गाजर हलवा उकडीचे मोदक (gajar halwa ukdiche modak recipe in marathi)

Sneha Barapatre
Sneha Barapatre @cook_25713033

#मोदक
गणपती बाप्पा चे आवडते मोदक. थोडया वेगळया style ने.

गाजर हलवा उकडीचे मोदक (gajar halwa ukdiche modak recipe in marathi)

#मोदक
गणपती बाप्पा चे आवडते मोदक. थोडया वेगळया style ने.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

६० मिनिटे
  1. गाजर हलवा
  2. ५०० ग्राम गाजर
  3. 1 वाटीगूळ
  4. १/५ वाटी साजुक तुप
  5. 1 वाटीदुध
  6. 2वेलची
  7. आवडीप्रमाणे सुकामेवा
  8. मोदकाची उकड
  9. 3वाटया तांदळाच पीठ
  10. 2वाटया पाणी
  11. 1 टेबलस्पूनतुप
  12. 1 टेबलस्पूनमीठ
  13. हिरवा व पिवळा रंग

कुकिंग सूचना

६० मिनिटे
  1. 1

    सर्वात आधी गाजर किसून घेणे व एका पातेल्यात साजुक तुप घालून त्यावर गाजराचा किस परतुन घेणे. गाजर निट परतुन झाला की त्यात गुळ घालावे व हलवा नीट शिजवून घ्यावा नंतर त्यात १ वाटी दुध घालून परत शिजवून घ्या नंतर त्यात वेलची पूड व सुकामेवा टाकून घेणे

  2. 2

    मोदकाची उकड बनवतांना सर्वात आधी दोन पातेल्यात प्रत्येकी १ वाटी पाणी टाकून घेणे व थोडे चवीप्रमाणे मीठ घालून घेणे व थोडे तुप घालून घेणे. एका पातेल्यात हिरवा तर दुसऱ्या पातेल्यात पिवळा रंग घालून घेणे व पाण्याला उकळी येवू देने नंतर त्यात तांदळाच पीठ घालून उकड नीट शिजवून घ्यावी. नंतर उकड थोडी गार करून नीट मळुन घ्यावी.

  3. 3

    नंतर मोदक साच्याने गाजराच्या हलव्या च सारन भरून मोदक तयार करणे. व मोदक पात्रात मोदक १५ मिनिटे उकडून घेणे

  4. 4

    तयार आहेत आपले मोदक.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sneha Barapatre
Sneha Barapatre @cook_25713033
रोजी

Similar Recipes