वाॅलनट,डेट केक (walnut dates cake recipe in marathi)

Namita Patil
Namita Patil @namitapatil

#Walnuttwist
केक म्हंटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय. आता केकसाठी कोणत्याही बेकरीवर अवलंबून रहाण्याची गरज नाही. घरच्या घरी केक बनवून अनलिमिटेड केक आपण खाऊ शकतो. त्यामुळे घरातील सर्व जणच एकदम खूष....आज मीसुद्धा तुमच्यासाठी अक्रोड आणि खजूर यापासून बनवलेल्या पौष्टीक केकची रेसिपी घेवून आली आहे. अतिशय टेस्टी, स्पाॅंजी असा हा केक...बघूनच तुम्हाला कळेल की किती सुंदर झाला आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१-१:१५ तास
४-५ लोकांसाठी
  1. 1वाटी मैदा
  2. 1/2वाटी साखर
  3. 1/2वाटी अक्रोड
  4. 1/2वाटी खजूर
  5. 7-8बदाम
  6. 3टेबलस्पून लोणी
  7. 1वाटी दूध
  8. 2टेबलस्पून दही
  9. 1/4चमचा वेलची पूड
  10. 1टेबलस्पून बेकिंग सोडा

कुकिंग सूचना

१-१:१५ तास
  1. 1

    प्रथम लोणी आणि साखर ५-७ मि. एकत्र फेटून घेणे. दही घालून पाच मि. फेटणे. मैदा घालून पुन्हा पाच मि. फेटणे.

  2. 2

    आता खजूरचे बारीक केलेले काप, बदामचे काप व अक्रोडचे हातानेच बारीक तुकडे करून हे सर्व थोड्या मैद्यात घोळवून घालणे.

  3. 3

    आता त्यामध्ये दूध, वेलचीपूड, बेकिंग सोडा घालूण हलक्या हाताने मिक्स करणे. कुकरमध्ये तळाशी बारीक मीठ पसरवणे १० मि. गरम होवू देणे.आता केकच्या भांड्याला चमचाभर लोणी सर्वत्र लावून घेणे, त्यावर मैदा भुर भुरणे. त्यामध्ये केकचे मिश्रण घालणे, एक, दोनवेळा ओट्यावर हळूहळू आपटून मिश्रण एकसारखे करून घ्यावे. त्यावर अर्धा चमचा मैद्यात सुक्यामेव्याचे काप व अक्रोडचे मोठे तुकडे टाकून कुकरमध्ये ठेवावे.कुकरच्या झाकणाची रिंग व शिट्टी काढावी. मंद गॅसवर ४० मि. ठेवावा.सुरी उभी घालून पहावे, चिकटला नाही तर केक झाला.

  4. 4

    ४० मि.नंतर छान फुगलेला केक तयार झालेला दिसेल. थंड झाल्यानंतर केकच्या छान स्लाईस कापता येतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Namita Patil
Namita Patil @namitapatil
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes