हेल्दी बर्गर टिक्की... लॉकडाऊन स्पेेशल (burger tikki recipe in marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

मुलांना बर्गर खूप आवडतो.मग त्याची टिक्की बनवताना बटाट्या सोबत काही तरी घालून ती हेल्दी कशी बनेल यासाठी दरवेळी वेगवेगळे प्रयोग करते.आज गाजर आणि बीट याचा वापर केला.बर्गर बन्स लॉकडाऊन मुळे बाहेर मिळाले नाहीत.जे मिळाले ते आणले. मुलीला ब्राऊन ब्रेड आवडतो .मग त्यालाच गोलाकार कापून त्यामध्ये टिक्की घालून बर्गर केला.माझ्यासाठी व्हाईट ब्रेड वापरला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

साधारण अर्धा तास
३-४
  1. टिक्की..
  2. 3छोटे बटाटे उकडून
  3. 1बीट उकडून
  4. 1गाजर उकडून
  5. 1कांदा बारीक चिरून
  6. 1/4 कपब्राऊन ब्रेड क्रंब
  7. 1 टीस्पूनआलं लसूण पेस्ट
  8. 1/4 टीस्पूनमीठ. ...चवीनुसार कमी जास्त
  9. 1/4 टीस्पूनहळद
  10. 1/2 टीस्पूनतिखट
  11. 1/2 टीस्पूनगरम मसाला
  12. 1 टीस्पूनधणे जिरे पावडर
  13. 1 टेबलस्पूनटिक्की घोळवण्यासाठी ब्रेड क्रम्ब
  14. 250 ग्रामतळण्यासाठी तेल
  15. १०-१२ ब्रेड स्लाइस (ब्राऊन, व्हाइट...आवडीनुसार)
  16. 1-2 टेबलस्पूनबटर
  17. 2कांदे गोलाकार चिरून
  18. 3टोमॅटो गोलाकार चिरून
  19. 1/4 कपटोमॅटो सॉस....आवश्यकतेनुसार
  20. 1/4 कपमेयोनिज....आवडीनुसार कमी जास्त
  21. 1/4 कपहिरवी चटणी

कुकिंग सूचना

साधारण अर्धा तास
  1. 1

    बटाटे,गाजर,बीट उकडून सोलून कुस्करून घेतले.कांदा बारीक चिरून घेतला.हे सगळं मिक्स करून घेतलं.

  2. 2

    ह्या मिश्रणात आलं लसूण पेस्ट,हळद,तिखट,गरम मसाला,मीठ घालून मिक्स केले.त्यात ब्रेड क्रम्ब घालून त्याच्या गोलाकार टिक्की बनवल्या.त्या ब्रेड क्रम्ब मध्ये घोळवून तेलात शॅलो फ्राय करून घेतल्या.

  3. 3

    ब्रेड स्लाइस गोलाकार कापून घेतल्या.तव्यावर स्लाइस बटर लावून छान भाजून घेतल्या.कांदा,टोमॅटो गोलाकार चिरून घेतले.टोमॅटो सॉस,चटणी, मेयोनिज असे सगळे साहित्य तयार ठेवले.

  4. 4

    आता प्रथम ब्रेड स्लाइसला आवडीनुसार टोमॅटो सॉस,चटणी आणि मेयोनिज लावले,त्यावर कापलेल्या कांदा आणि टोमॅटोच्या स्लाइस ठेवल्या.त्यावर तयार टिक्की ठेवली.वरून पुन्हा कांदा,टोमॅटो स्लाइस ठेवून त्यावर सॉस,चटणी, मेयोनिज लावलेली स्लाइस उपडी ठेवली.सलाड चे पान किंवा कोबीची पाने तसेच चीज स्लाइस माझ्याकडे उपलब्ध नव्हते,पण ते सुदधा ह्यात मस्तच लागतात. वरून टोमॅटो सॉस चे थेंब घालून सजवले.खाण्यासाठी बर्गर तयार आहे.मुलीसाठी ब्राऊन ब्रेड आणि मला व्हाइट ब्रेड स्लाइस वापरून केलेले बर्गर मस्त झालेले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes