रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२/३ मिनिट
४ व्यक्तींसाठी
  1. 5पापड (कोणतेही)
  2. 2 कपजाडे पोहे
  3. 2कांदे
  4. 1/2 कपचिरलेली कोथिंबीर
  5. 1लिंबु
  6. ८-१० कढीपत्ता पाने
  7. 2हिरवी मिरची
  8. 1/4 कपशेंगदाणे
  9. 2 टी स्पूनदही
  10. 1/4 टी स्पूनमोहरी
  11. 1/4 टी स्पूनजिरे
  12. 1/4 टी स्पूनहिंग
  13. 1 टी स्पूनसाखर
  14. चवीनुसारमीठ
  15. आवश्यकतेनुसार तेल
  16. 1 आवडत असल्यास नारळ

कुकिंग सूचना

२/३ मिनिट
  1. 1

    पोहे एका चाळणीतून घ्या. इतर साहित्य फोटोमध्ये दर्शविले आहे. कांदा व कोथिंबीर आणि मिरची चिरून घ्या. लिंबाच्या ही दोन फोडी करून घ्या.

  2. 2

    चाळणीचे पोहे धुवून घ्या. एरवी कच्चे घेतले तरी छान लागतात पण कोविड-१९ ची भीती पाहता धुवून घेतलेले बरे. एका खोलगट भांड्यात हे पोहे घेऊन त्यांवर मीठ, साखर, कांदा व कोथिंबीर घालून घ्या. सोबत दही देखील घाला.

  3. 3

    एका लिंबाचा रस पिळून घ्या. दुसरी कडे तेल गरम करून त्यात क्रमाक्रमाने सर्व फोडणी करून घ्या. शेंगदाणे लालसर होऊ द्या.

  4. 4

    ही फोडणी पोह्यावर ओता आणि वरून झाकण लावा. चार पाच मिनिटे झाकून ठेवा नंतर सर्व एकजीव करा. व पुन्हा झाकण ठेवा.

  5. 5

    तीन चार मिनिटे असेच राहू द्या. दुसरीकडून पापड भाजून घ्या.

  6. 6

    एका खोलगट प्लेटॅध्ये पोहे घ्या. यांवर पापड चुरून घाला आणि सर्व्ह करा. आवडत असल्यास वरून नारळ ही पेरा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Gautami Patil0409
Gautami Patil0409 @cook_19582560
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes