी

कुकिंग सूचना

45 मिनिट
  1. 1

    एका भांड्यात दूध,साखर, मिल्कपावडर, तेल एकत्र करावे. त्यात मैदा, बेकिंगपावडर,बेकिंग सोडा घालून एकत्र कराव.

  2. 2

    एकत्र केलेल्या मिश्रणामध्ये पुदिन्याची पान कापून टाकावी. केक बेक करण्यासाठी कढई प्री हिट करून घ्यावी. बेकिंग ट्रेला ग्रीस आणि डस्ट करून घ्यावं.

  3. 3

    तयार मिश्रण केक टीन मध्ये टाकून केक बेक करून घ्यावा. केकचे तीन भाग करून घ्यावे.

  4. 4

    केकच्या प्रत्येक थारावरती चिंच गुळाची चटणी लावावी. त्यावर विप क्रीम आणि ग्रीन चटणी लावून घ्यावी.

  5. 5

    केकला बुंदी ने आवडीप्रमाणे गार्निश करावे. अशा पद्धतीने आपला पाणीपुरी केक तयार झाला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sushma Shendarkar
Sushma Shendarkar @cook_21138614
रोजी

Similar Recipes