मक्याचे मोदक - (makyache modak recipe in marathi)

Sudha Kunkalienkar
Sudha Kunkalienkar @cook_19609542

#रेसिपीबुक #week10
#मोदक
माझी इनोव्हेटिव्ह रेसिपी
उकडीचे मोदक आपण नेहमीच करतो. मी एक नवीन प्रकारचे मोदक केले. अमेरिकन स्वीट कॉर्न, साखर, गूळ आणि सुकं खोबरं घालून गोड सारण केलं. पारीसाठी मक्याचं पीठ (आपण मक्याच्या भाकरीसाठी वापरतो ते), कॉर्न स्टार्च (पांढरे कॉर्नफ्लोअर) आणि तांदुळाचे पीठ वापरलं. दोन्हीची वेगवेगळी उकड काढून प्रत्येक मोदकासाठी पिवळी आणि पांढरी उकड घेऊन पारी केली. त्यात कॉर्नचे सारण भरून मोदक केले आणि वाफवून घेतले. छान दुरंगी मोदक झाले - काहीही कृत्रिम रंग न घालता. मोदक खूप स्वादिष्ट झाले. स्वीट कॉर्न आवडणाऱ्या लोकांना नक्कीच आवडेल हा नवीन पदार्थ.

मक्याचे मोदक - (makyache modak recipe in marathi)

#रेसिपीबुक #week10
#मोदक
माझी इनोव्हेटिव्ह रेसिपी
उकडीचे मोदक आपण नेहमीच करतो. मी एक नवीन प्रकारचे मोदक केले. अमेरिकन स्वीट कॉर्न, साखर, गूळ आणि सुकं खोबरं घालून गोड सारण केलं. पारीसाठी मक्याचं पीठ (आपण मक्याच्या भाकरीसाठी वापरतो ते), कॉर्न स्टार्च (पांढरे कॉर्नफ्लोअर) आणि तांदुळाचे पीठ वापरलं. दोन्हीची वेगवेगळी उकड काढून प्रत्येक मोदकासाठी पिवळी आणि पांढरी उकड घेऊन पारी केली. त्यात कॉर्नचे सारण भरून मोदक केले आणि वाफवून घेतले. छान दुरंगी मोदक झाले - काहीही कृत्रिम रंग न घालता. मोदक खूप स्वादिष्ट झाले. स्वीट कॉर्न आवडणाऱ्या लोकांना नक्कीच आवडेल हा नवीन पदार्थ.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

60 मि
3 सर्व्हिंग्ज
  1. 1+1/2 कप अमेरिकन स्वीट कॉर्न
  2. 1/4 कपसाखर
  3. 1 टेबलस्पूनचिरलेला गूळ
  4. 2 टेबलस्पूनकिसलेलं सुकं खोबरं
  5. 1/2 कपमक्याचं पीठ (आपण मक्याच्या भाकरीसाठी वापरतो ते)
  6. 1 टेबलस्पूनकॉर्न स्टार्च (पांढरं कॉर्नफ्लोअर)
  7. 2 टीस्पूनतूप
  8. 1/2 कपमोदकाचं / तांदुळाचं पीठ
  9. 2-3 चिमूटवेलची पूड
  10. 2 चिमूटमीठ
  11. 1/2 टीस्पूनतेल

कुकिंग सूचना

60 मि
  1. 1

    स्वीट कॉर्न शिजवून घ्या. पाणी काढून टाका आणि कॉर्न मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.

  2. 2

    एका कढईत १ चमचा तूप घालून त्यात वाटलेले कॉर्न घाला. मंद आचेवर परतत राहा.

  3. 3

    मिश्रण घट्ट व्हायला लागलं की त्यात साखर आणि गूळ घालून शिजवा. मिश्रण घट्ट व्हायला लागलं की त्यात सुकं खोबरं घाला, मीठ घाला आणि शिजवत राहा.

  4. 4

    मिश्रण कढईच्या कडा सोडू लागलं की गॅस बंद करा. वेलची पूड घालून एकजीव करा आणि ताटलीत पसरून मिश्रण गार करून घ्या. सारण तयार आहे.

  5. 5

    आता आपल्याला तांदुळाची आणि मक्याची वेगवेगळी उकड कापाण्यात किंचित मीठ आणि अर्धा टीस्पून साजूक तूप घालून पाणी उकळा.ढायची आहे. तांदुळाच्या उकडीसाठी एका पातेल्यात पाव कप +१ टेबलस्पून पाणी घ्या. 

  6. 6

    पाणी उकळलं की त्यात तांदुळाचं पीठ घालून लगेच झाकण ठेवून २ मिनिटं मक्याच्या पिठाच्या उकडीसाठी एका पातेल्यात पाव कप +१ टेबलस्पून पाणी घ्या. वाफवा. गॅस बंद करून पीठ झाकून ठेवा.

  7. 7

    पाण्यात किंचित मीठ आणि अर्धा टीस्पून साजूक तूप घालून पाणी उकपाणी उकळलं की त्यात मक्याचं पीठ घालून लगेच झाकण ठेवून २ मिनिटं वाफवा. गॅस बंद करून त्यात कॉर्नस्टार्च घालून मिश्रण एकजीव करा आणि पीठ झाकून ठेवा.ळा.

  8. 8

    १० मिनिटांनी उकड गरम असतानाच दोन्ही पिदोन्ही उकडीचे छोटे गोळे घेऊन त्याचा एक गोळा बनवा. आणि हाताची बोटं वापरून त्याची पारी बनवा - जेवढी पातळ बनवता येईल तेवढी. छान दुरंगी पारी तयार होईल.ठं वेगवेगळी छान मळून घ्या. एक पांढरा आणि एक पिवळा असे दोन उकडीचे गोळे तयार होतील.

  9. 9

    पारीत १ चमचा सारण घाला. पारीला हलक्या हाताने कळ्या काढा- जेव्हढ्या येतील तेव्हढ्या. कळ्या एकत्र करून मोदकाला सुबक नाक काढा.

  10. 10

    तयार मोदक ओल्या फडक्याखाली ठेवा म्हणजे सुकणार नाही.मोदक पात्रात / पातेल्यात पाणी उकळा. मोदक वाफवायच्या ताटलीत पातळ कपडा ओला करून पसरवा.प्रत्येक मोदकाचा बेस (बूड) पाण्यात बुडवून ताटलीत ठेवा.

  11. 11

    पाणी उकळलं की ताटली मोदक पात्रात / पातेल्यात ठेवून वाफवून घ्या. मध्यम आचेवर २०-२५ मिनिटं लागतात.मक्याचे स्वादिष्ट मोदक साजूक तुपासोबत खायला द्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sudha Kunkalienkar
Sudha Kunkalienkar @cook_19609542
रोजी

Similar Recipes