बर्गर (burger recipe in marathi)

बर्गर (burger recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
पॅनमध्ये तेलात लसूण, हिरवी मिरची, मिक्स हर्ब्स, तिखट, कांदा, गाजर, कॉर्न घाला, परता.
- 2
धनेजिरे पूड, आमचूर, चाट मसाला, मीठ, भिजवलेले पोहे घाला, चांगलं परता.गॅस बंद करा. हे मिश्रण भांड्यात घेऊन थंड झाले की त्यात उकडलेला बटाटा कुस्करून घाला, एकजीव करा.
- 3
या मिश्रणाच्या मध्यम आकाराच्या टिक्क्या बनवा त्या टिकक्यांमध्ये चीझचे छोटे तुकडे भरून टिक्की बंद करा, अश्याप्रकारे टिक्क्या बनवून घ्या. बॅटर बनविण्यासाठी मैदा, कॉर्नफ्लोर, मीठ, मिक्स हर्ब्स, तिखट घालून थोडस पाणी घालून पेस्ट बनवा. पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवा. बनविलेल्या टिक्क्या या बॅटर मध्ये घोळवा.
- 4
बॅटर मध्ये घोळवून मग कॉर्नफ्लेक्सचा हाताने चुरा करून त्यात टिक्की दाबून घ्या म्हणजे कॉर्नफ्लेक्स चांगलं टिक्कीला चिकटेल (तुम्ही कॉर्नफ्लेक्स च्या ऐवजी ब्रेडचा चुरा वापरू शकता) गरम तेलात दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्या. गाळणीत काढून घ्या म्हणजे अतिरिक्त तेल निघून जाईल. टिक्की गरम असतानाच त्यावर चीझचे स्लाईस ठेवा म्हणजे गरम टिककीमुळे ते चीझ थोडं वितळेल. (माझ्याकडे चीझ स्लाईस नव्हतं म्हणून छोट्या वड्यांचे स्लाईस व किसून वापर केला आहे)
- 5
सॉस बनविण्यासाठी : मेयोनेज, टोमॅटो सॉस, रेड चिली सॉस, मिक्स हर्ब्स घालून सॉस बनवून घ्या. बर्गर बन्सचे आडवे तुकडे करून घ्या.
- 6
त्यावर बटर लावा नंतर मेयोनीजचा बनविलेला सॉस भरपूर लावून घ्या. त्यावर कांदा व टोमॅटोचे स्लाईस लावा.
- 7
त्यावर टिक्की ठेवा. त्यावर कोबीची पाने लावा त्यावर दुसरा बन्स चा स्लाईस ठेवा. वर स्टिकला चेरी लावून ती स्टिक बन्स मध्ये घुसवा. खायला तयार आहे बर्गर.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
बर्गर (burger recipe in marathi)
#GA4 #week7बर्गर हा अमेरिकेतील अतिशय लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे. दोन पावांच्या मध्ये बटर, टोमॅटो, लेट्यूसची पाने, बटाटा किंवा चिकन व मटण यापासून बनवलेले पॅटीस, साॅस व चिज घालून हा पदार्थ तयार केला जातो. हा ह्वेज व नाॅनह्वेज दोन्ही प्रकारे बनवला जातो. मॅकडोनाल्ड या कंपनीने बर्गर जगभरात प्रसिद्ध केला आहे. मी बर्गर हा कीवर्ड घेऊन ह्वेज बर्गर बनवला आहे. Ashwinee Vaidya -
ओट्स बर्गर (oats burger recipe in marathi)
#GA4 #week7Oats टोमॅटो Burger या क्लूनुसार मी बर्गर ची रेसिपी पोस्ट केली आहे.(वेट लॉस बर्गर)यात मी जास्त भाज्या वापरल्या आहेत तसेच पनीर आणि ओट्स वापरले आहेत. Rajashri Deodhar -
टिक्की बर्गर (tikki burger recipe in marathi)
#GA4 #week7#post1 पुन्हा एकदा कुकपॅड चे आभार...या puzzle च्या निमित्ताने मी first time बर्गर घरी केले. एरवी हा पदार्थ बाहेरच खात होते. पण आज घरी केल्यावर खुप छान वाटले. सर्व तयारी ला वेळ लागला पण बर्गर yummy झाला आहे. 😍😍 Shubhangee Kumbhar -
व्हेज बर्गर (veg burger recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4 बर्गर तसा बागायला गेल तर भारतातला नाही. तो प्रत्येक देशात, आणि प्रदेशात वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो. आता ह्याची आठवण म्हणजे मी आणि माझे मिस्टर रविवारी संध्याकाळी जेव्हा फिरायला जायचो तेव्हा इथल्या गार्डन ला लागून असलेल्या शॉप मध्ये घ्यायचो आता लॉकडाऊन मुळे जाणे शक्य नाही. म्हटलं घरीच बनवूया. बर्गर कसा करायचा ते पाहू. Veena Suki Bobhate -
व्हेज बर्गर (Veg Burger Recipe In Marathi)
#KSआताच्या पिढीतील मुलं! त्यांना फास्ट फूड म्हणजेच पिझ्झा ,बर्गर या गोष्टीचं खूप आकर्षण असतं आणि बर्गर मध्ये तसं पाहिलं तर सर्व भाज्या पोटात जातात शिवाय चीज हे प्रोटीन पण त्यांना मिळतं ,त्यामुळे आपण जर घरी व्हेज बर्गर बनवला तर घरातली लहान मुलं नक्कीच आनंदीत होतील आणि म्हणून चिल्ड्रन्स डे स्पेशल रेसिपी मध्ये मला व्हेज ब्रदर बनवावसं वाटलं. Anushri Pai -
चिकन बर्गर (chicken burger recipe in marathi)
#GA4 #week7माझ्या आवडीच्या शेफची रेसिपी आहे. Chef Ranveer Brar Purva Prasad Thosar -
मेयोनेज सँडविच (mayonnaise sandwich recipe in marathi)
#GA4 #week3 #सँडविचआज माझ्या लेकीने नाश्त्याला झटपट होणारा पदार्थ म्हणजेच मेयोनेज सँडविच बनविले. खरंतर मला मेयोनेज अजिबात आवडत नाही म्हणून लेकीला सांगितलं तुला आवडत असेल तर कर आणि खा तुला. हे सँडविच बनविल्यानंतर लेकीने जबरदस्तीने मला हे सँडविच खायला दिलं आणि काय सांगू मला त्याची चव अतिशय आवडली. तुम्हालाही नक्कीच आवडेल, बघा करून... Deepa Gad -
पावभाजी बर्गर (pawbhaji burger recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 फ्युजन मध्ये आज बर्गर आणि पावभाजी ह्याचे फ्युजन बनवले. बर्गर हा पश्चिम देशात प्रामुख्याने बनणार पदार्थ आहे तर पावभाजी आपल्या इथे बनवतात Kirti Killedar -
मेयोनेज फ्राईड इडली (mayonnaise fried idli recipe in marathi)
#GA4#week9#friedगोल्डन अप्रोन मधील fried वर्ड वापरून मी मेयोनेज फ्राईड इडली बनविली. Deepa Gad -
ब्रेड चिकन कप पिझ्झा (cup pizza recipe in marathi)
रोज रोज मुलांना त्यांच्या आवडीचे काय खायला द्यायचं. पिझ्झा हा मुलांचा सगळ्यात आवडता. म्हणून मग घरात ब्रेड होता त्याचाच कप पिझ्झा ट्राय करून पाहिला. Jyoti Gawankar -
नवीन पद्धतीचे वेज आलू बर्गर (veg aloo burger recipe in marathi)
#GA4 #Week1सेंटर अमेरिकन स्टाईल नवीन पद्धतीचे बर्गर. माझे मिस्टर दोन-तीन दिवसांसाठी कामासाठी बाहेर जाणार होते. आम्ही पण त्यांच्यासोबत गेलो. पहाटे पाच वाजता आम्ही निघालो. सकाळी 10 वाजता आम्ही हॉटेलवर पोचलो. जोरात भुक लागली होती. हे बोलले इथे छोटंसं रेस्टॉरंट आहे मी इथे आल्यावर जेवतो तु पण चाल तिथे जेवण खूप छान मिळतं. पण त्या जेवणामध्ये तिखट काही पण नसतं. मी त्यांना बोली ठीक आहे चला आपण जाऊ. मला जे आवडेल ते मी घेईन तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही घ्या. मेनू कार्ड टेबलावरच ठेवला होतं. सकाळच्या नाश्त्याची वेळ झाली होती. मी व्हेज बर्गर मागवले आणि मिस्टरांनी आणि चिकन बर्गर. आमच्या दोघांच्या बर्गर मध्ये थोडे फरक होतो. मिस्टरांनी आणि त्यांना बोलावलं त्यांना विचारलं दोनी बर्गर मध्ये फरक का आहे. त्यांनी उत्तर दिलं दोन्ही बर्गर थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवला आहे. बर्गर र्ब्रेड ने बनवला आहे आणि ब्रेड ने बनवला आहे तुम्हाला हे नक्की आवडेल तुम्ही खाऊन पहा. तुम्हाला नाही आवडलं तर आम्ही तुमचे पैसे परत करु. आम्ही त्यांना बोललो ठीक आहे आम्ही टेस्ट करून बघू. मग आम्ही बर्गर खाल्लं. त्यात दोनी बर्गर मधून मिस्टरांना आणि मला व्हेज बर्गर खुप आवडल. डोमिनोज बर्गर पेक्षा हा बर्गर खूप वेगळं होतं. हे बर्गर आपण घरी पण बनवू शकतो अशा पद्धतीने होतं. मग मी त्यांना बोली तुम्ही रेसिपी कशी बनवली ते मला सांगू शकता का. ते बोलले आता मी तुम्हाला सांगू शकत नाही कस्टमर खूप आहे. ते मला विचारले तुम्ही किती दिवसासाठी आहात इथे मी त्यांना सांगितली आम्ही दोन-तीन दिवसांसाठी आहे इते. ते बोलले ठीक आहे मी एका पेपरवर लिहून ठेवेल जेव्हा तुम्ही इथं याल तेव्हा मी ती रेसिपी तुम्हाला देईन. मी बोलली ठीक आहे. Sapna Telkar -
-
इडली बर्गर
बर्गर हा जरी विदेशी पदार्थ असला तरी आपल्या भारतीय पद्धतीत सुद्धा आपण बर्गर चा आनंद घेऊ शकतो.मी इडली बर्गर च्या फोटोसाठी इथे रेसिपी मध्ये दोन पूर्ण यांचा वापर केला आहे परंतु एका इडलीचे मध्ये काम करून मवडा स्टॉप करूनही तुम्ही बर्गर बनवू शकता #goldenapron3 week 6 Shilpa Limbkar -
इंस्टेंट चीजीब्रेड स्नैक्स (instant cheese bread snacks recipe in marathi)
#GA4#week26#Breadगोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये Bread हा कीवर्ड बघून रेसिपी बनवली.बऱ्याचदा आपण घरात ब्रेड आणतो त्याच्या पासून तयार होणारे पदार्थ तयार झाल्यावर बऱ्याचदा उरतो अशावेळेस त्या उरलेल्या ब्रेड पासून काहीतरी नवीन स्नॅक्स तयार करून ब्रेड कसा संपवायचा त्यातून ही रेसिपी तयार झाली आहे. माझ्याकडे व्हाईट ब्रेड आणि ब्राऊन ब्रेड दोघं उरलेले होते मग त्याचे काय करायचे मग माझ्या मुलीने आयडिया दिली आपण आता काहीतरी स्नॅक्स तयार करू खायला छान लागेल संध्याकाळच्या स्नॅक्स मध्ये हा पदार्थ तयार केला आणि खूप टेस्टी ही बनलाब्रेड शिळा असल्यामुळे अशा पद्धतीने तयार करून खाल्ल्यामुळे छान लागला आणि लगेच संपला पण थोडा-थोडा पिझ्झा खात आहो असे लागत होते पिज्जा ,गार्लिक ब्रेड या दोघांचा टेस्ट येत होताबघूया उरलेल्या ब्रेड पासून स्नॅक्स कसा तयार केला. Chetana Bhojak -
होममेड पिझ्झा साॅस (pizza sauce recipe in marathi)
#GA4#week22Keyword- Sauceपिझ्झा साॅस जो अगदी पोळी सोबत जरी खाल्ला तरी खूप छान लागतो.माझ्या मुलाचा अतिशय आवडता साॅस आहे..😊पिझ्झा साॅस हा सॅन्डविच,रोल , पिझ्झा,पास्ता मधे वापरता येतो.चला तर,पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
बर्गर रगडा(Burger Ragda recipe in marathi)
#बर्गर रगडा हा सर्व वयोगटातील लोकांना आवडतो. Sushma Sachin Sharma -
तवा पिझ्झा (tava pizza recipe in marathi)
#noovenbaking नेहा मॅमची मागच्या आठवड्यातील रेसिपी मला काही पर्सनल रिझन मुळे मला बघता नाही आली .मग मी नो ओव्हन बेकिंग थीम नुसार नो इस्ट व्हिट पिझ्झा बनवला बघा कसा झालाय.कुकरचा वापर न करता तव्यावर पिझ्झा बनवला. Jyoti Chandratre -
व्हेज पिझ्झा (veg pizza recipe in marathi)
#CDYHappy children's dayमुलं कितीही मोठी झाली तरी बाहेरचे जे पदार्थ असतात ते घरी केले की त्यांना नेहमीच आवडतात. विकतच्या पिझ्झापेक्षा घरी तयार केलेला पिझ्झा माझ्या मुलांना खूपच आवडतो. त्यांच्यासाठी पिझ्झा बेस वर मी टॉपिंग टाकून पिझ्झा बनवला आहे आणि मलाही पिझ्झा आवडतो त्यासाठी मी व्हीट ब्रेड वर पिझ्झा टॉपिंग टाकून पिझ्झा नेहमी माझ्यासाठी बनवते. चला तर मग बघूया झटपट होणारी घरगुती व्हेज पिझ्झा ची रेसिपी🍕😋 Vandana Shelar -
-
सोया बर्गर (soya burger recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13बर्गर हा सँडविचाच एक प्रकार म्हणजेच जंक फूड. जंक फूड म्हणजे आरोग्याला अपायकारक असा काहीसा आपला गैरसमज. काही प्रमाणात हे जरी बरोबर असलं तरी, त्यात भरपूर प्रमाणात ग्रीन भाज्या घालून आपण त्याला एक हेल्दी फूड म्हणून नक्कीच तयार करू शकतो. जंक फूड जितके मुलांच्या आवडीचे तितक्याच हिरव्या भाज्या त्यांच्या नावडीच्या. म्हणूनच ह्या दोन्हीचा समन्वय साधून एक हेल्दी बर्गर मी तयार केलेला आहे. अधिक म्हणून की काय भरपूर प्रोटिन्स चा स्त्रोत असलेल्या सोयाबीनचाही मी ह्यात समावेश केलेला आहे. त्यामुळेच जंक फूड प्रति असणारी मुलांची आवड आणि आरोग्याच्या बाबतीत असणारी माझी काळजी ह्या दोन्हीचा उत्तम मेळ सोया बर्गरच्या रूपाने मी साधलेला आहे. Seema Mate -
ब्रेड पिझ्झा (bread pizza recipe in marathi)
#cooksnapप्रियांका सुदेश यांची ब्रेड पिझ्झा ही रेसिपी मी काही बदलांसह बनविली.लॉकडाऊन परिस्थितीत माझ्या मुलाची पिझ्झा खाण्याची इच्छा या रेसिपी मुळे पूर्ण होऊ शकली. पॅन मधे बनवलेला हा ब्रेड पिझ्झा सर्वांना आवडेल असा, झटपट होणारा पदार्थ आहे. एखाद्या दिवशी नाश्त्याला नक्की करून पाहा. Ashwini Vaibhav Raut -
मॅकडी स्टाईल बर्गर (burger recipe in marathi)
#wdr#मॅकडीस्टाईलबर्गर#बर्गर#cookalongकूकपॅड वरील कूकअलोंग या अॅक्टिविटी मध्ये भाग घेऊन शेफ निनाद यांच्याकडून बर्गर आणिपोटॅटो वेजिस या दोन रेसिपी त्यांच्या बरोबर फॉलो करून तयार केल्या खूप छान मॅक्डोनेल स्टाईल बर्गर आणि विजेस तयार झाले आहे.या ऍक्टिव्हिटी साठी कुकपॅड टीम वर्षा मॅम, भक्ती मॅमशेफ निनाद यांचे मनापासून धन्यवादखूप छान बर्गर तयार झाले आहे खायला एकदम मॅक्डोनेल सारखे आहे Chetana Bhojak -
हेल्दी बर्गर टिक्की... लॉकडाऊन स्पेेशल (burger tikki recipe in marathi)
मुलांना बर्गर खूप आवडतो.मग त्याची टिक्की बनवताना बटाट्या सोबत काही तरी घालून ती हेल्दी कशी बनेल यासाठी दरवेळी वेगवेगळे प्रयोग करते.आज गाजर आणि बीट याचा वापर केला.बर्गर बन्स लॉकडाऊन मुळे बाहेर मिळाले नाहीत.जे मिळाले ते आणले. मुलीला ब्राऊन ब्रेड आवडतो .मग त्यालाच गोलाकार कापून त्यामध्ये टिक्की घालून बर्गर केला.माझ्यासाठी व्हाईट ब्रेड वापरला. Preeti V. Salvi -
चिकन बर्गर (chicken burger recipe in marathi)
बाजारातला बर्गर घरात बनवन तस फारस कठीण नाही फक्त बनवण्याकरिता लागणार वेळ असल्यास आपण आरामात बनवू शकतो. आज बाजारात तयार पॅटी सुद्धा मिळतात त्या आणून ही आपण बनवू शकतो किंवा पॅटी आधी बनवून फ्रिजरला ठेवून ही अर्धे काम कमी करू शकतो. तर मग चला बनवूयात चिकन बर्गर. Supriya Devkar -
चिकन बर्गर (chicken burger recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13#इंटरनॅशनल रेसिपीबर्गर हा मूळचा जर्मन चा पण हळू हळू सगळीकडे आपले प्रस्थान वाढवले आहे हा एक सँडविचच्या प्रकारात मोडतो. ह्या मध्ये एक पॅटी किंवा टिक्की, विविध सॉस, मेयोनीस, कांदा टोमॅटो, हेही वापरले जाते. आता ह्याच्या टिक्की मध्ये पण विविधता बघायला मिळते. म्हणजे जर्मन मध्ये ब्रीफ वापरेल जाते, तुर्की मध्ये सीफूड वापरले जाते किंवा इतर देशात चिकन, मटण, आणि भज्यांच्या पॅटी चा वापर केला जातो. आज आपण पाहतो लहान मुलांना ते मोठ्यांना बर्गर हा आवडीचा झालय. आणि सर्व देशात त्याला आपल्याला हव्या त्या थोड्या फार फरकाने बदल करून आपले केले आहे. आज आपण पाहणार आहोत चिकन बर्गर. झटपट आणि टेस्ट Veena Suki Bobhate -
पिझ्झा (pizza recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5बाहेर मस्त पाऊस पडतोय. पावसाळ्यात गरमागरम खायला खुप मजा येते. आज मी तुम्हाला पिझ्झा ची रेसिपी शेअर करतेय. माझ्या मुलीला पिझ्झा खुप आवडतो. सध्या बाहेर खायला जाणे खुप रिस्की आहे. त्यामुळे मी पिझ्झा घरीच बनवला. एकदम डोमिनोज स्टाईल होतो तुम्ही पण ट्राय करा. Sanskruti Gaonkar -
आलू टिक्की विथ व्हेज बर्गर (Aloo Tikki With Veg Burger Recipe In Marathi)
#CookpadTurns6हुर्रर्ये!!!हैप्पी बर्थडे टू ऑल यू कूकपॅड फॅमेलीया celebration साठी बनवले आहे...आलू टिक्की विथ व्हेज बर्गर 🍔 Vandana Shelar -
More Recipes
टिप्पण्या (8)