तुळशीच्या बियांची खीर (tulsi seeds khir recipe in marathi)

Mangala Bhamburkar
Mangala Bhamburkar @cook_26659112
Amravati

#GA4
#week8
#milkrecipe
तुळशीचे झाड प्रत्येकाच्या अंगणात असते तुळशीचे कृष्ण तुळस आणि राम तुळस किंवा हिरवी तुळस असे दोन प्रकार असतात. कृष्ण तुळस ही अधिक गुणकारी असते .तुळशीचे अनेक औषधी उपयोग आहेत लघु, सूक्ष्म , उष्ण, तीक्ष्ण वगैरे गुणांच्या योगे तुळशी अनेक कार्य करते .तुळशीमधील सूक्ष्म या गुणामुळे ती शरीरात प्रवेशित झाली की लगेच कामाला लागते शरीरातील लहानातील लहान पोकळीत ही पोहोचू शकते. तुळशीच्या मंजिरी मध्ये बारीक बी धरते. तुळशीच्या बिया पित्तशामक म्हणजे उष्णता कमी करणाऱ्या लघवी साफ होण्यास मदत करतात व या बिया पौष्टिक असतात. तुळशीच्या बिया दहा ते पंधरा मिनिट पाण्यात भिजवून ठेवल्या तर त्या फुलतात व गुळगुळीत बनतात आयुर्वेदिक औषधे बनविताना तुळशीच्या पंचांगाचा म्हणजे पाने फुले बिया मूळ या सर्वांचा उपयोग करतात तुळशीच्या बिया पासून खीर बनवण्याची पद्धत आपण पाहणार आहोत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिन.
१ व्यक्ती
  1. 1 टेबलस्पूनतुळशीचे बी
  2. 1/2 वाटीपाणी
  3. चिमूटभर वेलची पूड
  4. 2 कपदूध
  5. 2 टीस्पूनसाखर

कुकिंग सूचना

१५ मिन.
  1. 1

    प्रथम तुळशीचे बी अर्धा वाटी पाण्यात टाका

  2. 2

    तुळशीचे बी पंधरा मिनिटात ते फुलून येतील व गुळगुळीत होतील

  3. 3

    बाजूला दोन कप दूध कढईत आटवून निम्मा होईल इतपत घोटावे

  4. 4

    दूध आटून झाले की त्यात साखर व फुललेल्या तुळशीच्या बिया व वेलची पूड घालावी व दोन मिनिट, शिजू द्यावी

  5. 5

    तुळशीच्या बियांची पौष्टिक स्वादिष्ट खीर तयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Mangala Bhamburkar
Mangala Bhamburkar @cook_26659112
रोजी
Amravati

टिप्पण्या

Santosh
Santosh @cook_37425961
Thank you.all recipes mouth watering and explained in simple and nice manner.

Similar Recipes